नवीन लेखन...

मदत! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ७

ख्रिसमस नुकताच झाला होता. दिवस लहान आणि रात्री विस्तारित होत होत्या. हाडाला काटे आणणारी थंडी आणि तिच्या सोबतीला हिमवर्षाव. अश्याच एका, गारठून गेलेल्या रात्री, तो तरुण एकटाच आपल्या सेकंडहॅन्ड कारने घरी निघाला होता. रात्र कसली? फार तर रात्रीचे आठ साडे आठच झाले होते. पण या गारठ्यामुळे सर्वत्र सामसूम झाली होती. मध्य रात्री सारखी! छुट पुट दुकानांचे दिवे मात्र नजरेत भरत होते, ‘लवकरच हॅन्डग्लोज बदलावे लागतील. हे चार जागी फाटलेत. झाली काही पैश्याची सोय तर बघू. पण या थंडीच्या दिवसात गरजेचे आहेत.’ अश्या काहीश्या विचारात असताना, हेडलाईटच्या प्रकाशात, एक कमरेत वाकलेली म्हातारी बाई जाणाऱ्या गाडयांना थांबण्याचा इशारा करत असताना त्याला दिसली. काही अडचण असेल का? का ट्रॅप असेल? आसपास गडद अंधार होता.
त्याने आपली गाडी थांबवली. हेडलाईट्स चालूच ठेवले. जवळ आल्यावर त्याला मार्चिड्स कारचे टेललाईट स्पष्ट दिसले. ती म्हातारी पाय खरडत त्याच्या कार कडे येऊ लागली. तिला चालताना त्रास होत आहे, हे त्याच्या लक्ष्यात येताच, तो झटक्यात गाडी बाहेर आला. आणि तिला हाताने थांबण्याचा इशारा केला.
“गुड इव्हनिंग मॅडम. काही अडचण आहे का?”
“थांबल्या बद्दल धन्यवाद. माझी गाडीचे एक टायर फ्लॅट झालंय. मी तासाभरापासून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण अश्या कडाक्याच्या थंडीत कोणी थांबत नाही. डिकीत स्टेफनी आहे, पण हे काम माझ्या कुवती बाहेरच आहे. मला मदत कराल?” तिच्या आवाजात असहायता आणि आर्जव काळजाला भिडणारा होता. बराच वेळ उभे राहून तिचे पाय लटपट होते.
“मॅडम, तुम्ही आधी तुमच्या कार मध्ये बसा. आत सिटखालचे हिटर ऑन केले तर तुम्हास उबदार वाटेल. बाहेर खूप गारठा आहे. मी काही करता येते का पहातो. तुम्ही फक्त ती डिकी अनलॉक करा.”
“थँक्स.” असे पुटपुटत ती तिच्या कारमध्ये घुसली. डिकीची लाच तिने आतून उघडली.
त्याने डिकीतून स्टेफनी आणि जॅक बाहेर काढला. फ्लॅट टायरच्या बाजूने लावला. साधारण वीस मिनिटात त्याचे काम संपले. जॅक -टायर आणि इतर साहित्य डिकीत लोड करून त्याने डिकी बंद केले.
“मी चाक बदली केलंय. तुम्ही आता तुमच्या घरापर्यंत ड्राइव्ह करू शकता.”
“मी खरेच तुमची खूप आभारी आहे. तुम्ही केलेली मदत पैशात मोजता येत नाही, तरी मी तुम्हाला काही तरी देणे लागतेच. किती देऊ ते सांगा! ” त्या म्हातारीने तिच्या पर्सला हात घालत विचारले. किती पैसे मागावे? हि अशी वेळ होती कि, त्या बाईने, तो म्हणेल तितके पैसे दिले असते. शंभर डॉलर? पाच शे डॉलर? त्याने क्षणभर विचार केला.
“मॅडम. थँक. पण तुम्ही मला काहीही देणं लागत नाहीत! मला तुमचे पैसे नकोत! तुम्हाला मी ‘मदत’केली आहे. व्यवहार नाही! तुम्हाला याची परत फेड करायचीच असेल तर, तुम्हीहि, एखाद्या अशाच अड्चणीतल्या व्यक्तीला ‘मदत’ करा. मलाही कोणी तरी, मी अडचणीत असताना मदत केली होती. त्याची भरपाई मी आता तुम्हास मदत करून केली. हि मदतीची शृंखला अखंड ठेवण्याचा प्रयत्न मात्र करा, हीच विनंती. हैप्पी जर्नी!”
तो तरुण आपल्या गाडीत बसून निघून गेला.
आजवरच्या तिच्या आयुष्यात असा प्रसंग आला नव्हता. उलट अडचणीतल्या माणसाला लुबाडणारे ठायी ठायी भेटले होते. त्या म्हातारीनं आपली गाडी सावकाश सुरु केली आणि घर गाठण्याच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रवासाला लागली. वाटेत तिला एक छोटेसे रेस्टोरंट नजरेस पडले. इतकावेळ न आठवलेली भूक एकदम जागी झाली. तिने गाडी तिकडे वळवली.
रेस्टारेंट बंद करण्याच्या नादात असलेली एकुलती एक वेट्रेस तत्परतेने जवळ आली. गरम सूप तिने पुढ्यात ठेवले.
“मॅडम, आज गारवा जरा ज्यास्तच आहे. आधी गरमागरम सूप घ्या. तोवर मी तुमच्यासाठी, तुमचा आवडीचा पदार्थ घेऊन येते. तुम्हाला खायला काय आवडेल?” त्या तरुण वेट्रेसने आपुलकीने विचारले.
