नवीन लेखन...

कोण स्वदेशी कोण परदेशी

 

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला जयेश फडणीस  यांचा लेख 


पंतप्रधानांनी आत्मनिर्भरता हा मंत्र दिला ‘लोकल को व्होकल कीजिए’ म्हणजे जे लोकल आहे त्याचा गाजावाजा करा. लोकल उत्पादने लोकांनी जास्तीत जास्त विकत घ्यावीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ.  यातून स्वदेशी उत्पादने, स्वदेशी वस्तू हा विषय नव्याने चर्चेला आला.

स्वदेशी आणि स्वराज्य तसे बघितले तर मुघली सत्ते विरुद्ध हिंदवी स्वराज्य निर्मितीचा घेतलेला ध्यास ह्यातून जन्माला आलेले आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी स्वराज्य ही संकल्पना सर्वप्रथम आघाडीने मांडली. लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री ‘स्वदेशीचा  स्वीकार, परदेशीचा बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य’ ह्या वरच पुढे स्वदेशी ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक अतिशय महत्त्वाची चळवळ उभी राहिली. ज्याला महात्मा गांधींनी चालना दिली आणि कालानुरूप आत्ता आत्मनिर्भरता म्हणा किंवा  स्वदेशी म्हणा किंवा स्वयं राज्य म्हणा ह्या संकल्पना पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. ज्यामुळे देशाचा पुनश्च प्रगतिपथावरील प्रवास अधोरेखित होतो.  तर आता जरा मूळ विषयावर येऊ या.. स्वदेशी उत्पादन म्हणजे स्वतःच्या देशात, स्वतःच्या जोरावर (जिद्द चिकाटी मेहनत आणि पैसे), देशातील लोकांच्या सहभागाने, निर्माण केलेले प्रॉडक्ट उत्पादन.

स्वदेशी कंपनी म्हणजे अशा उत्पादनाची निर्मिती व्यवस्थापन आणि विपणन, ते ह्या प्रॉडक्ट्सचा प्रचार-प्रसार, स्वदेशी आणि इतर देशातील बाजारपेठांपर्यंत केलेला संपूर्ण कार्य प्रवास.

स्वदेशी कंपन्या भारतात प्रचंड आहेत अगदी स्वातंत्र्य पूर्वकाळापासून भारतीय लोकांवर जर कोणी खराअभ्यास केला तर नक्कीच त्यास हे समजेल की पूर्वापार भारतीय लोक हे उद्यमशील, रसिक, सर्जनशील, सुशील तरीही शांतीपूर्ण आणि अध्यात्मिक आहेत.

स्वदेशी कंपन्या म्हणा, स्वदेशी उद्योग म्हणा भारतीय लोक त्यातही अग्रेसर आहेत, होते आणि राहतील अगदी उदाहरणच द्याचे झाला तर पहा.

१. किर्लोस्कर (१८८८), २. टाटा ग्रुप (१८६८), ३. टाटा स्टील (१९०७), ४. विप्रो (१९४४), ५. महिंद्रा आणि महिंद्रा ( सुरुवातीस फाळणी पूर्व महिंद्रा आणि मोहम्मद ) (१९४४), ६. बजाज (१९४४), ७. बिर्ला (१८५७), ८. फेअरडील कॉर्पोरेशन फार्मास्युटिकल कंपनी (१९३६), ९. जे. के. लक्ष्मी सिमेंट (१९३८), १०. इंडियन ओव्हरसीस बँक(१९३७), ११. असोसिएटेड सीमेंट कॉस लिमिटेड (१९३६), १२. विजया बँक (१९३१), १३. वजीर सुलतान तंबाखू को. लि. (१९३०), १४. रेमंड ग्रुप (१९२५), १५. कर्नाटक बँक लिमिटेड (१९२४), १६. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (१९११), १७. TVS ग्रुप (१९११), १८. बँक ऑफ इंडिया (१९०६), १९. गोदरेज अँड बाईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. (१८९७), २०. बॉलीवूड – भारतीय चित्रपटसृष्टी जनक दादासाहेब फाळके – १९१३, २१. डाबर (१८८४) इत्यादी असंख्य. ह्या सर्व कंपन्या भारतीय लोकांनी भारतीयांसाठी निर्माण आणि वृद्धिंगत केल्या आहेत आणि बहुतांशी आजही कार्यरत आहेत बरं.

