नवीन लेखन...

कोती : समाजातील तृतीय पंथीय मुलाची ह्रदयद्रावक कहाणी

समाजातील तृतीय पंथातील बालकाची हृदयद्रावक कहाणी मांडणारा कोती हा चित्रपट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकाच्या मनाला स्पर्शून अंतर्मुख करून जातो. ज्या समाजाला आपण आज विज्ञानवादी म्हणतो त्यामध्ये ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आजही तृतीय पंथातील माणसाला माणूस न समजता त्याला स्त्री- पुरुषापेक्षा वेगळं समजून समाजाने वेळोवेळी त्याचा धिक्कार केलेला आहे .तृतीयपंथी व्यक्तीला आजही समाजामध्ये खूपच जास्त हीन वागणूक मिळते आणि जेव्हा ही बाब लहान असताना माहिती पडते त्या लहान मनावर होणारे आघात काय असतील त्या वेदना अंतःकरणाला कशा आर पार करून जातात नात्याला सावरू पाहणारे माणसं हि ही परिस्थिती सांभाळू पाहतात , पण समाज स्वीकृत करत नाही या भीतीने कुटुंब सुद्धा बालवयात त्या जिवाचा धिक्कार करते .कोती या चित्रपटात श्याम या बालकाची हृदयस्पर्शी कहाणी पाहायला मिळते.

लहानपासून श्याम मध्ये मुलीसारखे नटण्या थटण्याचे गुण असतात , ग्रामीण भागामध्ये एका चांगल्या घरांमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत आणि लहान्या बभर्या भावासोबत आनंदाने जगणारा शाम त्याच्या आयुष्यामध्ये पावलोपावली नविन वळण येत जातात.

मला बहिण पाहिजे या लटक्या हट्टासाठी हट्ट करणाऱ्या बभर्या या लहान भावासाठी कधी शाम हा नटून-थटून बहीण बनून राखी बांधतो. तर कधी शाळेमध्ये आईवर सुंदर भावनिक निबंध लिहून आपल्याला आईसारखं व्हावंसं वाटतं अस सुंदर शब्दांकन करतो.त्याचं नटन त्याच्या बाबांना आवडत नसतं.त्याकरिता त्यांना बरेच वेळात त्याचे बाबा मारतात. एक दिवस शाळेतील मुलां समोर नर्तकीचा पेहराव घालून तो नृत्य करतो सर्व मुल त्याला उचलून शामली शामली अस ओरडत बाहेर आणतात .बाहेर कसलातरी कामांमध्ये असलेले श्यामची बाबा हा सगळा प्रकार पाहून खूप चिडतात आणि दोघाही भावांना मारतात.तेव्हा सर्व प्रकाराने घाबरुन गेलेला बभ्या घरात धावत येतो,आणि दरवाजाच्या मागे लपुन ठेवलेली दांडू लपुन ठेवतो.आणि कोपर्यात जाऊन लपतो.घरी संतापुण आलेला राजाराम घरी येऊन श्यामला मारण्यासाठी पट्टा काढतो तेव्हा त्याची आई कुसुम त्याला वाचवते आणि एका खोलीमध्ये बंद करते.इकडे लपुन बसलेला बभर्या आई वडीलांच्या गोष्टी एकतो आणि सत्यतता त्याच्या समोर येते.

