नवीन लेखन...

नमस्कार – भाग ६

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग १००
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५६

जे जे देवासाठी ते ते देहासाठी या शृंखलेतील हा शंभरावा नमस्कार ! गेल्या वर्षी सुरू केलेल्या या पूर्ण मालिकेला खूप छान प्रतिसाद मिळतोय. किमान 450 भाग सलग लिहून झाले आहेत.

अनेकांचे खूप छान प्रतिसाद येताहेत. सर्वांनाच वेळेअभावी उत्तर देता येत नाहीये.

सर्वांचीच एक मागणी होती की, या लेखांचे एक संकलीत पुस्तक करावे. या मागणीचा आदर राखून, मार्च 2016 ते ऑगस्ट 2016 या सहा महिन्याचा लिखाणाचा सुमारे 180 आरोग्य टीपा असलेला पहिला संकलीत भाग या गणेशचतुर्थीला प्रसिद्ध होईल. ही आनंदाची गोष्ट. त्याची सविस्तर माहिती पुढील पाच सहा दिवसात नक्की होईल.

हे जे लिखाण होते आहे, त्याचा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे, हे मागील सर्व आरोग्य टीपा वाचल्यानंतर लक्षात येते आहे.” हे मी केले, पण म्या नाही केले अशी अवस्था आहे. असो !

अध्यात्म आणि विज्ञान, वेद आणि व्यवहार वेगळे नाहीत. फक्त दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. जे डोळ्यांना दिसत नाही ते नाही असे नाही. सर्वच गोष्टी विज्ञानाने तरी कुठे सिद्ध करता येतात ? अणु रेणु परमाणु तरी कुठे दिसतात ?

प्रदक्षिणा आणि साष्टांग नमस्कार यामागील आरोग्याचे वैज्ञानिक संदेश नेमके काय आहेत, हे आपण पाहात होतो. अध्यात्माचा विज्ञानाशी असलेला संबंध शोधण्याचा हा प्रयास आहे.

आरती नंतर घालीन लोटांगण, वंदिन चरण…म्हणताना स्वतः भोवती प्रदक्षिणा घालायची पद्धत आहे. आरतीला कोण कोण आले आहेत, ते सुद्धा दिसते.

प्रदक्षिणा ही व्हर्टीकल म्हणजे उभे राहून घातली जाते, तर लोटांगण हाॅरीझाॅन्टल, म्हणजे आडवे होऊन. या दोन्ही फिरण्यामधे एक गोष्ट समान दिसते, ती म्हणजे आपली रक्ताभिसरणाची दिशा बदलते. ज्याला भौतिक शास्त्रामधे सेंट्रीफ्युगल फोर्स का काय म्हणतात, तो काम करतो. तळातून वरपर्यंत एक लहर तयार होते. आणि वहनाची दिशाच बदलून जाते. ( लोटांगणाचे होणारे फायदे दि. 15.04.2016 च्या लोटांगणासन या टीपेमधे हे लिहिलेले आहे.) फक्त लोटांगण झोपून तर प्रदक्षिणा उभ्याने. शरीरातील प्रक्रिया तीच होते.

दोन्ही हात समांतर पसरून, डोळे बंद करून लहानपणी खेळलेली, गोल गोल राणी खोल खोल पाणी, असे म्हणत आपल्याच भोवती मारलेल्या गिरक्या आणि नंतर जाणारा तोल आणि झिंगल्यासारखी अवस्था, त्यातली गंमत आठवतेय का ?

स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायला सुरवात केली, की थोडं चक्करल्यासारखं वाटतं. म्हणून डोळे बंद करावेत. ते आपोआप होतातच.

या बदललेल्या गतीने काय होते ? अगदी सूक्ष्म प्रमाणात रक्ताभिसरणाची दिशाही बदलते. रक्ताचा प्रवाह पायापासून डोक्याच्या दिशेने बदलू लागतो. वावटळ किंवा हुरीकेन आल्यावर काय होते ? तळातील सर्व जड वस्तुदेखील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वर उडवल्या जातात. आत वारा गोल गोल फिरल्यावर या जड वस्तुंना वरच्या दिशेत ढकलले जाते. तसेच शरीरातील रक्ताला वरच्या दिशेत खालून वर असे ढकलले जाते. पायात साठलेले रक्त वर ह्रदयाच्या दिशेत ढकलायला ही प्रदक्षिणा काम करणार नाही का ? त्याचा वापर व्हेरीकोज व्हेन्स सारख्या कंटाळवाण्या, चिकट, कष्टसाध्य, याप्य आजारामधे होणार नाही का ? त्यातून नंतर होणारी व्हेरीकोज अल्सर सारखे आजार म्हणजे लई बेक्कार. ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. इथे प्रदक्षिणा काम करते. आत्मदेवाला प्रदक्षिणा घाला, व्हेरीकोज पासून मुक्ती मिळवा. जे जे देवासाठी ते ते देहासाठी !

केवळ व्हेरोकोजच नाहीत, तर शरीरात वरून खाली प्रवास करणाऱ्या अन्न, मल, मूत्र, रक्त इ. सर्व घन द्रवांची गती चिकित्सा स्वरूप बदलवायची असेल तर, म्हणजेच भूक न लागणे, मलविबंध, मूतखडे, रक्तदाब या सारख्या आजारावर किंवा हे आजार होऊ नयेत म्हणून प्रदक्षिणा घालण्या एवढा उत्तम उपाय नाही.

पुरणयंत्रामधे एकाच गतीने पुढे ढकलत नेलेलं पुरण, खालील गाळण्याच्या थाटीला चिकटल्यामुळे नीट गाळले जात नाही, त्यासाठी मधेच एक दोन वेळा पुरणयंत्राची गती बदलवली की कसं गाळण्याचं काम परत सुरू होतं तसं शरीरात देखील नेहेमीच्या गतीत थोडा फरक केला, की पुनः काम जोमाने सुरू होतं…….

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
20.07.2017

आजची आरोग्यटीप

या लेखावर अरविंद जोशी म्हणतात… 

प्रदक्षिणा देवळात जाऊन देवालाच घातल्या पाहीजेत असा सोईस्कर समज कोणी करू नये. घरात डायनिंग टेबलाला किंवा घरातील 2-4 खुर्च्या शेजारी चिकटवून ठेवून त्याला घातल्यातरी चालतात. वाटल्यास खुर्च्यावर घरातील वडीलधारी मंडळीना(असल्यास) बसवून,किंवा टेबलावर वा खुर्चीवर एखादा देवाचा फोटो वा मूर्ती ठेवून प्रदक्षिणा घालाव्यात.

खालील प्रयोग करून पहा व अनुभव सांगा.
हाय बीपी वाल्यानी नेहमी प्रमाणे म्हणजे क्लाॅक वाइज प्रदक्षिणा घालून पहावे
लो बीपी वाल्यानी उलट्या म्हणजे अँटीक्लाॅकवाइज प्रदक्षिणा घालून पहाव्यात.
ज्यांचे बीपी कधी हाय तर कधी लो होते त्यानी शंकराला घालतात तशा उलटसुलट प्रदक्षिणा घालून पहाव्यात.
हे 8-10 दिवस करून काय वाटले ते कळवावे
किमान अकरा प्रदक्षिणा रोज घालाव्यात

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..