परंतु कोणत्या कंपनीने केलेली उत्पादने ही लोकल आहेत याबाबत एक मुद्दा आहे. समजा वॉशिंग मशीन, टीव्ही वगैरे बनवणारी एक भारतीय कंपनी आहे. या उत्पादनासाठी लागणारे बहुतेक सर्व महत्त्वाचे पार्ट ती इतर देशांतून आयात करते. भारतात ते फक्त असेंबल म्हणजे जुळवणी करते, स्वतःच्या नावाचा थप्पा मारते, ब्रॅण्डनेम देते. या कंपनीला स्वदेशी कंपनी म्हणता येईल का? या कंपनीच्या उत्पादनांना लोकल म्हणता येईल का? दुसरी एक परदेशी कंपनी आहे, ती भारतात व्यवसाय करत आहे. ही तिच्या उत्पादनाचे पार्टस् भारतातील छोट्या उद्योजकांकडून बनवून घेते, त्यासाठी त्यांना टेक्नॉलॉजी देते. नंतर हे पार्ट असेंबल करून त्याच्यावर आपलं जगभरात चालत असलेलं परदेशी ब्रॅण्डनेम वापरते. मग ही कंपनी स्वदेशी आहे की परदेशी? एका विशिष्ट कंपनीचं उदाहरण देतो. रेडमी (Redmi ) फोनचे उत्पादन करणारी शाओमी (Xiaomi ) ही कंपनी चीनी आहे. कंपनीने भारतात तिच्या फोनचे उत्पादन करणे सुरू केले आहे. कंपनी म्हणते भारतात तिचे जे फोन तयार होतात, त्या फोनचे ६५ टक्के इतके मूल्य असलेले भाग भारतातच तयार होतात. हे खरं असेल तर इथे निव्वळ जुळवणी करणे यापेक्षा ही खूपच चांगली स्थिती वाटते. पण मग याला लोकल म्हणायचं की परदेशी म्हणायचं? की फोन तयार करणारी एखादी भारतीय कंपनी शोधायची आणि त्या कंपनीचा फोन विकत घ्यायचा? फिलिप्स ही भारतात १९३० पासून व्यवसाय करणारी डच कंपनी. हीसुद्धा बहुतेक भाग इथल्याच व्यावसायिकांकडून तयार करून घेते. एकूणच खूप गुंतागुंत आहे, ती लक्षात घेणे गरजेचे आहे.

भारतीय लोक हे व्यापार, संस्कृती, जीवनमूल्ये आणि आध्यात्मिकता ह्यांचे अगदी योग्य मिश्रण म्हणावे लागेल, दुर्दैव असे की सद्य परिस्थितीत ह्याचा विसर मात्र भारतीय लोकांना पडलेला आहे.

हे होण्यास कारणीभूत बरेच पैलू आहेत, जसे की ‘स्व’चा विसर, परकीय आक्रमण, शिक्षण पद्धत, समाजभावना, मानसिकता आणि बरेच.

आज स्टार्टअप कल्चरचं वारं जोरात आहे. बऱ्याच लोकांना आत्मनिर्भरतेचं महत्त्व जाणवलंय. त्यातून उद्योग निर्मिती होतानाही दिसत आहे, जे आनंदनीय आहे.

सध्याच्या प्रथितयश अशा कंपन्या पाहिल्या तर –  १. पेटीएम (Paytm ), २. बायोकॉन लिमिटेड, ३. इन्फोसिस, फ्लिपकार्ट, ४. कोटक बँक, ५. Avenue सुपर मार्ट – डी-मार्ट, ६. HCL, ७. MDH, ८. Pidilite Industries (फेविकॉल), ९. रिलायन्स ग्रुप, रिलायन्स जिओ, १०. ओला, ११. Kent RO सिस्टिम्स, १२. भारती एअरटेल, १३. मायक्रोमॅक्स, १४. हिरो मोटरकॉप, १५. कॅफे कॉफी डे ( CCD), १६. ONGC, १७. ITC Ltd., १८. हिमालया, १९. निरमा, २०. LT, २१. KPIT Technologies, २२. State Bank Of India, २३. मारुती सुझुकी, २४. पतंजली आयुर्वेद, IT सेक्टरमधील बहुश्रुत सर्विस कंपन्या, इत्यादी अनेक.

वरील उदाहरणाने असे वाटेल की, स्वदेशी कंपन्या – म्हणजे सरळ सरळ भांडवलशाही व्यवस्था. जसे पाश्चिमात्य देशात चालते आणि काही प्रमाणात आपल्याकडेही रूढ झालेल्या त्यांच्या खूप साऱ्या पद्धती. तर असे चित्र सरसकट नाही आहे.

