नवीन लेखन...

मंतरलेले दिवस – भाग १

जून महिना सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळा पूर्व तयारीचे.

पूर्वी भात शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर चालायची. वैशाख महिन्यात सूर्य आग ओकायचा. अंगाची लाही लाही व्हायची. त्यासाठी भल्या पहाटे शेतात जाऊन काम करावे लागायचे.

भाताचे रोप तयार करण्यासाठी तयारी करायची.भाताचे रोप तयार करण्यासाठी भात खाचरात एक आयताकृती पट्टा तयार करायचा. याला शेतकरी रोमठा म्हणतात. भल्या पहाटे बैल जुंपून आम्ही रोमठा तयार करण्यासाठी जात असू. सकाळी 8.30 पर्यंत नांगरून झालेले असायचे.

बैल सोडून त्याना एकदोन पेंढ्या खायला घालून पाणी पाजून आणायचे. काम आम्हाला करायला लागायचे. तो पर्यंत माझा नाना दुसऱ्या शेतकऱ्या कडून लोड आणायला जायचा.

त्यानंतर पुन्हा लोड (मोठे खंबा सारखे लाकूड) बैलांना जुंपून काम सुरू व्हायचे.लोडावर बसायला मोठी मजा वाटायची. आम्ही एक दोन जण खास लोडावर बसण्यासाठी तेथे हजर असायचो. लोडावर बसल्यामुळे जमीन नांगरलेली मोठमोठी ढेकळे फुटायची. त्यामुळे लोडावर बसण्यासाठी खास आम्हाला आमंत्रण असायचे. लोडावरून पडून कधी अपघात व्हायचा. हातपाय सोलपाटायाचे.मुका मार लागायचा. तरीही लोडावर बसायची हौस कमी व्हायची नाही.
नांगरलेल्या जमिनीवर लोड फिरवल्याने जमीन अगदी एकसारखी सपाट व्हायची. सगळी ढेकळे बारीक झालेली असायची.

एव्हाना सकाळचे साडे अकरा वाजलेले असायचे. नाना औत सोडून बैलांना घेऊन घरी जायचा. आम्हा पोरांचा ताफा विहिरीच्या दिशेने निघायचा. लोडावर बसल्या मूळे सर्वांगावर माती चिकटलेली असायची.शिवाय उन्हाच्या कहिलिने अंग तापून गेलेले असायचे.कधी एकदा विहिरीत उडी मारू असे व्हायचे.
आम्ही विहिरीत पटापट उड्या मारायचो. पाण्यात पडल्यावर स्वर्गीय आनंदाची प्राप्ती व्हायची.

काही पोरं विहिरीच्या काठावरून अशी काही उडी मारायचे की विहिरीत पाण्याची मोठी लाट निर्माण व्हायची. त्या लाटेच्या हिंदोळ्यावर आम्ही स्वार व्हायचो. या लाटेच्या हिंदोळ्यावर पोहायला खूप मजा वाटायची. तास दोन तास विहिरीवर पोहून घरी जायचो.

रोमठा पाडून झाल्यावर दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी उठुन साठवलेले वाळलेले शेण (गोवर) हारा आणि पाट्यामधून आम्ही डोक्यावर वाहून शेतात न्यायचौ. माझा नाना प्रत्यकाकडून गोवरने भरलेला हारा/पाटी उतरून घेऊन विशिष्ट पध्हतिने रोमठयावर भिरकावयाचा.

पूर्वी लोक रानातील वाळलेले गवत काढायचे. त्याचा उपयोग गुराढोंरासाठी व छपरे शाकारन्या साठी केला जायचा. वाळलेल्या गवताच्या पेंढ्या ह्या कडे कपारीत ,जेथे गुरे जाणार नाहीत अशा ठिकाणी ठेवत असत.

आम्ही या गवताच्या पेंढ्याचे ओझे डोक्यावर घेऊन शेतातील रोमठयाच्या दिशेने निघायचो. गवताच्या ओझ्याखाली डोके खुपसल्या मूळे पुढे काही दिसायचे नाही. ओझे सतत खालीवर करावे लागे. अंदाजाने चालावे लागे. या धान्दलित कधीकधी ओझे सुटायचे. कसेबसे शेतात पोहचायचो. नाना प्रतेक पेंढी सोडून बाळलेल्या शेणावर पांगवायचा. नंतर आम्ही झाडाखाली असलेले बाळलेला पालापाचोळा डालग्यात वाहून अनायचो. नाना हा पालापाचोळा गवतावर पसरायचा. त्यावर थोडासा माती मोडक्या सुपा तुन टाकायचा. यालाच दाढ भाजणे म्हणतात.

आम्हाला नाना दाढ कधी पेटवानर याची उत्सुकता लागायची. नाना हवेच्या उलट्या दिशेने माचीचच्या काडीने दाढ पेटवयाचा. ताडताड करीत गवत पेटायाचे. आकाशांत धुराचे लोट दिसायचे. आम्ही धुराच्या लोटातून उड्या मारायचो. धुरात शिरल्यावर पुढे काहीच दिसायचे नाही. शिवाय जीव गुदमारायचा. तरीही आम्ही त्या धुरातुन पळायचो. एक वेगळाच आनंद मिळायचा.

दाढ पेटवल्यावर आम्ही विहिरीवर जाऊन तास दिड तास पोहयचो. नंतर घरी येऊन जेवयचो. दुपारी परत शेतात जाऊन दाढ पाहायला जायचो. काळीभोर दाढ पाहून यंदा चांगले भाताचे रोप येणार याचे समाधान वाटायचे.

दाढ भाजल्यावर भूशभूशीत केलेली जमीन भाजून निघायची. जमिनीत असलेले तण व त्याचे कंद जळून जायचे. त्यामुळे दाढीमध्ये अजिबात गवत अथवा तण उगवत नसत. शिवाय क्रुत्रिम खत मारायची गरज भासत नसे.

आता लोक गुरे पाळत नाहीत. दाढ भाजत नाहीत. काही लोक तर शेतीच करत नाही. एके काळचे वैभव लयाला जात चालले आहे. एके काळी आपल्या घरात दहा पंधरा गुरे ढोरे होती. दूध दुभते होते. दहा पंधरा माणसे आजी अजोबा असायचे.शेतीची औजरे नांगर हाळस जूकाड रुमने शिवळ फाळ वसु साखळी जुपन्या येल कासरा मूसकी लोड कुळव फराट अश्या अनेक वस्तू असायच्या.

यापैकी आता काहीच राहिले नाही. गावाला कधीकाळी गेल्यावर कुलूप बंद असलेले घर बघून पूर्वीचे गतवैभव आठवते आणि मन सुन्न होते.

लेखक – श्री. रामदास तळपे – मंदोशी

लेखकाचे नाव :
रामदास तळपे
लेखकाचा ई-मेल :
rktalpe9425@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..