म्हातारीने आपल्या अनुभवी नजरेने त्या पोरीकडे पहिले.
“मला आता चांगलीच भूक लागली आहे. दोन व्हेज सँडविचेस तर सध्या घेऊन ये. नंतर काही लागले तर सांगेन.”
त्या वेट्रेसच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहाताना, म्हातारीच्या एक गोष्ट लक्षात आली. ती पोरगी थोडी सावधगिरी बाळगून चालत होती.
“कितवा महिना आहे?” म्हातारीने ऑर्डर सर्व्ह करताना त्या पोरीला विचारले.
“सातवा संपलाय!” ती मृदू स्वरात म्हणाली.
“मग, हे धावपळीचं काम काय करतेस? घरी विश्रांती का घेत नाहीस?”
उत्तरादाखल ती फक्त गोड हसली आणि निघून गेली. घरगुती अडचणी माणसाकडून कष्ट करून घेत असतात. दुसरे काय?
म्हातारीने आपले लक्ष खाण्यावर केंद्रित केले.
“सर, ऍडव्हांस सॅलरी देऊ शकाल का? लवकरच डिलेव्हरीचे दिवस येतील. पैशाची गरज लागेल.” ती वेट्रेस आपल्या मालकाला हळू आवाजात विचारत होती. पण म्हातारीला तिच्या शक्तिशाली हेयरिंग येडमुळे तिला ऐकू येत होत.
“मेरी, तूला माझी परस्थिती माहित आहे. या जीवघेण्या थंडीने गेल्या महिनाभर कस्टमर्स निम्यावर आलेत. हे रेस्टोरंट, माझं कुटुंब सगळंच आर्थिक अडचणीतुन जात आहे. तू हे तुझ्या डोळ्याने पहात आहेस. तुला पैश्याची गरज आहे हे मला कळतंय. पण काय करू? मनात असून हि मी मदत करू शकत नाही. सॉरी मेरी!”
हे हि खरेच होते.
म्हातारीने जेवण संपवले. मेरी बिल घेऊन आली. सत्तर डॉलर्स बिल होत. म्हातारीने शंभर डॉलरची नोट मेरीला दिली. मेरी राहिलेले बाकी पैसे घेऊन आली. पाहते तो ती म्हातारी निघून गेली होती.
मेरीने टेबलवरली खरकटी प्लेट उचलली. तर त्या प्लेट खाली. शंभराच्या चार नोटा होत्या! आणि टिशू पेपरच्या नॅपकिनवर काही तरी लिहलेलं होत.
‘हे पैसे मी तुला ‘मदत’ म्हणून देत आहे. हा व्यवहार नाही. त्यामुळे परत करण्याची जरूर नाही. करायचेच असेल तर, कोण्या तरी अडचणीतल्या व्यक्तीला ‘मदत’ कर. कारण मलाही कोणी तरी अडचणीत मदत केली आहे, ती हि आजच! म्हणून मी हि ‘मदतीची शृंखला’ तुला सुपूर्द करत आहे. हि शृंखला अखंड राहील याची काळजी घेशील याची मला खात्री आहे! गॉड ब्लेस यु!’
मेरीच्या डोळ्यात पाणी होते! कारण तिला पैश्याची खूप निकड होती, लवकरच जन्माला येणाऱ्या बाळा साठी.
तर हि झाली गोष्ट. ‘जसे पेराल तसे उगवले!’ या हि पलीकडे काही तरी या कथेत आहे. परमेश्वर या ना त्या रूपाने मदतीला धावून येतच असतो. पण खरे सांगू तो, आपल्यातल्याच कोणाला तर त्या क्षणापुरता आपले ‘देवत्व’ देत असतो. त्या क्षणी ती व्यक्ती ईश्वराची भूमिका जगते. समोरच्या माणसाची मदत करते. तुमच्याही जीवनात असे क्षण आले असतील, आणि येतीलही. आपणच, बरेचदा ‘मीच का करू?’ म्हणून ती भूमिका टाळून देतो. अशी ‘मदत श्रुंखला’ पैश्याने भरपाई करून, किंवा फक्त ‘धन्यवाद’ म्हणून, खंडित करून टाकतो. ‘मदत’ विसरून जातो. हि श्रुंखला मोलाची आहे. जमल्यास ती अखंड राहील, किमान तुमच्या कडून त्यात खंड पडणार नाही याची काळजी घ्या. क्षणभर का होईना देवाची भूमिका जगा.
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेट वरून.)

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

2 Comments on मदत! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ७

  1. आपल्या कथा सुन्दर असतात.मनाला आनंद देतात हिन्दी गाण्या वर आपले लिखाण वाचण्याची इच्छा आहे. आपण लिंक शेयर करावी
    सूर्यकांत खाडे
    Vashi

    • नमस्कार,
      धन्यवाद. उत्तरास विलंब झाल्या बद्दल क्षमस्व.मराठीसृष्टीवर ‘गाण्याच्या कहाण्या’ पोस्ट केल्या आहेतच. येथे सापडतीलच. तरीही माझ्या ब्लॉगची लिंक देतोय. तेथे पण ‘गाण्याच्या कहाण्या’ आहेत.http://srk-canvas.blogspot.com/2018/11/blog-post.html.
      आणखीन मदत लागल्यास आवश्य सांगा,

Leave a Reply to सूर्यकांत Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..