उदाहरणाने समजावून घेऊया. अमूल आज भारतातील एक सर्वात मोठा सहकारी क्षेत्रातील ब्रॅण्ड मानला जातो. बहुतेक दुग्ध सहकारी संस्था – गोकुळ डेअरी, वारणा डेअरी महाराष्ट्र, सहकारी बँका, पतसंस्था, श्री महिला गृह उद्योग (लिज्जत पापड), भारतीय शेतकरी खत सहकारी (इफ्को) इत्यादी असंख्य. वरील सर्व सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या कित्येक मोठ्या मोठ्या करोडोंच्या उलाढाली करणाऱ्या संस्था, उद्योग, उद्योजक आहेत, पण भांडवलशाहीच्या अगदी विरुद्ध सहकार, साम्यवाद जोपासून उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहेत.

स्वदेशीचा आणि एक भाग म्हणजे स्वदेशी उत्पादक आणि विदेशी उत्पादन. उदाहरणास्तव सांगायचं झाल्यास सध्याचे अतिशय प्रसिद्ध नाव धनंजय दातार मसाला किंग ऑफ दुबई UAE. – Al Adil Trading Co. LLC त्यांच्या कंपनीचे नाव. जगप्रसिद्ध मीडिया हाऊस ‘अरेबियन बिझिनेस ने सीएमडी, अल आदिल ट्रेडिंग कंपनी एलएलसी यांना जीसीसी क्षेत्रातील पहिल्या दहा भारतीय अब्जाधीशांमध्ये स्थान दिले आहे. मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनंजय दातार यांना ‘द इंडियन बिलियनेर्स क्लब’ नावाच्या प्रतिष्ठित यादीमध्ये आठव्या स्थानावर बसवले आहे.

आर्सेलोर मित्तल – Arcelor Mittal मित्तल स्टील कंपनी संस्थापक लक्ष्मी मित्तल भारतीय स्टील मॅग्नेट, युनायटेड किंगडममध्ये आधारित. ते जगातील सर्वात मोठी स्टीलमेकिंग कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

इंद्रा नोयि ह्या एक भारतीय-अमेरिकन व्यवसाय कार्यकारी अधिकारी CEO आणि पेप्सीकोचे माजी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. आता त्या संचालक मंडळ अध्यक्ष अॅमेझॉन कॉर्पोरेशनवर कार्यरत आहेत.

ओल्ड माँक – मोठ्ठी कोणतीही जाहिरात नसूनही हा रमचा भारतीय ब्रॅण्ड बऱ्याच वर्षांपासून सर्वात मोठा इंडियन मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल) ब्रॅण्ड आहे.

रॉयल एनफील्ड चेन्नईमधील कारखान्यांमध्ये उत्पादित ‘सर्वात जुना जागतिक मोटरसायकल ब्रॅण्ड’ या टॅगसह भारतीय मोटरसायकल उत्पादन करणारा ब्रॅण्ड आहे.

लुई फिलिप हे पुरुषांच्या वस्त्रांचा प्रीमियम ब्रॅण्ड आहे जो भारतातून आला आहे. ही मदुरा फॅशन आणि जीवनशैलीची उपकंपनी आहे, जी भारतीय समूह आदित्य बिर्ला समूहाचा एक भाग आहे आहे.

जग्वार आणि लँड रोव्हर – इंग्लंडच्या व्हिटली येथे मुख्यालय असलेला ब्रिटिश मल्टिनॅशनल कार उत्पादक ब्रँड असून २००८ पासून टाटा मोटर्स या भारतीय कंपनीची त्यावर मालकी आहे.

झोमॅटो ही एक भारतीय रेस्टॉरंट ऍग्री-गॅटॉर आहे त्याची २००८ मध्ये दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डा यांनी स्थापना केली होती. झोमॅटो रेस्टॉरंट्सची माहिती, मेनू आणि वापरकर्त्याचे पुनरावलोकन तसेच भागीदार रेस्टॉरंट्सकडून अन्न वितरण पर्याय व्यवस्था उपलब्ध करते. सध्या झोमॅटो हे २४ देशातून अधिक ठिकाणी सेवा पुरवतात.

