पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी
प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी

पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले
मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले

पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली
नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली

वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी
खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी

मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो
ध्यान अचानक लागूनी    स्वतःसी विसरलो

आनंदाचा मार्ग मिळाला   देई खरे समाधान
पूजा विधीतील भावाला    असे महत्वाचे स्थान

डॉ भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1440 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड

अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ ...

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर ...

जलग्राम : जळगाव

मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर ...

Loading…