नवीन लेखन...

मोठ्यांचा खेळ होतो, आमचा जीव जातो

वाशीम जिल्ह्यातील सवड या गावात मोठी दुर्घटना घडली. १९ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे वॉकिंगला जाणाऱ्या तीन मुलांना एका अज्ञात कारने चिरडले. काहीही चूक नसताना बिचाऱ्या तिघांना आपला जीव गमवावा लागला.
रिसोड जवळील सवड येथील अंकित गौतम जाधव वय १४ वर्षे, वैभव विश्वनाथ वाकळे वय १५ वर्षे, करण लक्ष्मण खांदळे वय १३ वर्षे हे तिघे मित्र आज पहाटे ५:३० वाजताचे दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी आल्यावर वाशीम-रिसोड रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असतांना वाशीमवरून सुसाट वेगाने आलेल्या अज्ञात कारने या तिघांनाही चिरडले कार त्याच वेगात पसार झाली. कार ने चिरडल्याने घटनास्थळीच तिघांचाही मृत्यू झाला. जी सुसाट कार आली ती बहुतेक इनोव्हा असण्याची शक्यता मॉर्निंग वॉकला आलेल्यांनी व्यक्त केली. तिन मित्रांच्या आकस्मिक मृत्यूने सवड गांवावर शोककळा पसरली. अंकित जाधव हा रिसोडच्या शिवाजी हायस्कूलच्या इयत्ता आठवीत तर वैभव वाकळे हा इयत्ता नववी मध्ये शिकत होता. करण खांदळे हा सवडच्या सिद्धेश्वर विद्यालयात सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. मृतक तिघेही एकमेकांचे नातेवाईक असून त्यांची चांगली मैत्रीही होती. या तिघांपैकी वैभव वाकळे पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेला काळाने त्यावर घाला घातल्याचे त्याचा मोठा भाऊ साश्रुपूर्ण नयनांनी सांगत होता. दुर्घटनेनंतर तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले होते. तिथे शेकडो शोकमग्न नातेवाईक,मित्र गोळा झाले होते. १३- १४ वर्षे वयोगटातील त्या निरागस मुलांचे फोटो पाहिले तर मन सुन्न होते.

या घटनेवरून पुन्हा एकदा आठवण झाली. सलमानखाननेही मुंबईत असेच लोकांना चिरडले होते. त्यावर शहाणा गायक अभिजित याने तर हद्द ओलांडली. तो म्हणाला की, रस्त्यावर झोपणाऱ्यांचा मृत्यू कुत्र्यासारखाच होतो. काय म्हणाल अशा निर्लज्ज लोकांना. यातून समाजात वाढत चाललेली श्रीमंतांची मग्रुरीच दिसून येते. कारमधून सुसाट जाणारे श्रीमंत हे रस्त्याने पायदळ जाणाऱ्यांना किडे माकोडे समजतात की काय असा प्रश्न पडतो. यांच्याकडे पैसे असतात, गाड्या घेतात, सुसाट आणि बेदरकारपणे चालवून निष्पाप लोकांचे जीव घेतात. वाशीम जिल्ह्यातील या तीन बालकांचे जीव गेले. तो भामटा चालक आपली कार दामटत पळून गेला. आई-वडिल तर आपले लाडके गमवून बसले. अशांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही. हे आपले दुर्भाग्य. म्हणून अशा लोकांची मस्ती वाढत चाललेली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जर रस्त्याने पायदळ जाणाऱ्यांनीही असेच पाऊल उचलले तर काय होईल. त्यांचेही काही होणार नाही. पण अनेक निष्पाप लोकांचे प्राण तर वाचतील. आता सुसाट आणि बेदरकारपणे दुचाकी, चारचाकी वाहन चालवणाऱ्यांची मस्ती जिरवण्यासाठी पायदळ चालणाऱ्यांनीही कायदा हातात घेऊन त्यांच्यावर दगड भिरकावले. तर त्यात गैर काय असे सामान्य माणसाला का वाटू नये.

अपघातांचे हे प्रकार असेच जर सुरू राहिले तर चालकांना दगडधोंडे खाण्याचे दिवस दूर नाहीत. एवढे मात्र लक्षात ठेवावे. आपला जीव लाखमोलाचा वाटतो. तसाच दुसऱ्यांचा जीव समजून वाहन चालवले तर बिघडते कुठे. पण घाई वेळेची, मस्ती पैशाची, मौज वेळेची करत अनेकांना प्राण गमवावा लागतो. मोठ्यांचा खेळ होतो, अन गरीबांचा जीव जातो. असेच म्हणावे लागेल.

जनार्दन गव्हाळे,
खामगाव, जि. बुलढाणा. विदर्भ

Avatar
About जनार्दन गव्हाळे 9 Articles
दैनिक दिव्य मराठी औरंगाबाद येथे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी देशोन्नती अकोला, लोकमत अकोला, दैनिक दिव्य मराठी अकोला येथे काम केलेले आहे. तसेच समतेचे आद्य प्रवर्तक गुरू रविदास हे पुस्तक पद्मश्री प्रकाशन सावदा जि. जळगाव ने प्रकाशित केलेले आहे. स्वतंत्र असा विषय लिहिण्यासाठी नसून चालू घडामोडीवर भाष्य करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..