नवीन लेखन...

मानवी संबंध, चित्रपट आणि इतर माध्यमे.

आज प्रत्येकाला स्पेस हवी असते. मग नवरा असो, बायको असो किंवा प्रियकर आणि प्रेयसी असो. ही स्पेसची काय भानगड आहे असे तर कुणी ६० प्लस किंवा ६५ प्लस ना विचारले तर निश्चित तोड वाकडे होते का कुणास ठाऊक त्यांच्या मीटर मध्ये स्पेस ही कल्पना बसत नाही. तर कुणी ६० प्लस मध्ये असले तरी मान्य करते.नीट पाहिले तर पूर्वीपासून हे असे नवे विचार किंवा नव्या कल्पना चित्रपट माध्यमातून, नाटकांमधून येत असत आज त्यामध्ये आणखी भर पडली आहे ती टीव्ही मालिका आणि वेब सिरीज यामधून देखील.अगदी ‘ यमुना जळी खेळू…’ हे गाणे आपण बोल्ड म्हटले तेव्हापासून जर बघीतले तर जाणवले. आज तर स्त्री देखील सर्वच दृष्टीने भक्कमपणे स्वतःच्या पायावर उभी राहिली असून ती हे जोखड झुगारून देत आहेत, मग त्यातून नीती, अनीती, किंवा संस्कार या शब्दांचा वापर हल्ली घरा घरातून केला जात आहे विशेषतः रुढीप्रिय तो सुद्धा घरांमधून अर्थात नवीन पिढीकडून त्याला विरोधही होताना दिसतो, बाप कर्मठ एडेल आणि त्याच्या मुलीने किंवा मुलाने जर त्याच्या मनाप्रमाणे नाही वागले तर घरांमध्ये वादळ निर्माण होतेच होते.

खरेच ह्या सर्व गोष्टींवर या सर्व माध्यमांचा प्रभाव किती? असा विचार केला तर तो खूपच असतो, बुद्धिजीवी वर्ग म्हणेल कदाचित नसतो पण तो असतो फक्त तो प्रभाव कुठपर्यंत पसरलेला आहे त्याच जाणीव त्याला नसते.पोर्न विडिओ तर सर्रास बघीतले जातात, व्हीगो अँप्स वर हजारो लहान लहान विडिओ बघीतले तर हैराण व्हायला होते. मध्यम वयाच्या, मध्यम परिस्थिती किंवा कधी कधी उत्तम स्थिती असलेल्या स्त्रिया त्यांचे नवरे कामावर गेल्यावर किंवा बाहेर गेल्यावर हिंदी, बंगाली किंवा तत्सम भाषेतील जे व्हिडीओ अपलोड करतात ते बघून हैराण होते आणि जाणवते. चित्रपटांमधील प्रत्येक प्रसंगाकडे कसे बघीतले जाते ते.राजकपूरचे चित्रपट संगम, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम किंवा देवानंदचे गाईड किंवा हरे राम हरे कृष्ण सारखे चित्रपट तर अजचया काळतील म्हणजे काही वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘ चिनी कम ‘ घ्या किंवा आजचे चित्रपट घ्या जे सामाजिक विषय उत्तमपणे मांडलेले असतात, त्याचा प्रभाव पडतोच पडतो आणि पडत रहाणार.