श्याममध्ये मुलीचे गुण असतानाही समाजाच्या भितीने राजाराम श्यामला मुलगा आहे म्हणून जगण्यास सांगतो.पण त्याच्या वागण्यतील गोष्टी त्याला वेळोवेळी खटकाटात.त्यावेळी तो श्यामला त्याच्या दुनियेत पाठवण्याची तयारी करतो.या परिस्थितीत त्याचा लहान भाऊ बभर्या याचा कमालीचा संघर्ष दाखवलेला आहे.जेव्हा गावचा सरपंच आणि राजाराम त्याला घरातून बाहेर काढण्याची गोष्ट करतो तेव्हा बभर्याचे प्रश्न मनाला स्पर्शून जातात.जर कोणी व्यसनी आहे ,दारु पितो,त्याला समाजातून बाहेर काढल्या जातं नाही घरातून काढल्या जात नाही,श्याम वर्गात खुप हुशार आहे,पहिला येतो,तो कुणाला त्रास देत नाही सर्वांसोबत प्रेमाने वागतो मग का त्याला का बरे घरातून काढण्यात येते………?राजाराम त्याला वेळोवेळी सांगतो “अरे तो आपला नाही”पण हे बभर्या काहीच ऐकत नाही. त्याला श्याम हा त्याचा भाऊ असतो,ज्याच्या शिवाय तो राहूच शकत नाही. कुसुम श्यामला घेऊन खुप दुखी असते.श्याम लहान आहे इतक्या लवकर त्याला पाठवू नका असे ती राजारामाला म्हणते,राजारामचा पण श्याममध्ये जिव असतो पण गावातील मानसिकतेचा विचार करुन तो या बोज्याखाली दबुन जातो.बभर्या राजारामला खुप म्हणतो की श्यामला कुठे पाठवू नका पण जेव्हा राजाराम त्याचे ऐकुन घेत नाही तेव्हा तो कधी कोणाला,तर कधी पोलिसात राजारामची तक्रार करतो,तर कधी भुत मामाला समजुन एका दारुडयाला त्याच्या बाबावर दबाव टाकण्यासाठी आणतो.

एकदा शाळेतुन येताना बभर्या आणि श्याम एका पड्क्या घरात एक पेटी फेकून देण्याचा विचार करतात,तेव्हा श्याम ते सर्व शृंगाराचे सामान पाहुन मला हे सर्व एकच वेळ घालू दे अशी विनंती बभ्याला करतो,आणि तो त्या पेटीतील फ्रॉक घालतो आणि आनंदाने गोल फिरतो.त्याला हे सर्व आवडत हे फेकू नको असे तो बभ्याला म्हणतो.त्याचा केविलवाणा स्वर ऐकून ते पेटी तो फेकून देणार नाही असे कबुल करतो.त्याच्या या वागण्याने बभ्याला पण दुख होत.पण तो त्याच्या भावनेचा विचार करतो.

श्यामला वाचवण्यासाठी वेळोवेळी बभ्याला राजारामचा मार खावा लागतो.श्याम आणि कुसुम हे सर्व पाहुन स्तब्ध असतात.श्यामच्या कोवळ्या भावना आईला पण कळतात.कधी राजाराम श्यामला दरित ढकलण्याचा प्रयत्न करतो तर कधी काही,या प्रत्येक क्षणाला त्याची सुट्का बभ्या करतो.

जेव्हा राजाराम तृतीय पंथाच्या प्रमुखाला भेटतो तेव्हा त्या प्रमुखाच्या बोलण्याचे घाव राजरामला निशब्द करतात.राजाराम कसले तरी पेपर आणुन श्यामला जवळ घेऊन त्याला दूर पाठवण्याची गोष्ट करते तेव्हा ते कागद बभ्या फाडुन टाकतो.राजाराम त्याला चितावणी देतो की तो श्यामला त्याच्या जगात पाठवल्या शिवाय राहणार नाही.शेवटी सर्व परिस्तितीला कंटाळून दोघे भाऊ घरातुन पडून जातात.एका हॉटेल मध्ये काम करताना हॉटेल मालकाला त्यांचे आई वडील कधी वारले कधी आजरी आहेत असे सांगातात.पण एका हवालदाराला दिसतात.हवालदार याना चांगलाच ओळखत असतो.इकडे मुल घरात नाही म्हनुन राजाराम आणि कुसूम खुप शोधा शोध करते.सर्व घाबरुन जातात.पण जेव्हा हवालदार त्याना गाडीवर बसुन आणतो तेव्हा राजाराम मुलाना मारतो.त्या रात्री श्याम घरातील सर्व झोपलेले असताना तो घरातून पेटी घेऊन निघुन जातो.सकाळी कुसुम जिवाचा आक्रोश करून रडते,आयबाया तील समजावतात.बभ्याला स्वप्न पड्ते,तो घाबरुन उठतो,राजाराम आणि सरपंच गाडीवरुन येतात,राजाराम निशब्द होऊन रडतो.बभ्या वेगाने धावत धावत त्याचा शोध घेतो,विहिर पाहतो,आणि रस्त्याने पडत सुटतो,तेव्हा रस्त्याच्या कडेला श्यामची पेटी आणि जो कपडे तो मुलगा म्हणून घालायचा ते कपडे पडलेले असतात,बभ्या श्याम करित रडत राहतो………………

