नवीन लेखन...

मोबाईल (सेलफोन)

मोबाईल फोन म्हणजे सेलफोन. यात मोबाईल हे नाव अशासाठी की, आपण कुठेही असलो तरी मोबाईलवर बोलू शकतो म्हणून आणि सेलफोन अशासाठी की, मोबाईल फोनच्या कार्यासाठी कुठल्याही महानगराचे काही विभाग पाडतात त्यांना सेल म्हणतात. त्यांच्या आधारे मोबाईल काम करीत असतो.

मोबाईल फोनने खऱ्या अर्थाने वॉक अँड टॉक म्हणजे चालता चालता बोलणे शक्य केले आहे. आता तर वाहन चालवतानाही लोक मोबाईलवर बोलतात. जगात १ अब्जाहून अधिक मोबाईल सेट आहेत व सहा व्यक्तींमागे एक मोबाईल असे प्रमाण आहे. मोबाईल फोनचे तंत्रज्ञान आहे त्याची मुहूर्तमेढ जेम्स मॅक्सवेलने विद्युतचुंबकत्वाचा शोध लावला तेव्हाच झाली होती.

त्यानंतर जर्मन वैज्ञानिक हेनरिच हर्ट्झ यांनी विद्युतचुंबकीय रेडिओ लहरी प्रयोगशाळेत तयार केल्या. मानवी आवाज रेडिओ लहरींच्या माध्यमातून पाठवण्याचे प्रयोग ऑलिव्हर लॉज, गुलिमो मार्कोनी व रेजिनाल्ड फेसेनडेन यांनी यशस्वी केले. आज आपल्याला जो मोबाईल दिसतो आहे तशा स्वरूपात तो तयार करून पहिला मोबाईल संदेश पाठवण्याचे श्रेय मात्र मार्टिन कूपर यांना जाते. ते मोटोराला कंपनीत सिस्टीम्स विभागाचे महाव्यवस्थापक होते.

मोबाईल फोनमध्ये मानवी आवाजाचे रूपांतर विद्युतचुंबकीय रेडिओलहरीत करून अँटेनातून त्या पाठवल्या जातात. नंतर त्या दुसऱ्या ज्याला कॉल केला आहे तो उपस्थित असलेल्या सेलफोन मास्टकडे जातात व नंतर हव्या त्या मोबाईलकडे वळवल्या जातात. मोबाईलमध्ये एक मायक्रोचिप असते ती संदेशांचे रूपांतर अंकीय संदेशात करते नंतर त्याचे रेडिओ संदेशात रूपांतर केले जाते. त्यात रेडिओ ट्रान्समीटर व रेडिओ रिसिव्हर असतो, संदेश पाठवणे व स्वीकारणे ही कामे ते करतात.

अनेक लोक जेव्हा एकाच वेळी कॉल करतात तेव्हा त्यांची सरमिसळ होत नाही कारण ते वेगवेगळ्या रेडिओ कंप्रतेवर बोलत असतात. आताच्या मोबाईलमध्ये डिजिटल तंत्रज्ञान वापरलेले आहे त्यामुळे एसएमएस, वेबपेजेस, गाणी, चित्रे पाठवता येतात. मोबाईल तंत्रज्ञान फार वेगाने बदलते आहे. मोबाईलचा वापर काही देशात फक्त मेसेजिंगसाठी, काही देशात कॉल करण्यासाठी केला जातो. मोबाईल हा एकप्रकारे वायरलेस रेडिओफोन आहे, त्यात वायरींच्या जंजाळाशिवाय तुम्ही बोलू शकता त्यामुळे तो कुठेही वापरता येतो. या साधनामुळे आर्थिक प्रगतीची दालने खुली झाली हे खरे असले तरी त्यामुळे लोकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण झाले, एवढे मात्र खरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..