काळाची झडप

डोक्यावरी घिरट्या घालीत,  काळ सदा फिरतो
वेळ साधतां योग्य अशी ती,  त्वरित झेपावतो…१

भरले आहे जीवन सारे,   संकटांनी परिपूर्ण
घटना घडूनी अघटीत,  होऊन जाते चूर्ण…२

फुलांमधला रस शोषतां,  फूल पाखरू नाचते
झाडावरती सरडा बसला,  जाण त्यास नसते…३

आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला
अपघात घडतां उंचावरी,  नष्ट करे सर्वाला…४

खेळी मेळीच्या वातावरणी,  हसत गात नाचते
ठसका लागून कांहीं वेळी,  हृदय बंद पडते…५,

सतत जागृत असता तुम्हीं,  टाळता येई वेळ
सावध तुमचे चित्त बघूनी,  निघून जाई काळ …६

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

 

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1413 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…