अश्या प्रकारे अगदी समाजाच्या भितीने नेहमीच्या केलेल्या धिक्काराने श्याम पाऊले उचलतो……..हा चित्रपटाचा शेवट प्रेक्षकाला रडवुन जातो…..

कोती या चित्रपटाच्या निमित्ताने

चित्रपत निर्माते  डॉ संतोष संपतराव पोटे, डॉ सुनीता पोटे
को उत्पादक:  विजय Bhos, सचिन Lolage, गरूड, मॅडम
कार्यकारी निर्माते:  शंकर धुरी
दिग्दर्शक:  Suhaas भोसले
लेखक:  Rajest Durge
पटकथा :  राजेस्ट दुर्ग
संवाद:  राजस्ते दुर्गें

या सर्वांचे कौतुक केले पाहिजे.ज्यांनी हा चित्रपट समाजातील नेहमी समाजाने धिक्कारलेल्या, दुरावलेल्या एक वेगळा पंथ म्हणून हिनवले, माणूस असूनही त्याला जगण्याचा अधिकार नाही असा माणसाच्या दृष्टीत असणाऱ्या तृतीयपंथी यांचा लहानपणीचा प्रवास यांनी खुप भावनिक आणि त्याने सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा चित्रपट कोती हा सर्वांसमोर आणला. कायद्याने सर्वांना समान हक्क देण्यात आले. कुठलाही लिंगभेद न करता सर्वांना समान वर्तणूक देण्यात आली. पण हे सर्व असतानाही आजही समाजाची, माणसांची मानसिकता काही केल्या नाही बदलली. तृतीय पंथ म्हणजे समारंभामध्ये,रेल्वे स्टेशनवर, नाचगाणे गाऊन पैसे मिळवणे इतकेच काम नसून त्यांनीही आपल्या स्वकर्तुत्वावर आपल्या बळावर विविध क्षेत्रांमध्ये आज नाव उंचावले आहे.आणि याचे अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा समाजाने या सगळ्या भेदभावाला विसरून त्यांना सुद्धा एक माणूस म्हणून स्वीकार करणे गरजेचे आहे.कोती या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे किती ठिकाणी लहानपणी त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले असतील आणि येत असतील.अशावेळी समाजाच्या मनोवृत्तीचा विचार न करता घरच्यांनी,कुटुंबाने समाजातील या मानसिकतेचा धिक्कार करून त्यांना आपलंसं केलं पाहिजे नाही की त्यांना आपल्यातून वेगळा आहे म्हणून समाजातून बाहेर काढून त्यांच्या जगण्यातून आनंद हिरावून घेतला पाहिजे .तेही माणसे आहेत त्यांनाही भावना आहेत हे व इथल्या स्त्री-पुरुषांनी कधिही विसरु नये.

— ऍड विशाखा बोरकर 

Avatar
About Adv Vishakha Samadhan Borkar 18 Articles
सामाजिक विषयावर लिखाण,कविता,कादंबरी,ललित लेखन करायला आवडत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..