नवीन लेखन...

आच्छादन प्रक्रिया- लॅमिनेशन

वह्या, पुस्तके पाण्याने भिजून खराब होऊ नयेत म्हणून पारदर्शक प्लास्टिकची फिल्म बाजारात उपलब्ध आहे. सुरुवातीला आच्छादनासाठी उपयोगात येणारे हे प्लास्टिक ‘पॉलिथीन’ नामक प्रकारचे असे. परंतु आता त्याची जागा ‘पीव्हीसी’ (पॉलिव्हिनाइल क्लोराइड) या प्रकाराने घेतली आहे. ‘पीव्हीसी’ची फिल्म निरनिराळ्या जाडीची तयार करता येते.

लवचीक असूनही या फिल्मला वळ्या पडत नाहीत, त्यामुळं कव्हरसाठी ही फिल्म उत्कृष्ट असते. या कव्हरमुळे पुस्तकं पावसात भिजत नाहीत व वाळवी किंवा इतर कीटकांपासूनही त्यांचं संरक्षण होतं. या आच्छादन क्रियेला तांत्रिक भाषेत ‘लॅमिनेशन’ असं म्हणतात.

इंग्लंडमधील एका खेड्यात मोरॅन नावाच्या एका तरुण तंत्रज्ञानाला पुस्तकाची आच्छादनं छापून झाल्यानंतर यांत्रिक पद्धतीनं त्यावर कायम स्वरूपाचं पारदर्शक आच्छादन घालण्याची कल्पना १९५६ साली सुचली. त्या वेळी बाजारात काचेसारखा पारदर्शक असलेला सेलोफेन पेपर मिळत असे. पॉलिव्हिनाइल असिटेटमुळं कागदाच्या पारदर्शकतेत काहीही फरक पडत नाही व पॉलिव्हिनाइल असिटेट लावलेला कागद छापलेल्या कव्हरवर ठेवून बराच वेळ दाब देऊन गरम इस्त्री फिरविल्यास दोन्ही कागद एकजीव झाल्यासारखे होतात. म्हणजेच आच्छादन होऊनसुद्धा आच्छादनाचा निराळा थर दिसत नाही. या क्रियेचं नंतर यांत्रिकीकरण केलं गेलं.

यानंतर जगातील अनेक कंपन्यांनी यावर संशोधन करून आपापल्या पद्धतीची नवीन प्रकारची ‘लॅमिनेशन’ यंत्रे तयार केली. तसेच आच्छादनासाठीही सेलोफेन कागदाला पर्यायी अनेक प्रकारच्या विविध फिल्म्स उपलब्ध झाल्या. यामध्ये पॉलिथीन, सेल्युलस अॅसिटेट, पीव्हीसी व पॉलिएस्टर यांचा समावेश आहे. सध्या पीव्हीसी व पॉलिएस्टर या दोन प्रकारच्या फिल्म जास्तीतजास्त प्रमाणात वा जातात.

लॅमिनेशन प्रक्रिया आता कागदापुरती मर्यादित राहिली नसून टिन, ज्यूटचं कापड इ. वरही लॅमिनेशन करणं शक्य झालं आहे. चामडे, मेणकापड यावरही लॅमिनेशन करता येतं. लॅमिनेशनचे आणखीही काही प्रकार आहेत. प्लायवूड किंवा लाकडाच्या फळीवर फोटो चिकटवून त्यावर लॅमिनेशन करण्याची पद्धत आहे.

शुभदा वक्टे, (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद
office@mavipamumbai.org

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..