रामजन्मभूमी इतिहास आणि न्याय

सर्वोच्च न्यायालयाचा  निकाल लागला आणि श्री रामांना एकदाचा मानवी जगात, मानवी न्यायालयात न्याय मिळाला पण श्री रामानी स्वतः च्याच जन्मभूमी मध्ये जेथे त्यांनी कधी काळी राज्य केले होते . त्यांचे मंदिर बांधान्या साठी त्यांच्या भक्तांना न्यायालयात याचिका दाखल करून खटला का लढावा लागला ?त्याचा पूर्व इतिहास काय? याचा उहापोह आज या लेखात मी करणार आहे.

१ अयोध्या नगरीची स्थापना-


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

अस म्हणतात किंवा इतिहास अस सांगतो की  अयोध्या नगरी श्री रामांचे पूर्वज विवस्वण ( सूर्य ) चे पुत्र वैवस्वत मनु यांनी वसवली होती. तेव्हा पासून अयोध्येवर महाभारत  काळा पर्यंत सूर्यवंशी राजांचे राज्य होते . इथेच दशरथ राज्याच्या महालात प्रभू श्रीराम चा जन्म झाला .वाल्मिकी ने ही रामायणात रामजन्मभूमी चे वर्णन केले आहे. वाल्मिकी यांनी रामायणात अयोध्या नागरी ची तुलना इंद्र सभेशी  केली आहे.

2 श्रीरामा नंतर अयोध्या –

अस म्हणतात की प्रभू श्रीरामानी  जलसमाधी घेतल्या नंतर अयोध्या काही काळ उजाड झाली होती ,पण त्यांच्या जन्मभूमीवर  बनलेला त्याचा माहाल जसाच्या तसा होता . त्या नंतर प्रभू श्रीरामांचे पुत्र  कुश यांनी राजधानी अयोध्या नागरी पुन्हा वसवली  राजधानी वसलेल्या नंतर पुढच्या चव्वेचाळीस  पिढयांन पर्यंत शेवटचे राजे बृहब्दल च्या मृत्यू पर्यंत अयोध्या नागरी आपले वैभव व अस्तित्व टिकवून होती . अस म्हणतात की महाभारताच्या युध्दात अभिमन्यूच्या हातून झाला. महाभारताच्या युध्दा नंतर अयोध्या नागरी पुन्हा उजाड झाली. पण रामजन्मभूमी चे अस्तित्व तसेच राहिले.

3 शंभर वर्षां  नंतर जीर्णोद्धार –

अयोध्या  व रामजन्मभूमी लुप्त झाली .

एकदा उज्जैन सम्राट चक्रवर्ती विक्रमादित्य फिरत फिरत  अयोध्येत आले . ते थकून शरयू नदी किनारी ऐका आंब्याच्या झाडाखाली बसले . तेव्हा तेथे घनदाट जंगल  होते . पण त्या भूमीवर राजा  विक्रमादित्य यांना चमत्कारिक अनुभव आले जेव्हा त्यांनी आसपासच्या साधू संतांना या जागे बद्दल विचारणा केली असता ही अयोध्या श्री रामजन्मभूमी आहे असे राजाला कळाले .तेव्हा राजा विक्रमादित्यने तेथे भव्य राम मंदिर ,महाल, तळी असे बरेच काही बांधले व अयोध्या श्रीरामजन्मभूमीचा जीर्णोद्धार केला . त्या नंतर परत शुंभ वंशी राजा पुष्यमित्र ने  श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केला . आयोध्येत झालेल्या उत्खननात एक शिलालेख सापडला होता . त्यात  पुष्यमित्र राजाचा उल्लेख सेनापती असा केला गेला होता.

गुप्त काळात अयोध्या गुप्त वंशाची राजांची राजधानी होती . त्याचा उल्लेख महाकवी कालिदास यांच्या काव्यात आढळतो . इसवीसन पूर्व 600 मध्ये अयोध्या  एक प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्या नंतर अयोध्येला आंतरराष्ट्रीय ख्याती 5 व्या शतकात मिळाली तेव्हा अयोध्या हे एक प्रमुख बौद्ध केंद्राच्या रुपात विकसित झाले . तेव्हा आयोध्येयला साकेत या नावाने ओळखले जात होते .

इसवीसन 11 मध्ये कंनोज नरेश जयचंद आला त्याने राममंदिरातील सम्राट विक्रमादित्य चा शिलालेख काढून तेथे स्वतःच्या नावाचा शिलालेख लावला . त्या नंतर पानिपत च्या युध्दात राजा जयचंद चा ही अंत झाला.

4 परकीय आक्रमणे आणि राम मंदिर-

भारतावर इसवीसन 11व्या शतकात परकीय आक्रमणे सतत होत राहिली .या परकीय आक्रमकांनी काशी, मथुरा, बरोबर अयोध्या मध्ये ही लूट व पुज्यार्या  च्या हत्या तसेच मूर्ती तोडणे हे सुरूच  ठेवले तरीही 14व्या शतका पर्यंत अयोध्याचे राम मंदिर तोडण्यात परकीय आक्रमक सफल झाले नाहीत . विभिन्न आक्रमकांच्या झंझावातात राम मंदिर सुरक्षित राहिले .

त्या नंतर मुघल आले व मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर ने 1527- 28 मध्ये भव्य राममंदिर पाढुन तेथे बाबरी मस्जिद बांधली . ती 1992  पर्यंत अस्तित्वात होती.

5 बाबरी मशीद पाडली –

6 सप्टेंबर 1992 रोजी 1,50000 लोकांच्या हिंसक समूहाने बाबरी मशीद पाडली त्या नंतर भारत भर दंगे झाले त्यात 2000 लोक मारले गेले .

6 न्यायालयात याचिका –

नंतर सर्वोच्च न्यायालयात हिंदू धर्म संघटनांनी राममंदिर रामजन्मभूमीवर बांधान्यासाठी याचिका सादर केली त्याचा निकाल तब्बल अठ्ठावीस वर्षाने म्हणजे च 9 नोव्हेंबर 2019 ला लागला व अखेर रामजन्मभूमी वर आता मंदिर बांधले जाणार .

माणसाच्या जगात, माणसाच्या न्यायालयात देवाला मिळाला एकदाचा मग तो अठ्ठावीस वर्षाने का असेना !

( माहिती स्त्रोत गुगल )

— स्वामिनी चौगुले 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..