प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.

हळू हळू एक एक शब्द वाचा. प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.

“अश्रु” सांगून जातात, “दुःख” किती आहे ?
“विश्वास” सांगून जातो, “जोडीदार” कसा आहे ?
“गर्व” सांगून जातो, “पैशाचा माज” किती आहे ?
“संस्कार” सांगून जातात, “परिवार” कसा आहे ?
“वाचा” सांगून जाते, “माणूस” कसा आहे ?
“संवाद” सांगून जातात, “ज्ञान” किती आहे ?
“ठेच” सांगून जाते, “लक्ष” कुठे आहे ?
“डोळे” सांगून जातात, “व्यक्ती” कशी आहे ?
“स्पर्श” सांगून जातो, “मनात” काय आहे ?
आणि “वेळ” दाखवते, “नातेवाईक” कसे आहेत.

भावकीतली चार माणसं “एका दिशेने” तेव्हाच चालत असतात. जेव्हा पाचवा खांद्यावर असतो.
संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो. की “लोक काय म्हणतील” ? आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात. की” “राम नाम सत्य है “..

माणसाची “कदर” करायची असेल. तर ‘जिवंतपणीच’ करा. कारण ‘तिरडी’ उचलण्याच्या वेळी ‘तिरस्कार’ करणारे सुद्धा ‘रडतात.’

मेल्यावर माणूस चांगला होता. असं म्हणण्याची ‘प्रथा’ आहे. आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही. हीच खरी ‘व्यथा’ आहे.

म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो ..

चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा. जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो.

कारण औषध जरी कडू असलं. तरी ते आपल्या फायद्याचे असते.

चांगल्या माणसांच सुद्धा अगदी नेमक तसच असतं ..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…