नवीन लेखन...

ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले

‘बिब घ्या बिब शिककाई.., परिकथेतील राजकुमारा..गोड गोजिरी लाज लाजिरी.. अशा एकाहून एक अवीट गोडीच्या मराठी व २०० हून अधिक हिंदी गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या कृष्णा कल्ले या मूळच्या कारवारच्या.

त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० रोजी झाला. पण त्यांचे वडील कानपूर येथील नोकरीला होते. त्यामुळे त्यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदी भाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहेजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धामध्ये आपले गुण प्रदíशत करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षाच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. मा.कृष्णा कल्ले पुढे आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार झाल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा-या यात्रा-जत्रांतील संगीत कार्यक्रमातही यांचा आवाज लोकप्रिय ठरू लागला. एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना कृष्णा कल्ले यांचा आवाज मा.अरुण दाते यांच्या कानावर पडला आणि त्यांनी हा आवाज मुंबई आकाशवाणीवर काम करणा-या संगीत दिग्दर्शक यशवंत देवांपर्यंत पोहचवला. आधी देवांनी आणि नंतर अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली. जमाने से पूछो, टारझन और जादुई चिराग, प्रोफेसर और जादूगर, रास्त और मंजिलें आदी काही दुय्यम दर्जाच्या हिंदी चित्रपटांतही मा.कृष्णा कल्ले यांनी गाणी गायली. कृष्णा यांनी मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, मीनू पुरुषोत्तम, उषा तिमोथी आदी गायकांसोबतही गाणी गायली. त्यांनी ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, मदन मोहन, जयदेव, शंकर जयकिशन आदी संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांचे पती मा.मनोहर राय हे पण संगीतकार आहेत. मा. कृष्णा कल्ले यांचे १५ मार्च २०१५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

कृष्णा कल्ले यांची गाजलेली गाणी.
अंतरंगी रंगलेले गीत, अशा या चांदराती, गोड गोजिरी लाज लाजिरी, आईपण दे रे, अशी नजर घातकी बाई, कशी रे आता जाऊ घरी, गुपित मनिंचे राया, चंद्र अर्धा राहिला, चंद्रकळा रुक्मिणी नेसली, तू माझ्या स्वप्नांची कल्पना, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, पुनवेचा चंद्रमा आला घरी, मन पिसाट माझे अडले रे.
अनमोल गाणी कृष्णा कल्ले.

https://www.youtube.com/watch?v=gc0hi_d9sd4

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..