नवीन लेखन...

मराठी ‘माय’

 

मराठी चित्रपटांतून देखील पडद्यावरील ‘आई’ आपल्याला विविध रुपांतून भेटत आलेली आहे.

मी पहिला मराठी चित्रपट पाहिला, तो ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात’ हे गाणं असलेला ‘देवबाप्पा’. इयत्ता तिसरी मध्ये असताना. त्यासाठी भावे प्राथमिक शाळेपासून ‘विजय’ टाॅकीजपर्यंत बाईंनी आमची ‘परेड’ काढली होती. चित्रपट पाहिला. त्या चित्रपटांतील ‘विधवा आई’ तिच्या छोट्या मुलीने बाबा कुठे आहेत? असे विचारल्यावर तिची समजूत काढताना सांगते की, तुझे बाबा देवाघरी गेले आहेत. मग ती मुलगी देवबाप्पाला पत्र लिहिते. इथं भेटली ती ‘समजूतदार’ आई!

नंतर पाहिला भालजी पेंढारकर यांचा ‘छत्रपती शिवाजी’. त्यामध्ये पाहिली शिवबांना घडविणारी जिजाऊ! जिजाऊंनी महाराजांवर असे संस्कार, मार्गदर्शन केले की, ज्यामुळे महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली.

‘श्यामची आई’ चित्रपट पहाताना ‘श्याम’च्या ठिकाणी स्वतःला समजून चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगी मी हमसून हमसून रडलो. श्यामच्या ‘आई’ने केलेले संस्कार आयुष्यभर अंगिकारले.

गणपतीच्या दिवसांत रस्त्यावर ‘प्रपंच’ चित्रपट पहाताना त्यातील ‘आई’च्या भूमिकेतील, सोशिक सुलोचना कायम स्वरुपी लक्षात राहिली. आपल्या पाचही मुलांना घासातला घास काढून देणारी, मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोंबडीप्रमाणे त्यांना आपल्या उबदार पंखाखाली जपणारी ‘आई’ अविस्मरणीय अशीच आहे!

‘मोलकरीण’ चित्रपटातील ‘आई’, स्वतःच्या मुलाच्या घरात मोलकरीण होऊन राहते. तिने केलेली अळूची भाजी खाताना मुलाला आईची प्रकर्षाने आठवण होते, मात्र त्याच्या पत्नीच्या पुढे तो काहीएक बोलू शकत नाही. तिथं ‘वात्सल्यमूर्ती आई’ दिसली.

‘एकटी’ चित्रपटातील आपल्या एकुलत्या एक मुलाला (काशिनाथ घाणेकर) कष्टाने वाढवून, शिकवून त्याचे मनाप्रमाणे लग्न लावून दिल्यावर त्याच्याकडून मिळणाऱ्या पैशापेक्षा तो जवळ असावा अशी दिवाळीत अपेक्षा करुन वाट पहाणारी सुलोचना ‘आई’ पहाताना आजही कंठ दाटून येतो.

दादा कोंडके यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात ‘आई’ ला अनन्यसाधारण महत्त्व दिले. भोळे भाबडे दादा आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी अडाणी ‘आई’, रत्नमाला हे समीकरणच झाले होते. कालांतराने रत्नमाला गेल्यानंतर त्यांच्या आईची भूमिका इतर अभिनेत्रींनी साकारली, मात्र त्यांना रत्नमालाची सर त्यांना कदापिही आली नाही.

‘अरे संसार संसार’ चित्रपटात रंजनाने तरुण पत्नी ते वृद्ध आई पर्यंतची भूमिका उत्तम साकारली. हिंदीतील ‘मदर इंडिया’ प्रमाणे वासनांध सावकाराशी ती शेवटपर्यंत झुंज देते. रंजनाला या ‘आई’च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळाला.

‘हेच माझं माहेर’ चित्रपटातील सासू (सुलभा देशपांडे) व सून (मधु कांबीकर) यांच्या नेहमी होणाऱ्या वादांमुळे मुलगा (रवींद्र महाजनी) कंटाळून जातो. तसंच आपल्या सुनेला न वागवता ‘समजून घेणारी आई’ मधु कांबीकर यांनी उत्कृष्टपणे साकारली.

लक्ष्मीकांत बेर्डेच्या आईच्या भूमिकेत मधु कांबीकर अनेक चित्रपटांतून दिसल्या. आज लक्ष्या या जगात नाहीये, त्याची ‘आई’ मात्र गेले अनेक वर्षे खाटेवर उपचार घेत पडून आहे.

‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ नाटकातून अवघ्या महाराष्ट्राची ‘ताई’ झालेली आशा काळे, ‘आई पाहिजे’ चित्रपटात बाणेदार, कणखर ‘आई’ झाली.

महेश मांजरेकरने ‘आई’च्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका, असा संदेश देणाऱ्या ‘आई’ (नीना कुलकर्णी) चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट सुवर्णमहोत्सवी झाला. त्याच ‘आई’च्या आशिर्वादाने आज तो हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत यशाच्या शिखरावर पोहोचलेला आहे.

मराठी चित्रपटांत ललिता पवार, अलका इनामदार, आशा पाटील, सरोज सुखटणकर, लता अरूण, वत्सला देशमुख, माई भिडे, हंसा वाडकर, सुमती गुप्ते, इत्यादींनी ‘आई’ साकारली आहे.

नव्या पिढीनुसार मराठी चित्रपटांतील आजची आई बदललेली आहे. तिनं नवीन टेक्नॉलॉजी समजून घेतलेली आहे. आयटी क्षेत्रात काम करुन ती घर-संसार करते आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हाॅटसअप, ट्वीटर, ब्लाॅग ती लीलया हाताळते आहे. माॅड असली तरी ती काळाप्रमाणे चालणारी एक ‘आई’च आहे.

‘जागतिक ‘आई’ दिना’ निमित्त जगातील सर्व आईंना विनम्र अभिवादन!!!

© – सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

९-५-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 335 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..