हे सर्व बघताना एक प्रश्न सतत विचारला जातो या मुळे लग्नसंस्था मोडकळीस आली आहे का लग्नसंस्था ही दुय्यम मानली जाईल का अशी भीती व्यक्त केली जात आहे का, आजची स्त्री काय पुरुष काय कुठलेही जोखड वहाण्यास तयार नाही कारण दोघेही सक्षम झालेले दिसतात. माझ्या ओळखीची मुलगी आहे, आता ती 23 ते 24 वर्षाची आहे, मध्यम वर्गीय आहे तिने एक मुलगा पसंद केला आहे तीन वर्षे झाली परंतु लग्न करत नाही, तिला नोकरी आहे फारशी मोठी नाही, तिला विचारले लग्न का नाही करत तर म्हणाली भीती वाटते कारण दुसऱ्याच्या घरी ऍडजस्ट होईन का नाही याबद्दल ती साशंक आहे.म्हणजे तिला भीती आहे त्याचा स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस हल्ली ना पुरुष किंवा स्त्री घ्यायला धजावत नाही कारण एकच आहे,लग्नानंतर जे काही करावे लागते, मूल आले मुलाचे कुटूंबीय आले या सर्वांना तोड देणे हे त्यांना आणि त्यांच्या बुद्धीला झेपणार नाही हे त्यांना सरळ सरळ जाणवते.

चित्रपटातून, नाटकांतून असे प्रसंग आपल्याला बघण्यास मिळतात. चित्रपट किंवा नाटक म्हणजे आयुष्य नसते ह्याची पण त्यांना जाणीव असते पण अशा कलाकृतीमधील जर्म त्यांना अस्वस्थ करतोच करतो.फार वर्षांपूर्वी छोटी सी बात, रजनी गंधा सारखे चित्रपट आले असताना प्रेमाच्या आणि सौन्दर्याच्या व्याख्या त्या कालखंडात बदललेल्या जाणवलेल्या होत्या, आता मात्र इतके भाबडेपणा राहिलेला नाही हे निश्चित, कारण सेक्स तर आहेच पण प्रत्येकजन स्त्री असो की पुरुष स्वतःची सिक्युरिटी निश्चित अजमावून बघत असतो. हे सर्व करताना तो सतत नातेसंबंधी साशंक रहात आहे हे आजकाल जास्त जाणवत आहे अर्थात पूर्वीपण असेच होते परंतु ते व्यक्त होत नव्हते आता ते उघडपणे व्यक्त होत आहे आणि ते सुद्धा अनेक माध्यमातून.

मग आजचा तरुण किंवा तरुणी जास्त विचारी झाला आहे का? तर उत्तर हो असेच द्यावे लागेल कारण पूर्वी चित्रपटांचा प्रभाव जास्त हेअर स्टाईल, कपडे, वावरणे, बोलणे यावर होत असे परंतु आता चित्रपट काढताना सामान्य प्रेक्षक डोळ्यासमोर असतो आणि बुधीमानही म्हणण्यापेक्षा सामान्य प्रेक्षकापेक्षा जरा जास्त स्तर उंचावलेला. आपण एक चूक करतो की फक्त शहरातला प्रेक्षक आणि एक दोन वृत्तपत्रे ज्या वृत्तपत्रातून परिक्षणे येतात माझ्या दृष्टीने हल्ली या परीक्षांना काहीच अर्थ नसतो कारण ते बघून येतच नाही. पूर्वी पण असेच होते.

फार पूर्वी अलका कुबल यांचा एक चित्रपट भरपूर गाजला परंतु परीक्षणे मात्र विरुद्ध होती आता अशा परीक्षणांना लोक जास्त धूप घालत नाहीत त्यांना हवे ते बघतात, कारण हे वाचणारे फक्त साडेतीन टक्के असतात?अर्थात मी हे धाडसाने बोलत आहे पण करावे लागते कधीकधी.? जर तुम्ही दिल्ली, हरियाणा किंवा त्या भागात गेलात तर चित्रपटांचा प्रभाव किती जबरदस्त आहे हे जाणवते. जर कुणी ‘ व्हिगो ‘ नावाचे ऍप बघीतले तर हैराण व्हाल. तेथील किंवा बंगाल किंवा अनेक प्रांतामधील तरुण मुले मुली यांनी जे व्हिडिओज अपलोड केले आहेत ते पाहिले तर चित्रपटांचा, फॅशन्स आणि त्यामध्ये दिसणाऱ्या सेक्स कंझ प्रभाव कितीजबरद्स्त आहे हे जाणवते. ह्या सर्व गोष्टी पहाताना स्त्री पुरुष नाते संबंध किती घट्ट आणि किती सैल आहेत हे जाणवते.

