नवीन लेखन...

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु. ल. देशपांडे

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले अशा पु. ल. देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला.

‘पु लं’चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेज येथून कॉलेज पूर्ण केले. भास्कर संगितालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले. पु ल,नी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. मा.पु. ल. देशपांडे यांचा विनोदी लेखक हा गुण त्यांच्या असंख्य गुणांपैकी केवळ एक गुण होता.

त्यांनी साहित्य, चित्रपट, नाटक या कलांच्या प्रांतात विलक्षण समृद्ध कामगिरी केली. पु. ल नी मराठीवर खूप प्रेम केले आणि त्या भाषेतील सर्व बोलीभाषा त्यानी आपल्या मानल्या. संगीत नाटके भरात होती, तो मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ जो होता त्याचे सर्व नजाकतीसह दर्शन घडविताना त्यानी मराठी रंगभूमीचे सांस्कृतिक संचित जोपासले. पु. ल. याना एक खेळिया मानले जाते. कारण ते एक श्रेष्ठ परफॉर्मर होते. त्यांच्या लेखनात शिल्प, चित्र, संगीत, अभिजात साहित्य, तत्वज्ञान, नाटक, अशा सार्याग क्षेत्रांविषयी सृजनशील चिंतन खेळकरपणे मांडले आहे. पु. ल नी गुळाचा गणपती या चित्रपटात पटकथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय आदि सबकुछ पु. ल असा कार्यक्रम केला.

दूधभात, नवरा बायको, देवबाप्पा आदि चित्रपटांमध्ये त्यानी भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयाचा अत्यंत प्रसन्न आविष्कार वार्यारवरची वरात (रविवार सकाळ), असा मी असामी, वावटळ अशा कार्यक्रमांमधून सादर झाला. चित्रपटांमध्ये तो अभिनय रसिकाना भुरळ घालत होता. त्यानी केलेले व्यक्ति आणि वल्ली, गणगोत असे व्यक्तिचित्रणात्मक लेखन हे त्या प्रकारच्या लेखनात अजरामर झाले. मा.पु.ल. देशपांडे यांची सहृदय जीवनदृष्टी त्यातून व्यक्त झाली आहे. त्यांच्या साहित्यात दुसर्या महायुद्धानंतर महाराष्ट्रात झपाटयाने उ्दयाला आलेल्या मध्यमवर्गाच्या सार्याख संवेदना आहेत आणि त्या वर्गाचे कमालीचे जिवंत चित्रण आहे.पण त्यापुरतेच पु.ल. मर्यादित नाहीत. त्यानी जीवनाच्या सर्व क्षेत्राना स्पर्श करणारे लिहिले तरी किंवा त्यात सहभागी तरी झाले. पुलंनी जवळपास ४० वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर २० हून अधिक आवृत्या खपल्या.

मराठी वाडमयाचा (गाळीव) इतिहास, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची इतर विनोदी पुस्तकेही गाजली. त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती, हे त्यांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरूनच कळेल. त्यांनी अमेरीका, युरोप, आशियातील अनेक देश पाहिले.

त्यात त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पध्दतीने लिहिले आहेत. पूर्वरग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा , वंगचित्रे आदी प्रवासवर्णने आहेत. त्यांची नाटकेही अतिशय गाजली. वार्यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी ही काही नाटके आहेत. याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम.

याशिवाय मनोहर माळगावकरांच्या कान्होजी आंग्रे हे ऐतिहासिक व्यक्तिचित्र रेखाटलेले अनुवादीत पुस्तकही मा.पुलंच्या नावावर आहेत. बटाट्याची चाळ व असा मी असामी चे त्यांनी एकपात्री प्रयोगही बरेच केले. बा. भ. बोरकरांच्या कविता त्यांनी व सुनीताबाई देशपांडे यांनी एकत्र वाचण्याचे कार्यक्रमही त्यांनी केले. त्यांनी आपल्या लेखनातून एक मूल्यविवेक मात्र जागा केला. तो मूल्य विवेक आहे मानवतावादाचा.समतेचा, सामाजिक विषमतेच्या विरोधात लढण्याचा. आविष्कार स्वातंत्र्याचा आणि अभिजात सौदर्यदृष्टी जोपासण्याचा.त्यांचे एकूणच जगण्यावर विलक्षण प्रेम होते. जीवन हे सौदर्याचं दर्शन घेण्यासाठी आहे, सौदर्याचा उत्सव पाहण्यासाठी आहे ही त्यांची धारणा होती. त्यानी जे सौदर्य अनुभवले त्याचे दर्शन त्यानी सार्याद वाचकाना घडविले. निखळ आनंद दिला. जीवनातील आनंदाचा आस्वाद कसा घ्यावा हे त्यानी दाखविले. पु. ल देशपांडे यांनी रवींद्र साहित्य, संगीतापासून कुमार गंधर्वाच्या सूफी संगीतापर्यंत, निर्गुणी भजनापर्यंत,त्यांच्या संगितातील प्रयोगांपर्यंत सारे कलाजीवन समरसून अनुभवले. बालगंधर्वांच्या काळातील संगीत नाटकांचा अत्यंत समृद्ध असा काळ अनुभवला.

गुरुदेव रवीद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये राहून त्यानी तेथील कलासाधना आणि शिक्षणाचा अनुभव घेतला. त्यानी बाबा आमटे यानी घनदाट जंगलात कुष्ठ रोग्याना नेऊन त्याच्या पुनर्वसनाचे काम करताना कुष्ठ रोग्यांच्या श्रमातून फुलविलेल्या आनंदवनाच्या प्रतिसृष्टीमध्ये तर रमले. तेथे त्यांना मानवतावादाचा प्रकाश दिसला. ते दलितांची वेदना व्यक्त करणार्या् साहित्याशी एकरूप झाले आणि तो विद्रोह ज्या विषमतेच्या विरोधात होता त्या विषमतेच्याविरोधात चाललेल्या लढ्यामध्ये ते सहभागी झाले.

मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु. लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. ते लेखक, अभिनेते, संगितकार, प्रभावी वक्ते, चित्रपट व सिरिअल्सचे निर्माते-दिग्दर्शक होते. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.

पुलंचा भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण केला होता.एखाद्यानं सार्वजनिक क्षेत्रातील केलेल्या संस्मरणीय कामगिरीचा गौरव म्हणून त्याच्या नावाचा स्टॅम्प प्रसृत करण्याची भारतीय टपाल खात्याची प्रथा आहे. टपाल खात्यानं मा.पु. ल. यांच्या नावाचा स्टॅम्प काढलेला आहे.पु. ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..