नवीन लेखन...

नारीशक्ती हीच आदिशक्ती

प्रसन्न, उत्साही आणि सकारात्मक उर्जेची अनुभूती वातावरणात जाणवते कारण नवरात्रीस आरंभ झाला. आई अंबेच्या अनन्या रूपांना घरारात पुजल जातं कारण ती जगतजननी, विश्वनिर्माती आहे, आदिशक्ती आहे. ज्या आई अंबेचरणी आपण नतमस्तक होतो त्या आदिमायेची अनुभूती ही प्रत्येक घरात आहे ही वस्तुस्थिती आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सुध्दा ऊर्जेचा प्रथम स्त्रोत ” स्त्री” आहे. स्त्री हीच आदिशक्ती, यथाशक्ती आहे. स्त्री ही ऊर्जेचा केंद्रबिंदू नसुन ती स्वतः “ऊर्जाउगम”आहे. प्रत्येक स्त्री मध्ये ही अनन्य साधारण अशी ऊर्जा सामावलेली आहे. आणि म्हणूनच फक्त स्त्री हीच सृजननिर्मिती, सजिवनिर्मिती करू शकते. ती आधिशक्ति नसुन “आदिशक्ती” आहे. म्हणून सृष्टीवर असणार्या तिच्या उपस्थित रूपाचा सन्मान केला पाहीजे.

नवचैतन्य, नवऊत्साह घेऊन जेव्हा ती कन्या म्हणून घरात जन्माला येते तेव्हा शैलपूत्री म्हणून तिचं स्वागत केलं पाहिजे. विवाहपश्चात कुणाचीतरी अर्धांगींनी होऊन संसार समतोल राखण्याच कार्य जेव्हा स्त्री करत असते तेव्हा तिच्यातलं सतिरूपी, पार्वतीरूपी अस्तित्व मान्य केलं पाहिजे.

स्वतः मृत्यूच्या मूखात जाऊन जेव्हा ती नवजिवनिर्मिती करते तेव्हा तिच्यातील जगतजननी प्रत्येकाला शोधता आली पाहिजे. इवले इवलेशे हात हातात घेऊन जेव्हा ती अक्षरे गिरवायला शिकवते तेव्हा आपल्याला सरस्वतीचा साक्षात्कार झाला पाहिजे.

स्वतःच्या गुणकौशल्याने जेव्हा ती कुटूंबाच्या अर्थाजनात हातभार लावते व विवेकबूध्दिने आर्थिक नियोजन करून सदैव संपतीत वृध्दि करते तेव्हा ती निश्चितच लक्ष्मी असते. तिचं अस्तित्व अमान्य झाल्यास , तिची अवहेलना केल्यास जाज्वल रूप धरून बाणेदारपणे समाजाला तिच्या उपस्थितीची जाणिव करून देते तेव्हा तिच्यात दुर्गा जागृत झालेली असते.

जेव्हा ती सौंदर्यवती , रूपवती होवून जगाला भुरळ घालते तेव्हा ती महामाया असते. चारही बाजूंनी दुराचाराने कुरघोडी केल्यास रौद्र रूप धारण करून संहार करते तेव्हा ती काली असते………

घराघरात असणार्या या दैवी रूपाचा सन्मान प्रत्येक पूरूषान केला पाहीजे. देवीच्या मुर्तीसमोर नतमस्तक होताना आपल्या घरातही देवीचं मुर्त रूप आहे याची जाणीव असली पाहिजे. तसेच मीच आदिशक्ती, यथाशक्ती , ऊर्जाऊगम, सृजनकारीनी, जगतजननी, असुरसंहारनी आहे याची अनुभूती प्रत्येक स्त्री ला असली पाहिजे.

— श्रध्दा मधुकर पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..