चित्रपट, नाटके सिरिअल्स, वेब सिरिअल्स ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाला विचार करण्यास लावतात आणि प्रत्येकजण आपापल्या क्षमतेने त्याचा किंवा त्याच्याबद्दल विचार करतो?मग लग्नसंस्थेचे काय? ती टिकेल का? असे प्रश्न विचारले जातात ते फक्त काही लोकांकडून की जे त्यांच्या ‘ लग्नसंबंध ‘ धर्माशी निगडीत आहेत. तशी गम्मत आहे पूर्वी पासून अगदी ‘ यमुना जळी खेळ…’ या गाण्यापासून ते आताच्या टुकार म्हणून सांगितलेल्या गाण्यापर्यंत त्याचा प्रभाव आहेच आहे हे मानावेच लागेल. ह्या सर्वामुळे स्त्री पुरुष नातेसंबंध काय सागतात, एकमेकांना एकमेकांचा कंटाळा का येतो? त्यांच्या सेक्स बद्दल त्यांना आकर्षण का वाटत नाही, किंवा ते ‘ रुटीन ‘ वाटते म्हणून अशी अनेक करणे आहेत. वात्स्यायनाने जी संभोगा बद्दलची आसने दिली आहेत त्याकडे दुर्लक्ष होते का आणि नावीन्य उरत नाही किंवा दरोरोज काय तेच तेच ते ही भूमिका एकमेकापासून दूर करते, सेक्स बद्दल चर्चा करणे वाईट आहे का किंवा जोडीला अहंकार आणि मीच श्रेष्ठ हीच भूमिका अशी अनंत कारणे लग्नसंस्थेवर परिणाम करणारी आहेत किंवा लिव्ह रिलेशन याचे उदात्तीकरण करणारी आहेत? खरे तर प्रत्येक कारण विस्ताराने लिहिले तर खुप काही गोष्टी उलगडल्या जातील, तूर्तास इतके पुरे? चित्रपटांचा प्रभाव तर आहेच परंतु आता त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या नातेसंबंधांवर देखील समाज, प्रेक्षक विचार करू लागला आहे आणि गांभीर्याने हे देखील महत्वाचे आहे. एकच सागतो रेखाचा ‘ उत्सव ‘ हा चित्रपट जरा आठवून बघा?

आता आपण 2020 मध्ये गेलो तर वेब सिरीज आणि टीव्ही च्या सिरीज यामधील स्त्री पुरुष यांच्यामधील संबंधावर वेगळाच झोत पडतो, टीव्ही सीरिअल मधील लग्नबाह्य संबंध सासू सून प्रकार बघितला तर भंकस जास्त आहे तरीपण बघीतले जातात, हिंदी मध्ये मोठ्या प्रमाणात बघीतले जाते पण त्यातल्या त्यात वेब सिरीज जास्त बघितल्या जातात परंतु त्या सगळ्याना म्हणजे अगदी सहजपणे बघता येत नाही, टीव्ही चे तसे नाही अगदीं झोपडीतला सामन्य माणूस बटन दाबले की चालू होते त्याला हवे ते.

लक्षात ठेवा नुसते चित्रपट नाही तर जोडीला हा इडियट बॉक्स आहे, सोशल मिडियाही आहे.

कोरोना नंतर निश्चित या स्त्री पुरुष नातेसबंधावर वेगळाच प्रकाश पडणार आहे कारण हनिमून नंतर खूप जास्त काळ पती पत्नी एकत्र आल्या मुळे एकमेकांना नको तितके कळले असतीलही, अर्थात त्याचे पडसाद ह्या सर्व माध्यमात उमटतीलच?

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..