नवीन लेखन...

मेरा भारत महान

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरुन – 
लेखक – संतोष रामचंद्र जाधव

मेरा भारत महान असं ट्रकच्या मागे लिहिलेले दिसतं. परंतु हे वाक्य वाचणारा मंत्री त्याचे कार्यकर्ते व देशातील इतर नागरिक त्यांच्या गाडीच्या मागे मात्र, ‘मेरा भारत महान’ असं लिहिताना दिसत नाहीत. ही बाब विचारतंद्री वाढवणारी आहे.असं का होतं? ट्रकवाला सोडून देशातील इतर लोकांना का वाटत नाही, की माझ्या गाडीच्या मागे मेरा भारत महान असं वाक्य असलेलं असावं. याची एक नाही, शेकडो उत्तरे बाजारात मिळतील. परंतु मानवी जीवनाचं मूळ ध्येय काय? या प्रश्नाचं अनेक पूरक उत्तरांसहित आणखी एक उत्तर सांगता येईल ते म्हणजे मुबलक पैसा कमावणे. हे एक ठोस उत्तर आहे. यासाठी पैसा उभा राहतो मोठ मोठ्या व्यावसायिक क्षेत्रांतून, उद्योगांतून, नोकरदार वर्गातून, मजुरीतून व अन्य कामगारांच्या बौद्धिक व शारीरिक मेहनतीतून…

वेश्यांच्या देहविक्रीतून, गुंडांच्या दादागिरीतून, वाटी घेऊन सिग्नलवर भीक मागण्यातून, साहेबांचं ढुंगण चाटून साहेबापुढे लाळघोटेपणा करून, साहेबाला रंडी देऊन, साहेबाला दारू पाजून, आणि हो गरिबांसाठी आलेल्या योजनेतून निम्मा पैसा लाटून मुबलक पैसा कमावता येतो.

हे सर्व कोण करत असतं? तर आपापल्या श्रद्धास्थानावर अपार श्रद्धा असणारे आपण सारेच. तेव्हा किळस वाटते या साऱ्यांची. यावेळी माझ्या आईचा एक डायलॉग आठवतो “ही विकृत माणसं आईजवळ झोपणार नि बायकोला सलाम करणाऱ्यांच्या वृत्तीतली असतात. स्वच्छ कारभाराची शपथ घेणारे आपल्यातला खलनायकीपणा जिवंत ठेवतात.या देशात आदर्शवत उत्सव फार कमी प्रमाणात साजरी होतांना दिसतात कारण,आदर्शांपेक्षा बेगडी मनोरंजन जास्त प्रमाणात हवं असतं आपल्याला.परंतु हे करत असतांना आपण मात्र भारताची महानता ढुंगणाखाली घालून बसतो.

भारत माझा महान आहेच! या देशात महान लोकांचे चरित्र विकायला आहे. समाज सुधारक, समाजसेवक, उत्तम राजकारणी, उद्योजक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ वगैरे वगैरे.तरीही अदिवाशांच्या ताटातला घास ओढतांना यांना थोडी ही शरम वाटत नाही. कारण, शरम गुंडाळून ठेवलीय त्यांनी निर्लज्जपणाच्या खूंटीला. आम्ही ठेवलेत आमचे आदर्श पुरुष पुतळ्यात आणि तस्बिरित बंदिस्त. तरीही आम्ही ग्रेटच अनुयायी.

टॅग लावलेल्या कपड्यांची तेव्हढीच किंमत देऊन स्टॅंडर्डपणा मिरवणारे आम्ही मेथीच्या जूडीचा भाव करतांना त्या भाजीविक्रेतेचा केविळवाणा चेहराही न पाहणारे आम्ही गरीब दरिद्री पामर आहोत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा लाटून घरच्या मुलांना उच्चशिक्षित करणारे आम्ही हिटलरच्या लिंगाचा अंश तर नाही आहोत ना? आम्ही पैसा कमवतो, भविष्य निर्वाह निधी साठवतो, विमा काढतो आपल्या सकट पुढच्या पिढीचं सुखकर जीवन व्हावे म्हणून.

आमची संस्कृती महान. आमचा इतिहास महान. आमचा धर्म महान. आमची जात महान. या सर्वांची महानता एकवटून आमचा देश महान नाही का? आणि हो तो जर महान असला तर तो ट्रकवाल्यापुरताच महान आहे का? भल्या मोठ्या महागड्या गाड्यांच्या मागे पक्षाचं- धर्माचं बिरूद मिरवतांना त्याखाली लिहा की “मेरा देश महान”  मग तुमचं अनुकरण देशातले इतर नागरिक आपसुकच करतील. कारण मोठ्यांचं अनुकरण करणे ही सामान्य माणसाची प्रेस्टिज असते. भारत माझा देश शाळेच्या व्हरंड्यापूरता न ठेवता तो आपल्या घरापर्यंत आपल्या आजूबाजूच्या परिसरापर्यंत पसरवण्याची जबाबदारी किमान आपली सुशिक्षितांची तरी नक्कीच असावी.असे मला ठामपणे वाटते.

ज्या त्या धर्माच्या प्रार्थना जर सहजपणे पाठ होतात तर भारताची प्रतिज्ञा आणि देशाच्या संविधानाची प्रस्तावना पाठ करायला आणि ती अंगीकरायला का वेळ लागतोय?

आपण कान पिरगळलेल्या कसायाच्या मागे मेंढरागत चालत राहायचं की आपली मुक्त वाट आपणच शोधायची याचे आत्मचिंतन व्हायला हवे. तरच खऱ्या अर्थाने मेरा देश महान होणार आहे. आपापल्या सांप्रदायिक खोपट्यातून बाहेर येऊन एकजुटीने आपण विकासाचे गीत गायला हवं तर आणि तरच मेरा भारत महान असण्याचा अभिमान साऱ्या जगाला अभिमानाने गर्जून आपल्याला सांगता येईल.

धन्यवाद!

संतोष रामचंद्र जाधव

(बोरशेती) परिस्पर्श स्वप्नोत्सव शहापूर जि.ठाणे

7507015488

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 370 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..