नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अकरा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सतरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

हे सर्व कशासाठी, तर रोग होऊ नयेत यासाठी. रोगामुळे काय होतं ?
आयुष्य कमी होतं.
त्याने काय होतं ?
जीवनातील आनंद हरवून जातो. जीवन हे आनंद निर्माण करण्यासाठी आहे. सद्गुरू वामनराव पै म्हणतात तसं, हे जग सुखी व्हावे. याचा दुसरा अर्थ दुःख नाहीसे व्हावे, असा आहे. रोगालाच दुःख असे पर्यायी नाव देखील आहे.

रोग म्हणजे दुःख. पण औषध म्हणजे सुख नाही.

एक गोष्ट लक्षात येतेय का बघा. निरोगी राहण्यासाठी ग्रंथकारांनी या श्लोकामधे कुठेही औषधांचा पुसटसा उल्लेख देखील केलेला नाही.
या श्लोकामधे नित्यं हिताहारविहार औषधसेवी…. असं म्हटलेलं नाही. तशी गरजच नाही, याचा विश्वास ग्रंथकारांना आहे.

याचा अर्थ रोग होऊ नयेत यासाठी औषधे कधीही काम करीत नाहीत. हे पटतंय का ?

आयुष्यभर, मरेपर्यंत औषधं खाणं ही संकल्पनाच मुळी चुकीची आहे. आपल्याला त्रास असेपर्यंत औषध जरूर घ्यावे. भले कोणत्याही पॅथीचे असावे.

त्रास संपला की औषध संपलेच पाहिजे. जसं कावीळ झाल्यावर कावीळीवरील औषध जरूर घ्यावे.
किती दिवस औषध घ्यावे ?
कावीळ उतरेपर्यंत. म्हणजे कावीळीची शरीरावर असणारी लक्षणे नाहीशी होईपर्यंत औषधे जरूर घ्यावी. नंतर भूक वाढणारी औषधे घ्यावीत. नंतर मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी एखादे जुलाबाचे औषध घ्यावे. नंतर औषधांची गरज संपते.

रोगाची लक्षणे संपल्यानंतर रोगही विसरून जायचा आणि औषधे देखील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगाचा मनातला विचार देखील काढून टाकायचा, की मला असा रोग होता……

भूक वाढल्यानंतर आपला आहार विहार नियंत्रित असेल तर आपल्या शरीराला जे घटक हवे आहेत, ते सर्व शरीरालाच निर्माण करू देत. बाहेरून सतत मोजून मापून औषधांनी मदत पुरवून, शरीर निरोगी राहील, हा भ्रम आहे. असे होत नाही.

जसं कावीळीचं, तसंच तापासाठी. ताप उतरला तरी औषधं खायची आवश्यकता नसते. पण आजकाल रक्तदाब, मधुमेह, पीसीओडी, डिप्रेशन, यासरख्या अनेक आजारात यासाठी कायमस्वरूपी औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. काही मोजकेच आजार असे असतात, की औषधं घेईपर्यंत बरे असतात, आणि औषधे संपली की पुनः डोके वर काढतात. याला याप्य असा शब्द आयुर्वेदात वापरलेला आहे. काही आजार असाध्यच असतात, त्यावर औषधेदेखील काही काम करीत नाहीत, मग औषधे पचवायचे ज्यादाचे काम तरी कशाला द्यावे ? औषधे कधीपर्यंत सुरू ठेवावीत हे सुद्धा रोग्याच्या लक्षणावर आणि रोगाच्या अवस्थेवर अवलंबून असते. याचा निर्णय एखादा कुशल वैद्यच घेऊ शकतो.

औषध हेच माझे सर्वस्व आहे. औषधे घेतल्याशिवाय माझं काही खरं नाही, ताकद वाढण्यासाठी औषधे घेतलीच पाहिजेत, टाॅनिकशिवाय बाळ अंग धरणारच नाही, असं नाही. न्यायालयाच्या भाषेत सांगायचे तर, हे सर्व खोटं आहे

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

02362-223423.
०६.०८.२०१७

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..