नवरात्रीचा रंग – गहन निळा

आज नवरात्रीचा रंग – गहन निळा
आजचा विषय निळ्या रंगाचे ब्ल्यूबेरी
आवळा, जांभूळ, स्ट्रॉबेरी, तुती, करवंद या बरोबरच ‘ब्ल्यूबेरी’ हे बेरीवर्गीय फळा मध्ये येते. भारतात हे फळ जास्ती वापरले जात नाही. ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ आहे. ब्ल्यूबेरीची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन नावाच्या माणसाने याच्या बिया अमेरिकेत आणून त्याची लागवड केली. हे फळ स्कॉटलंडमध्ये ‘ब्लेबेरी’, नॉर्वेत ‘ब्लॅबर’ ओळखले जाते. विविध जाम आणि केक्समध्ये हे फळ वापरतात. निळ्या रंगांचं हे फळ चवीला मधूर असते. ब्ल्यूबेरीची पानं हिरवीगार तर फुलं घंटेच्या आकाराची असतात. त्यांचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो. फळाचा रंग अर्थातच निळा असतो मात्र कच्च्या फळाचा गर हा हिरवट रंगाचा असतो. असं हे फळ दिसायला अगदी बोरासारखं असून त्यात एक लहान बी देखील असते. जेली, जॅम, मफिन्स आणि स्नॅक्समध्ये वापरतात. पाश्चिमात्य देशांमध्ये पोषक ब्ल्यूबेरी फळाला चांगली मागणी आहे. हे फळ जास्त काळ टिकते. या फळाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. मेंदूच्या विकारांवर मात करून स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं. दररोज अर्धा कप ब्ल्यूबेरीचं सेवन केल्याने कर्करोगापासून संरक्षण करतं. त्वचेचा पोत सुधारते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं. मूत्राशयाचं आरोग्य सुधारून लघवी साफ होते. उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करते. यात जीवनसत्त्व ए, सी आणि ईचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचं काम करते. ब्यूर्बेरी ने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या फळाचं जरूर सेवन करावं. मेंदूचे कार्य उत्तम गतीने चालण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी ब्लूबेरीचा रस आरोग्यदायक ठरतो, असे संशोधन नुकतेच समोर आले आहे. त्वचा रुक्ष होण्यापासून टाळण्यासाठी ब्ल्यूबेरी खाणं उपयुक्त ठरतं.

रोझमेरी ब्लूबेरी स्मॅश
साहित्य : ७-८ ब्ल्यूबेरी, रोझमेरीचे तुरे, २ चमचे मध, २ चमचे लिंबूरस, १ कप सोडा, बर्फ.
कृती : रोझमेरीचे तुरे, ब्ल्यूबेरी आणि मध एकत्र करून नीट वाटून घ्यावे. त्यात लिंबाचा रस आणि बर्फ घालून ते एकत्र कॉकटेल शेकरमधून शेक करून घ्यावे. एका उंच पेल्यात थोडा बर्फ घालावा त्यावर हे मिश्रण ओतावे. आता यावर शीतपेय घालावे आणि रोझमेरीच्या तुऱ्यांनी सजवावे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2285 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…