तुम्ही हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे नाव ऐकलंच असेल. नावावरून तर ह्या अस्सल भारतीय कंपन्याच वाटतात, पण त्या भारतीय कंपन्या नाहीत. ही कंपनी ब्रिटिश – डच बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही आपल्या देशात १९३५ पासून काम करत आहे. हिची उत्पादने अगदी घराघरात पोचलेली आहेत. लक्स, लाईफबॉय साबण, व्हिम, रिन, सर्फ अशी या कंपनीची अनेक उत्पादने आपण सर्रास वापरत असतो. ही उत्पादने भारतातच तयार होतात. कंपनीचे याकरता इथे काही ठिकाणी कारखाने आहेत. ह्या कंपनीचा सीईओसुद्धा भारतीय असतो. एकदा नितीन परांजपे हे या कंपनीचे सीईओ झाले होते तेव्हा मराठी वर्तमानपत्रांनी ठळक बातमी दिली होती. ह्या कंपनीची भारतीय शेअर बाजारात नोंदणी झालेली आहे. कंपनीच्या शेअरपैकी सुमारे ६० टक्के शेअर पॅरेंट कंपनीकडे आहेत म्हणजे मेजॉरिटी शेअर त्यांच्या ताब्यात आहेत. अशा स्थितीत कंपनीचे उत्पादन, विक्री भारतात प्रमुख भारतीयसुद्धा असू शकतो, पण ताबा परदेशी कंपनीकडे, तर तिला लोकल म्हणायचं की नाही ही गुंतागुंत आहे. इथे जो नफा ते मिळवतात त्यातील मोठा भाग लाभांश, रॉयल्टी ह्या मार्गाने परदेशी – पॅरेंट कंपनीकडे जातो हे नक्कीच, पण आपल्या देशाचा फायदाच होतो, देशातील अनेकांना रोजगार मिळतात, व्यापारी वर्गाला फायदा होतो. निरमा ह्या अस्सल भारतीय कंपनीने १९७० ते २००० दरम्यान हिंदुस्थान युनिलिव्हरच्या उत्पादनांना टक्कर दिली होती हेही आठवत असेल.

विदेशी उत्पादक, स्वदेशी उत्पादन ह्या कार्यपद्धतीचा वापर फार वर्षांपूर्वी अवलंबिला गेला आहे. भारत आणि भारतासारख्या प्रचंड मागणी असलेल्या बाजारपेठांमध्ये विदेशी उत्पादक त्या देशातील गरज आणि संधी यांचा ताळमेळ ओळखून अभ्यासपूर्वक उपयुक्त उत्पादन निर्माण करतात. ह्या कार्यपद्धतीत नफा हा बाहेरील उत्पादकांना पर्यायी अधिक होतो.

१. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीची मालकी अँग्लो-डच कंपनी युनिलिव्हर या कंपनीची आहे.

२. कोलगेट – हे टूथपेस्ट कोलगेट-पामोलिव्ह अंतर्गत येते. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय ग्राहक उत्पादन करणारी कंपनी आहे. ज्यात आरोग्य सेवा घरगुती आणि वैयक्तिक उत्पादनांचे उत्पादन आणि वितरण यावर लक्ष केंद्रित केले जाते.

३. तात्रा ट्रक्स ही वाहने सामान्यतः भारतीय लष्कराकडून वापरली जाणारी दिसतात. ही कोपेव्हिनिस, झेक प्रजासत्ताकमधील वाहननिर्मिती कंपनी आहे.

४. स्टार टीव्ही ही एक एशियन टीव्ही सेवा आहे जी 21st Century Fox, अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया कॉर्पोरेशन यांच्या मालकीची आहे.

५. बऱ्याच लोकांना असे वाटते की मॅगी आणि किटकॅटसारख्या आवडीच्या पदार्थांमागे उभी असलेली नेस्टले कंपनी भारतीय आहे. नेस्ले ही स्वित्झर्लंडच्या वाउड, व्हेडी येथे मुख्यालय असलेली एक स्विस ट्रान्सनॅशनल फूड अँड ड्रिंक्स कंपनी आहे.

६. Procter Gamble (PG) यांची अनेक उत्पादने.

७. अलिबाबा.कॉम ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट लक्षात आहे ना? होय तर! आणि तरीही आपण म्हणता हा एक भारतीय ब्रँड नाही. तर काय नाव भारतीय असले तरी ही ई-कॉमर्स साइट प्रत्यक्षात चीनची आहे. ही जगातील सर्वात मोठी ऑनलाईन विक्रेती आहे.

