नवीन लेखन...

ज्येष्ठांच्या चष्म्यातून

मला नक्की काय हवंय किंवा काय मिळवायचय हे एकदा पक्कं झालं ना मग चिडचिड , तडतड होत नाही. घडलेली प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेण्याची सवय जडली ना की उगीचच राग राग होतो. माझ्याप्रमाणेच झालं पाहिजे , मी सांगतोय तेच बरोबर , किंवा मग , मला काही शिकवायचं नाही , मला सगळं समजतं , प्रत्येक गोष्टीत मला सहभागी करून घेतलं पाहिजे , rather मला प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे. लहान लहान गोष्टींमध्ये घसरणारा विश्वास , मी का कमीपणा घेऊ , मी का गप्प बसायचं , मला कधीच कुणी विचारत नाही.
वाचताना जाणवणारी म ची बाराखडी.
आपण नेहमीच जज्जच्या खुर्चीत बसून समोरच्या बाजू न ऐकता निकाल देण्याची घाई करत असतो. हे सगळं घडतं कारण मला स्वतःला मीच गवसलेला नसतो. आणि त्यामुळे मी दुसऱ्याचा विचार करणं शक्यच नसतं. आजच्या पिढीबरोबर वागता बोलताना मोकळेपणा निश्चित असावा परंतु आपल्या वयाचं भानही असायला हवं. आपण लहानांपेक्षा लहान होऊन चालणार नाही. आपलं आयुष्य जगून झालंय. आता आपण आजच्या पिढीला appreciate करणाऱ्या खुर्चीत बसलो आहोत. या खुर्चीतून त्यांना धीर द्यायचा , कौतुक करायचं , थट्टा मस्करी करायची. त्यांच्याकडून चुका झाल्या तर लहान म्हणून माफ करायचं . नाहीच जमलं तर समजेल अशा शब्दांत त्यांना जाणीव करून द्यायची. त्यांच्यामधल्या चांगल्या गोष्टींना फुलवण्याचा प्रयत्न करायचा. आपण मात्र नेमकं याच्या उलट करतो. आधी त्यांच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि काही खटकल्यावर आपला इगो जागा होतो . आपल्या S.S.च्या खुर्चीतून जगाकडे पाहायला जमलं पाहिजे. आधी आपल्या घरातील तरुण पिढीला समजून घ्या , जपा , त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. नेहमीच आपलंच म्हणणं त्यांच्या माथी मारण्याऐवजी सल्लाधारकाच्या भूमिकेत रहा. होईल काय ! की ही तरुण पिढी मानाने नाही तर मनाने आपल्या जवळ येईल. त्यांची सुख दुःख कदाचित आपल्याशी शेअर करतील. आपण कधी गडबडलो , घाबरलो , चुकलो तर हे आपली कानउघाडणी करणार नाहीत किंवा फक्त सूनावणार नाहीत तर स्वतःच्या पंखाखाली घेऊन धीर देतील , आधार देतील , योग्य रस्ता दाखवतील हा विश्वास त्यांच्यात जागा होईल. तरुण पिढीला सारखे उपदेशाचे डोस पाजत राहाल , काळ वेळ न पहाता बोलत राहाल आणि याचा अतिरेक होऊन त्यांचा संयम संपला तर हळुहळु ती अलगद दुरावतील. काही घरात दबावामुळे आणि टेंस वातावरणामुळे याहीपेक्षा गंभीर आणि न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. आज छान गप्पा मारणारे , सल्ले देणारे , मित्र मैत्रीण म्हणून अगदी आपलेसे वाटणारे , समजून घेणारे त्यावेळी आपापल्या घरी असतील किंवा वाटलं तरी येऊ शकणार नाहीत. आणि अखेर समोर उभं राहील भयाण एकटेपण. नाती दुरावल्यामुळे प्रेम संपलेलच असेल , मग उरेल काय तर फक्त कर्तव्य. त्या कर्तव्याभावनेतून पुढील आयुष्यात आपल्याशी होणारा त्यांचा व्यवहार प्रचंड मानसिक वेदना देणारा ठरेल. अर्थात पश्र्चातापाची वेळ कधीच सरल्यामुळे उपयोग काहीच होणार नाही.
आजची पिढी खूप बिझी आहे , हुशार आहे , आळशी आहे पण कदाचित आपल्यापेक्षा समजूतदार आहे. घरातील ज्येष्ठांशी जुळवून घेणारी आहे. त्यांच्यासाठी आपल्या स्वभावाला थोडी मुरड घालायला त्यांच्या कलाने घ्यायला तयार आहे. अगदी सगळ्यांबद्दल हा दावा नाही करत मी , परंतु आपण जे स्वतःला so called ज्येष्ठ म्हणवून घेतो ते या कनिष्ठांशी जुळवून घेतील का ? की त्यांच्यातील त्रुटीच दाखवत राहून आपलं अखेरचं आयुष्य दयनीय करून टाकतील हा प्रश्न आहे.
ताकद असतानाच समजूतदारपणा आला तर मला वाटतं हे होणार नाही.
प्रासादिक म्हणे ,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..