नवीन लेखन...

मराठी इतिहाससंशोधक त्र्यंबक शंकर शेजवलकर

मराठी इतिहाससंशोधक, लेखक, संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म २५ मे १८९५ रोजी कशेळी येथे झाला.

त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झाले आहेत. ते या साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़ संस्थापकांपैकी एक होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. एम. ए. ह्या पदवीसीठी त्यांनी मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव ह्या विषयावरील प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता पण परीक्षकांशी मतभेद झाल्याने त्यांना तो मान्य झाला नाही आणि त्यामुळे शेजवलकरांना एम. ए. ही पदवी मिळाली नाही. मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली. मुंबईच्या कर्नाटक छापखान्याने त्यांच्या संपादकत्वाखाली ८ जून १९२९ रोजी प्रगती हे साप्ताहिक सुरू केले. ते त्यावेळेच्या ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे १९३२ साली बंद पडले. प्रगती साप्ताहिक बंद पडल्याने शेजवलकरांना मानसिक धक्का बसला आणि त्यातून सावरायला त्यांना काही वर्षे लागली. १९३९ ह्या वर्षी पुण्यातील डेक्कन कॉलेजचे पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत (पोस्ट ग्रॅज्युएट अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये) रूपांतर झाल्यावर तिथे ऑगस्ट १९३९ मध्ये त्यांची मराठा इतिहासाचे प्रपाठक (रीडर) म्हणून नेमणूक करण्यात आली. २५ मे १९५५पर्यंत ते ह्या संस्थेत कार्यरत होते.

निवृत्तीनंतर त्यांचे इतिहासविषयक संशोधन चालू राहिले. ह्या काळातच त्यांचे निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१ हे ग्रंथ प्रकाशित झाले. मुंबईच्या मराठा मंदिर ह्या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्राचे काम सोपवले होते. पण ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही.

इतिहासाचार्य राजवाडे यांच्याप्रमाणे फटकळ व आग्रही तसेच प्रखर बुद्धीमत्तेचे आणि चतुरस्र विद्वान म्हणून शेजवलकर ओळखले जातात. ते निव्वळ संकलक-संशोधक नव्हते, तर इतिहासाचे प्रतिभावंत भाष्यकार आणि समाजचिंतक होते. आधुनिक मराठी इतिहासलेखनपरंपरेत तात्त्विक, बहुशाखीय आणि स्वयंभू मर्मदृष्टी लाभलेल्या न्यायमूर्ती म. गो. रानडे व वि. का. राजवाडे यांच्यासारख्या मोजक्या इतिहासकारांमध्ये शेजवलकर यांची गणना करावी लागेल. शेजवलकर हे अविवाहित होते.

त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे २८ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..