नवीन लेखन...

काटकसर

काटकसरीपणा हा बहुतेक वेळा आपल्यात ठासून भरलेला असतो. एखादी गोष्ट पुरवून पुरवून कशी वापरायची हे आम्हा मध्यमवर्गीयांना पुरेपूर ठाऊक असतं. बाजारातून दही विकत आणलं तरी आम्ही पिशवी पिळून- पिळून शेवटचा थेंब निपटून काढतो. आधीच्या साबणाचे उरलेले तुकडे पुढच्या साबणाच्या बुडाला चिकटवतो, शॅम्पू संपला तरी बाटलीत पाणी घालून ती नीट विसळून शेवटच्या कणापर्यंत त्याचा फेस वापरतो. फार कशाला; एखादा टी शर्ट जुना झाला तरी आम्ही तो फेकून देत नाही. आधी घरात घालायला, मग रंगपंचमीला आणि तरीही मन भरलं नाहीच तर पायपुसणं म्हणून आम्ही तोच टी शर्ट वापरतो. फ्रेंडशिप डे साठी खास पांढरा टी शर्ट विकत घेऊन त्यावर मार्करच्या रेघोट्या मारण्याची पद्धत ही अगदी आज-कालची. अन्यथा याबाबत घरोघरी मातीच्या चुली.

अन्य प्रत्येक बाबीत इतके काटकसरी असणारे आपण बचतीसाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टींना मात्र कशा प्रकारे वागवतो? कित्येकांकडे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना पंखा तसाच गरगरत असतो; कारण आम्ही ‘वीज विकत घेत असतो’! टाकी भरून पाणी धो-धो वाहत असलं तरी आम्ही टाकी भरायचा नळ बंद करायला विसरलो असतो. कारण आणि पाणीपट्टी भरून ‘पाणी विकत घेत असतो’. पावसाचं पाणी आम्ही फुकट घालवतो आणि मग दुष्काळ पडला म्हणून उर बडवतो. हे झालं निर्जीव गोष्टींचं. सजीवांच्या बाबतीत तरी आपली परिस्थिती कुठे वेगळी असते? विचार करा; आपण आपल्याच माणसांना किती वेळा दुखवतो. कारणं दोनच; १. बोलण्याआधी विचार करण्यात केलेली काटकसर आणि २. बोलताना वापरत असलेल्या शब्दांच्या बाबतीत काटकसर करण्याचा पडलेला विसर!

आज ज्या वीज आणि पाण्यासारख्या गोष्टींची पैशाच्या मस्तीत आपण काटकसर करत नाही त्या एक ना एक दिवस संपून जातील. ज्या माणसांना दुखावण्याबाबत स्वतःच्याच मस्तीत आपण काटकसर करत नाही ती माणसंदेखील एखाद दिवस आपल्याला किंवा जगाला सोडून जातील. हातात काय राहील याचा विचार करा बरं एकदा. मित्रांनो; काटकसर जिथे शक्य आहे तिथे करा. जितकी जास्त बचत कराल तितकं जीवन सुसह्य असेल. मग ती बचत पैशांची असो वा नात्यांची!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

1 Comment on काटकसर

  1. सर, छान आहेत तुमचे लेख.मला माझ्या मुलांबद्दल प्रश्न विचारायचा आहे.bolnabadal call karun vichar shakate ka ? Ani kiti vajat

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..