Web
Analytics
ज्योतिष शास्त्र – माझा अनुभव – Marathisrushti Articles

ज्योतिष शास्त्र – माझा अनुभव

एक काळ असा होता जेंव्हा माझा ज्योतिष्यशास्त्रावर अजिबात विश्वास नव्हता. त्या काळात मी नवीनच मुंबईला आलो होतो आणि एका कुटुंबात PG म्हणून राहात होतो. त्या कुटुंबाचा ज्योतिष्यशास्त्रावर गाढ विश्वास होता, तसेच त्यांचे एक कौटुंबिक ज्योतिष्यी होते ज्यांचा सल्ला ते प्रत्येक महत्वाच्या कार्यासाठी आणि एखादी अडचण आली तर घेत असत. माझे आणि त्या कुटुंबाचे संबंध घराच्याप्रमाणेच निर्माण झाल्याने त्या कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीत ते मला सामील करून घेत असत.

अचानक त्यांच्या जवळच्या नातेवाईकाची तब्येत अत्यंत बिघडली आणि त्यांना त्यासाठी घाईने निघावे लागले. पण निघतांना त्यांनी माझ्याकडे त्या आजारी पडलेल्या नातेवाईकाची पत्रिका दिली आणि ज्योतिष्यांना भेटून त्यांचा सल्ला विचारून तो त्यांना फोन ने कळविण्यास सांगितला. मी appointment घेऊन ज्योतिष्यांना भेटलो आणि त्यांचा सल्ला विचारला. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की त्या व्यक्तीला काहीही धोका नाही दोन दिवसात ते व्यवस्थित घरी येतील जे तंतोतंत खरे ठरले.

त्या नंतर त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला एका conference निमित्ताने प्रथमच अमेरिकेला जाण्याचा योग आला. एका Travel कंपनीने त्या conference साठी एक विशेष टूर ठरविली होती. त्या व्यक्तीच्या प्रवासाच्या सर्व कागदी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि प्रवासासाठी फक्त दोन आठवडे राहिले असतांना त्या प्रवासासंदर्भात ज्योतिष्यांचा सल्ला घेण्याचे ठरले अर्थात त्यावेळेसही मी बरोबर होतो. ज्योतिषयांनी थोडी आकडेमोड केली आणि सांगितले की आत्ता एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या प्रवासाचा योग नाही आणि अमेरिकेचा प्रवास होणार आणि पण तो जून किंवा जुलै महिन्यात. माझाच काय त्या जाणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा या भविष्यावर विश्वास बसला नाही. पण बरोब्बर प्रवासाच्या दहा दिवस आधी निरोप मिळाला की ज्या travel कंपनीने त्या conference साठी जी टुर ठरविली होती त्या टूर ला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी ती टूर रद्द केली आणि सर्व पैसे परत केले. त्या अमेरिकेला जाणाऱ्या व्यक्तीची प्रवासाची संपूर्ण तयारी झालेली असल्याने त्यांनी दुसऱ्या टूर ची माहिती काढली आणि एका दुसऱ्या कंपनीच्या टूर मध्ये booking केले. ती दुसरी टूर जून महिन्यातील होती.

या दोन अनुभवानंतर माझा ज्योतिष्य शास्त्रावर विश्वास बसला नसता तरच नवल होते. मी लागलेच माझी जन्मपत्रिका आणवून घेतली आणि त्यांचा सल्ला घेतला …. पण त्यांच्या सल्ल्या आधारे मी जे निर्णय घेतले त्यात मी संपूर्णपणे तोंडघशी पडलो …

त्यानंतर मी ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास केला आणि माझा निष्कर्ष असा आहे ज्योतिष्य शास्त्र खरे आहे पण त्याचा आधार घेऊन भविष्य बदलता येत नाही.

>>ज्योतिष्यशास्त्र सुद्धा तुमच्या घडणार असणाऱ्या भविष्यासाठी कारणीभूत असू शकते<<<

— मिलिंद कोतवाल 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…