१९९१ पर्यंत आपल्या देशात समाजवादी अर्थव्यवस्था होती तेव्हासुद्धा इतर अनेक परदेशी कंपन्या इथे अनेक वर्षांपासून व्यवसाय करत होत्या व आहेत. पेप्सी, कोकाकोला, गिलेट ही काही उदाहरणे. मारुतीबरोबर करार करणारी सुझुकी ही तर १९८२ मध्ये आलीच होती. फायझर, मर्क ह्यासारख्या अनेक औषधी क्षेत्रातील कंपन्या, कोलगेट पामोलिव्ह, कमिन्स, जाहिरात क्षेत्रातील ओग्लीव्ही अॅन्ड मॅथर, बँकिंग क्षेत्रातील अमेरिकन एक्सप्रेस, सीटी बँक, एचएसबीसी, डॉईस बँक अशा अनेक कंपन्या आपल्या देशात होत्या, आहेत व त्या अनेक वर्षांपासून आहेत.

अशा प्रकारच्या कंपन्या आणि त्यांची उत्पादन ही खरोखरीच असंख्य आहेत ह्यात IT क्षेत्रातील उच्चतम Google, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, ओरॅकल ते GE, GM ते अगदी सॅमसंग, CITI ग्रुप, कोकाकोला, सोनी कॉर्पोरेशनपर्यंत उदाहरणे देता येतील.

एक साधा प्रश्न नक्कीच पडेल हा सर्व वाचताना हे सर्व स्वदेशी विदेशी हा आत्मनिर्भरतेचा खटाटोप कशासाठी तर पटकन सोप्या शब्दात समजून घेऊयात औद्योगिक विकासाद्वारे प्रदान केलेली आर्थिक वाढ ही एक निरंतर वाढ आहे जी अर्थव्यवस्थेचे रूपांतर करू शकते. औद्योगिक वाढ आणि आर्थिक वाढ एकत्र होत असते. जेव्हा एखादा उद्योग वाढत असतो तेव्हा त्या उद्योगा सोबत त्याचे साहाय्यक उद्योगही वाढ घेतात आणि संपूर्ण इकोसिस्टिम वाढत जाते. परिणामी अर्थव्यवस्था सुधारते, वाढते. उद्योगातील वाढ म्हणजे अधिक रोजगार, अधिक पैसा आणि अधिक संधी. औद्योगिक वाढीचा बऱ्याचदा उच्च मजुरीशी संबंध जोडला जातो असे उत्पादन उद्योग अर्थव्यवस्थेसाठी अधिक पैसे आणि अधिक सेवा पुरवतात. ज्यामुळे दरडोई उत्पन्न आणि अधिक कामगार उत्पादकता येते. उद्योग वाढतात तेव्हा राहणीमान वाढते. या संधी क्षेत्राचे रूपांतर करू शकतात आणि अविरत प्रमाणात वाढीस प्रेरित करतात. भारतासारख्या देशात सैन्य सामग्रीसाठी परकीय चलन खर्च करावे लागते, तेल आणि इतर पदार्थ यांची प्रचंड आयात करावी लागते, तेव्हा देशाचा खर्च ह्या गोष्टींवर अतिरिक्त होताना दिसतो ( ह्या गोष्टींवरचा खर्च हा आवश्यकच आहे त्यात दुमत असता काम नये), पण त्यात सुद्धा जर भारतीय वस्तू, स्वदेशी उत्पादने, भारतीय बाजारपेठांमध्ये आली तर पैशाचे हे चक्र देशांतर्गतच राहील आणि नवीन उद्योग-नोकरीच्या संधी निर्माण होतील.

अर्थातच फक्त स्वदेशी म्हणून कोणी एखादी गोष्ट घेणं हे योग्य नाही. तसे होणारही नाही. ती वस्तू, सेवा-सुविधा त्या दर्जाची असणं देखील स्वदेशी उत्पादकांची एक जबादारी आहे आणि मुख्य म्हणजे परदेशी वस्तू सर्वार्थाने परदेशी नसतात. त्यातला मोठा भाग भारतातल्या अर्थव्यवस्थेला चालना देतो. त्यावर भारतातील माणसे जगतात.

(व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीयर आणि बिझनेस कन्सल्टन्ट, भारतीय लोकानी जास्तीत जास्त प्रमाणात बिझनेस करावा आणि नव्या पद्धतीने वाढवावा ह्या साठी विशेष कार्यरत.. कौन्सेलिंग गायडन्स ( counselling guidance ) चा अनेकाना फायदा. टेकनॉलॉजि आणि बिझनेस डेव्हलोपमेंट विथ ब्रेण्डिंग ह्या विषयावर अभ्यास.)

-जयेश फडणीस

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..