नवीन लेखन...

रात्र वैऱ्याची आहे! सावध असा ! दक्ष असा !!

रात्र वैऱ्याची आहे! सावध असा ! दक्ष असा !!

पुलवामावर झालेल्या भ्याड भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर १२ दिवसांनी भारताने पाकिस्तानला जबरदस्त तडाखा दिला. भारतीय वायुसेनेच्या लढवय्यांनी पाकमध्ये घुसून ४० च्या बदल्यात ४०० अतिरेक्यांना यमसदनी धाडलं. कोट्यवधी भारतीयांच्या जे मनात होतं, अगदी तसाच सव्याज बदला भारताच्या शूरवीर सैनिकांनी घेतला. वास्तविक, भारताने केलेला एअर सर्जिकल स्ट्राईक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आत्मसंरक्षणार्थ उचललेलं पाऊल होते. कारण, पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार जैश ए महोम्मद चे दहशतवादी भारतावर पुन्हा मोठा हल्ला करण्याचे नियोजन करत असल्याची सबळ माहिती भारताला मिळाल्याने त्यांचा खात्मा करणे जरुरीचे होते. त्यानुसार भारत सरकारने नियोजनबद्ध पाऊले उचलून सर्जिकल स्ट्राईक-२ पार पडले. मात्र, या कारवाईनंतर अपेक्षेप्रमाणे बिथरलेल्या पाकिस्तनाकडून भारतावर प्रतिहल्ला करण्याचा फुसका प्रयत्न केला जातोय. ना ‘पाक’ वलग्ना करून खोटीनाटी माहिती पसरविल्या जातेय. त्यामुळे सीमारेषेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात, पाकच्या प्रत्येक कुरापतीला रोखठोक उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आणि सज्ज आहे. पाकड्यांनी आगळीक केलीच तर त्यांना चारीमुंड्या चीत केल्या जाईल, यात शंका नाही. मात्र, युद्ध फक्त रणभूमीवरच खेळल्या जात नाही तर अनेक पातळ्यांवरून ते लढल्या जात असते.. युद्ध फक्त सैनिक लढत नाहीत तर देशाच्या नागरिकांनाही संयमाचे आणि विवेकाचे युद्ध लढावे लागत असते. त्यामुळे विद्यमान नाजूक परिस्थितीत भारतीय नागरिकांनी सावध आणि दक्ष राहण्याची गरज आहे. समाजमाध्यमवर व्यक्त होतांना संयम आणि विवेकाचं भान प्रत्येकाने ठेवायला हवे. राष्ट्रीय अस्मितेच्या आणि देश सुरक्षेच्या मुद्दयांवर कुणीही राजकारण करु नये. देशांतर्गत शांतता बाधित होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. समोरून वार करणाऱ्याची छाती चिरता येते. मात्र, पाठीत वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. तेव्हा, जन हो सावध असा ! दक्ष असा !!रात्र वैऱ्याची आहे !!!

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तनाला राजनीती आणि रणनीती या दोन्ही पातळ्यांवर घेरले आहे. एअर सर्जिकल स्ट्राईक द्वारे भारताचे सैन्य कशाप्रकारे पाकची धूळधाण उडवू शकते, याच एक ट्रेलर भारतीय वायुदलाने दाखवून दिले. मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेत आणि पाणी अडविण्याचा निर्णय घेऊन भारताने राजनैतिक पातळीवर पाकच्या नाकातोंडात पाणी आणले. या परिस्थितीत बेभान झालेला पाक पलटवार करणार हे अपेक्षितच होते. सवयीप्रमाणे यावेळीही पाकने छुपा वार करण्याचा प्रयत्न केला. काल पाकच्या ३ लढाऊ विमानांनी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला. अर्थात सावध आणि दक्ष असलेल्या भारतीय सैन्याने त्यातील एका विमानाला नस्तेनाबूत करून दोघांना पिटाळून लावले. मात्र त्यानंतर पाकने खोटानाटा कांगावा करत भारताची दोन विमाने पाडल्याचा दावा केला. वास्तविक, हवाई संघर्षात भारताचे एक ‘मिग-२१’ विमान पडले आणि एक वैमानिक पाकच्या ताब्यात सापडला होता. भारतीय सैन्याने पाकचा खोटारडेपणा तात्काळ जगासमोर आणला आहे. मुळात, भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकची भंबेरी उडाली आहे. पाकिस्तानी जनतेची किमान दिशाभूल करण्यासाठी काहीतरी खोटेनाटे पसरविणे ही पाकी नेतृत्वाची अपरिहार्यताच म्हणावी लागेल. कारण भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाल्यासारखी परिस्थिती आहे. सामान्य माणूस काहीसा भेदरलेला आहे. त्यामुळे त्यांची दिशाभूल करून जनतेचे मनोबल राखण्याचा केविलवाणा प्रयत्न पाक नेतृत्वाकडून केला जातोय.

