जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्याहत्तर

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 34

नैवेद्यम् समर्पयामी-भाग आठ

नैवेद्य दाखवताना देवाला घास भरवायचे. त्याचा मंत्र आहे, “नैवेद्यम् समर्पयामी.” असे म्हणून घास भरवायचे. थोडं थांबून देवाला पाणी प्यायला द्यायचे. त्याचा एक मंत्र असा आहे. “नैवेद्यम् मध्येपानीयं समर्पयामी ! ” असे म्हणून देवाला थोडे भरवून झाल्यावर मधेच, ताम्हनामधे एक पळी पाणी सोडावे. आणि पुनः देवाला सहा घास भरवायचे.
हे झाले कर्मकांड.

यात देहासाठी काय आहे ?
हे सर्व जेवायचे कसे पाणी कसे प्यावे याचे शुद्ध आयुर्वेदीय नियम आहेत. जे जे देवासाठी ते ते देहासाठी.

आयुर्वेद मतानुसार पाणी जेवताना मधेमधेच प्यावे म्हणजे प्रकृती सम रहाते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने बारीक व्हायला होते,
आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाड व्हायला होते. अर्थात आपण कसे पाणी प्यावे, हे आपल्या प्रकृतीवर अवलंबून आहे. म्हणजेच वैद्य सल्ला महत्त्वाचा ! उगाच आपले आपल्यावर प्रयोग करू नयेत.

पण सर्वसाधारणपणे पाणी जेवताना मधे मधेच प्यावे, हा नियम आहे हे लक्षात ठेवावे. यासाठी हा नियम देवपूजेमध्ये देखील समाविष्ट केला गेलाय. “मध्ये पानीयं समर्पयामी…..”

पाणी कोणी किती कसे आणि का प्यावे, याविषयी सविस्तर टीपा मागील वर्षीच येऊन गेल्या आहेत. पुनरूक्ती दोष टाळतो. फक्त एक उदाहरण सांगतो, नारळाचे दूध किंवा नारळाचा रस काढायचा असेल तर, नारळ वाटतानाच त्यामध्ये पाणी घालावे लागते. अन्यथा रस चांगला निघत नाही.
स्लॅब घालताना वाळू, सिमेंट, खडी, मिक्सरमध्ये एकत्र फिरवतानाच त्यात पुरेसे पाणी मिसळले जाते. अन्यथा लोखंडाच्या फ्रेममध्ये हे मिश्रण योग्य रितीने पसरलेच जाणार नाही. तसेच पाणी जेवता जेवता मधे मधे, स्वतःला आवश्यक असेल तेवढे, जरूर प्यावे. म्हणजे पुढे अन्नरस चांगला तयार होतो. कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून, डायेटीशियन बोलली म्हणून, टीव्ही वर दाखवले म्हणून, अथवा कोणीतरी पाश्चात्य बुद्धीचा डाॅक्टर सांगतो म्हणून आपण आपल्या भारतीय भोजन परंपरा अजिबात बदलू नयेत. पारंपारिक आहार तसाच घ्यावा. आहाराचे जे अगदी साधे सोपे नियम आहेत, ते उगाच क्लीष्ट करून, शरीरामधे ताण वाढवणारे, चुकीचे नियम, चुकीच्या समर्थनासह करून, सोपे साधे जीवन कठीण करून, रोग वाढवून घेणे आहे.
त्यामुळे पाणी फक्त जेवतानाच प्यावे. तहान नसताना, अन्य वेळी अजिबात नको. अन्य वेळी जे पाणी प्यायचे ते फक्त तळहाताच्या मधे राहील एवढे पळीभरच प्यायचे असते, हा नियम देखील देवपूजेतील आचमनातून आपण शिकलो आहोत.

“मग बाकी सर्वजण पाणी जास्ती प्या” असं का सांगतात? ते त्यांनाच माहिती !!! आपल्याला तहान लागली की, स्वतःला तहान असेल तेवढे पाणी, आपणच ठरवून प्यायचे असते. एवढे लक्षात ठेवावे. बाकी विषय संपला.

तर देवपूजा करणे हे सर्व जीवनावश्यक नियम समजावून सांगणे आहे. हे दररोज सांगावे लागतात. नाहीतर आपली चंचल बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हे सर्व उपचार दररोजच्या पूजेमधेच समाविष्ट करून टाकले.
सततम् क्रिया अभ्यासः । एखादी क्रिया सतत केली गेली की ती अंगवळणी पडते.

आजीआजोबा, आईबाबा यांनी जे नियम ठरवले ते तसेच पाळायचे असतात. स्वतःच्या पाश्चात्य बुद्धीने त्यात बदल केला की, पुढील पिढीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जसे भरपूर पाणी प्या, म्हणून एका वडील पिढीने सांगितल्यामुळे आताच्या पुढील पिढीमधे पाण्यामुळे होणारे प्रमेह, रक्तदाब, संधीवात, इ.इ. रोग वाढलेले दिसतात. हे “जनुकीय” बदल नाहीत तर जीवनशैलीतील बदल आहेत, जे आपण बदलवू शकतो. ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका जर सहवास आणि साहचर्याने जर पुढील पिढी करीत राहिली तर जनुकीय बदल न होता, चुकीची जीवनशैलीजन्य रोगांची संख्या मात्र वाढतेय, हे आपण आपल्या डोळ्यासमोर पहातोय.

आपणाला हे सर्व बदलायचे आहे. रोग कमी करायचे आहेत. डायबेटीस रक्तदाब पीसीओडी थायराॅईड यावरील गोळ्या एकदा सुरू झाल्या की, त्या कायम स्वरूपात घ्याव्याच लागतात, हे धादांत खोटे गृहीतक, रोगाबद्दलच्या काही चुकीच्या कल्पना डोक्यातून काढून टाकायच्या आहेत, जीवनशैलीतील दोष काढून टाकून, निरोगी, निरामय, निर्रौषध, जीवनशैली परत स्थापन करायची आहे. यासाठीच ही माझी देवपूजा !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.06.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..