नवीन लेखन...

कठोर शिक्षा – भाग ४

“मी तुमची मदत करतो. हवालदार सावंत, दोन कप चहा मागवा.” यशवंतने सावंतला इशारा केला.
सावंतने आणलेला चहा शिर्के दांपत्याने घेतला.
“सावंत, त्या बाईना बोलवा.” यशवंतने इशारा केल्यावर एक मध्यम वयाची बाई आली.
“या, यशोदा बाई.” यशवंतने सुरुवात केली.
“हा हार तुमचा आहे कां?” यशवंतने तो हार यशोदाबाईला दाखवत प्रश्न केला.
“माझा नाही.” यशोदाने उत्तर दिलं.
“मग तो तुमच्याकडे कसा आला? तुम्ही तो चोरलात?” यशवंतचा प्रश्न.
“नाहीं हो साहेब, मी कुणाची वस्तु कां चोरूं?” यशोदा.
“मग सविस्तर सांगा. हा हार तुमच्याकडे कसा आलां.” यशवंत
“सांगते सहेब” यशोदाने सुरुवात केली.
“हा हार मला 24 औगस्च 1977 या दिवशी, खोली नंबर 24, ठाकरे बिल्डिंग मध्ये मिळाला”.यशोदा.
” किती बजतां?” यशवंत.
“संध्याकाळ उलटून गेली होती-सुमारे साडोआठ वाजले असावेत” यशोदा.
“तुम्ही त्यावेळी तिथे कां गेलांत?” यशोवंत
“मी तिथे झाडू-कटका करायला गेले होते, मला आधीच उशीर झाला होता” यशोदा.
“तुम्हाला या कामासाठी नेमलंय” यशवंत.
“होय साहेब. मला त्या बिल्डिंगच्या सोसयटीने नेमलंय” यशवंत.
“इतक्या उशीरा?” यशवंत
“विनोद साहेब खूप उशीरा घरी येतात.त्या दिवशी मी नेहेमीप्रमाणे झाडू -कटका करायला गेले. दार उघडंच होतं. विनोद साहेब झोपले होते. त्यांच्या उजव्या हातांत हा हार होता. त्यांचा हात लोंबकळत होता. मला शंका आली. मी हांका मारल्या तरी जागे होईनात म्हणून मी तो हार काढून सोसायटीच्या औफिसांत चिटणीस साहेबाना भेटायला गेले. ते सोसायचीचे सेक्रेटरी आहेत. मी तो हार चिटणीस साहेबांना दिला. त्यांनी याच बिल्डिंगमधल्या सोमण डौक्टरना बोलावून घेतलं. सोमण डौक्टरनी विनोद साहेब वारले असं सांगितलं.” यशोदा.
“या बाईंना तुम्ही ओळखतां ?” य़शवंतने अनूकडे बोट दाखवून विचारलं.
“मला नक्की आठवतंय, या बाई मी विनोद साहेबांच्या खोलीत येण्यापूर्वी तिथून लगबगीने बाहेर जायला निघाल्या होत्या. त्यांचा मला धक्का लागला होता. ” यशोदा.
“तुम्ही जा आत्ता.” यशवंतने यशोदाला जायला सांगितलं.

— अनिल शर्मा

Avatar
About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..