भारताने कधीच युद्धाची भाषा केली नाही.. पाकिस्तानी आगळीक सुरु असतानाही भारताची भूमिका संयमाचीच होती. आताही भारताने कोणत्याही देशाविरोधात कारवाई केलेली नाही. जैश च्या दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला करून माणुसकीचा मुडदा पडला. त्यामुळे मानसुकीच्या या शत्रुंना अद्दल घडविणे गरजेचे होते. हवाई दलाच्या कारवाईमध्येही फक्त दहशतवादी तळेच लक्ष करण्यात आली. आजही आमचे युद्ध मानसुकीचे शत्रू असलेल्या दहशतवाद्यांविरोधातच सुरु आहे. त्यामुळेच संपूर्ण जग भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले आहे. अर्थातच ही बाब पाकिस्तान मान्य करणार नाही. त्याचे वाकडे शेपूटही सरळ होणार नाही. काहीनाकाही कुरापती पाक काढतच राहणार. पुलवामा हल्यात जैश आणि पाकच्या हस्तक्षेपाचे संपूर्ण पुरावे भारताने पाकिस्तान आणि जगाला सादर केले असल्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय राजकारणात कोंडी झाली आहे. जवळपास सर्व बलाढ्य देश विशेषतः चीन सुद्धा सध्यातरी भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसतेय. त्यामुळे, पाकिस्तानची घाबरगुंडी उडालीये. पण तरीही पाकिस्तानचं वाकड शेपूट वळवळणारचं. बिथरलेल्या पाकिस्तानपुढे सध्यातरी दोन पर्याय आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारतावर हवाई हल्ले करणे; पण ते शक्य नाही. कारण, भारताच्या हवाई सुरक्षेचा नमुना पाकला दिसला आहे. शिवाय भारताचे तिन्ही दल हाय अ‍ॅलर्टवर आहे. दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीवर नजर टाकली तर क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने, विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या, विनाशिका आणि सैनिकांची तुलना करता पाकिस्तान भारताच्या आसपासही फिरकू शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तान दुसरा पर्याय वापरू शकतो, तो म्हणजे पाठीमागून वार करण्याचा.

समोर समोर टिकाव लागनार नाही हे लक्षात आल्यावर देशांतर्गत हल्ले आणि दहशतवादी कारवाया करण्याचा मार्ग पाक आणि त्याचे पुरस्कृत दहशतवादी निवडू शकतात. यासाठी केवळ काश्मीरच नव्हे, तर देशातील प्रमुख महानगरांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने रात्र वैर्‍याची आहे सतत सावधान राहाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सुरक्षा यंत्रणा, गुपतचर विभाग, पोलीस याचीच नव्हे तर आपली सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. सर्वांनीच येणार्‍या काळात अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. आपल्या जवळपास कोणतीही संशयित हालचाल घडत असेल, तर तत्काळ पोलिसांना कळवले पाहिजे. देशांतर्गत शांतता बाधित करण्यासाठी सोशल मीडियाच्या आधारे अफवा पसरविण्याचे कारस्थान काही विघातक शक्तींकडून रचल्या जाऊ शकते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका.. अफवा पसरवू नका. पूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणतीही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करू नका. एअर सर्जिकल स्ट्राईक नंतर काही जण उन्मादक पोस्ट सोशल मीडियावर व्हयरल करत आहेत. पण ही वेळ राजकारणाची नाही.. आरोप प्रत्यारोपांची नाही. आपापसातील मतभेद उकरून काढण्याचीही नाही. तर एकजुटीचे देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आहे. देशाच्या सीमांची रक्षा करण्यासाठी सेना समर्थ आहे… देशाला पोखरणाऱ्या अफवा, संशयासारख्या अनेक शत्रूंशी आपण लढू या. आपल्या सैन्याचा फक्त आणि फक्त ‘भारतीय’ म्हणून लढण्याचा गुण अंगी बाणवूया. या क्षणापासून एक दिलानं एक भारतीय म्हणून उभे राहू या. कारण, रात्र वैऱ्याची आहे.. आपल्याला सतर्क राहवेचं लागेल!

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..