नवीन लेखन...

ह्रदयाचा धोका टाळण्यास अजूनही उशीर झालेला नाही

Its not too late to undo heart disease risk

तुमच्या कल्पनेपेक्षाही तुमचे ह्रदय क्षमाशील आहे– मुख्यत्वे करून प्रौढवयातील व्यक्तिंनी आरोग्य सुधारण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले तर. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते कारण सर्वत्रच लठ्ठपणा फैलावताना दिसतोय. पूर्वीपेक्षा सध्याच्या व्यक्ति तरूण वयातच लठ्ठ होताना दिसतात आणि त्यामुळेच आशा व्यक्तीला त्याचे बरेचसे आयुष्य लठ्ठपणा बरोबर काढावे लागते.

विशी, तिशी, आणि चाळीशीतील व्यक्ती जितकी दिर्घकाळ लठ्ठ राहते तितके त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कठीण प्लेक तयार होण्याचे प्रमाण वाढते. ह्याचा परिणाम म्हणून ह्या व्यक्तींना पुढील आयुष्यात हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका संभवतो. वेळीच ह्या वाढत्या लठ्ठपणाला आळा घातला नाही तर पुढे जाऊन जसा लठ्ठपणा फैलावताना दिसतोय, तद्वतच ह्रदय रोगाचा फैलावताना दिसेल. Atherosclerosis ही हळूहळू वाढीस लागणारी एक प्रोसेस (प्रक्रिया) असून ती अगदी लहानपणातच सुरू होते असे हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. काही व्यक्तींमधे ही प्रक्रिया त्यांच्या तिशी मध्येच दिसून येते तर काहींच्या बाबतीत ही प्रक्रिया पन्नाशीत किंवा साठीत दिसून येते.

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार जेव्हा तुमचे वजन हेल्दी रेंज मध्ये (निरोगी श्रेणीत) असते तेव्हा
— तुमच्या शरीरात रक्ताभिसरण चांगले व प्रभावी असते
— तुमची फ्लूइड लेव्हल (प्रवाही पातळी) चांगल्या प्रकारे मॅनेज (व्यवस्थापित) होते
— टाईप 2 डायबेटिस, ह्रदय रोग, काही प्रकारचे कॅन्सर आणि स्लीप अॅपनीया (झोपेत बिघाड) हया सारख्या रोगांचा त्रास होण्याची शक्यता कमी होते.

Reis आणि त्याचे सहकारी ह्यांनी 3300 व्हाइट आणि अफ्रीकन अमेरिकन प्रौढ व्यक्तिंची अध्ययनासाठी निवड केली आणि त्यांना 25 वर्षांपर्यंत फ़ॉलोअप केले. प्रयोगात सहभागी व्यक्तीचे वय 1980 मध्यान्ह मध्ये 18 – 30 वर्षे होते. सहभागी प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भातील बॉडी मास इंडेक्स (BMI): उंची (सेंटीमीटर)/वजन (किलोग्राम), कंबरेचा घेर, धुम्रपानाची सवय, आहार, शारीरिक हलचाली विषयी माहिती, तसेच कोलेस्टरॉल, ब्लडप्रेशर, टाईप 2 डायबेटिस होण्याची शक्यता ह्या सर्वाची माहिती दोन दशकांपेक्षा जास्त काळापर्यंत गोळा केली. सहभागी व्यक्तीच्या कोरोनरी आर्टरी मध्ये कॅलसिफीकेशन ज्याला सोप्या भाषेत कठीण प्लेक असेही म्हणता येईल ते झाले आहे कि नाही हे बघण्यासाठी 15, 20, आणि 25 वर्षाला ह्या व्यक्तींचा CT (computed tomography) स्कॅन केला. प्लेक चा धोका वाढण्याचे कारणअसते मेटाबॉलिक अ‍ॅक्टिव्ह फॅट जी इनफ्लमेशन वाढवते. हेच वाढलेले इनफ्लमेशन Atherosclerosis होण्यास आणि त्याच्या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावते. ह्या अध्यापन विषयीचे निष्कर्ष JAMA July 2013 ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

निष्कर्ष :
— तरूण प्रौढांमध्ये जे लठ्ठ होते त्यांच्यात कठीण प्लेक तयार होण्याचा धोका 2 ते 4% पर्यंत वाढलेला आढळला आणि हे सहभागी होणार व्यक्तीचे वय, लिंग, रेस, आर्थिक व सामाजिक स्थिती, बी.एम.आय, कंबरेचा घेर, धुम्रपानाची सवय, शारीरिक हालचालीची लेव्हल, आणि दारूचे सेवन ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त लठ्ठपणा स्वतंत्र घटक कारणीभूत ठरताना आढळला आहे.

— ज्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचा कालावधी जितका जास्त आणि ज्यांचा पोटाचा घेर (abdomial girth) जास्त त्या व्यक्तींमध्ये ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल वाढण्याचा धोका जास्त तसेच त्या व्यक्तीला टाईप 2 डायबेटिस होण्याचे प्रमाण जास्त आणि आशा व्यक्तीला ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी औषधांची गरज भासू शकते.

दुसर्‍या एका प्रयोगात UK मधील व्यक्तींना 30 वर्षांपर्यंत फ़ॉलोअप केले. Masi आणि त्याच्या सहकारी व्यक्तींनी National Survey of Health and Development (NHSD)/1964 birth cohort मधली NHSD अध्ययनातील ज्यांचे 2006 ते 2010 साली 60 ते 64 वर्षे वय असलेल्या 1233 व्यक्तींची निवड केली. सहभागी व्यक्तींच्या बीएमआय, aortic pulses – wave velocity, aortic calcification score and caratoid IMT, ह्या सर्व गोष्टींची माहिती 36, 43, 53, आणि 60-64 वर्षी गोळा केली. सहभागी व्यक्तींना त्यांच्या बीएमआय नुसार वेगवेगळ्या गटात विभागले.

अध्यापन पूर्ण होईपर्यंत नॉर्मल वजन
— 36, 43, 53, किंवा 60-64 ह्या वेळेस सहभागी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली
— नंतरच्या आयुष्यात जी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली आणि त्या व्यक्ती ने नंतर वजन बीएमआय कमी केले आणि कमी केलेला बीएमआय नंतर वाढू दिला नाही
— नंतरच्या आयुष्यात जी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली आणि त्या व्यक्ती ने नंतर वजन बीएमआय कमी केले पण घटलेला बीएमआय परत वाढला.

60-64 ह्या वयोगटातील स्थूल किंवा लठ्ठ सहभागी व्यक्तींची तुलना त्यांच्याच वयोगटातील नॉर्मल वजन असलेल्या सहभागी व्यक्तींच्या बरोबर केली असता ह्या लठ्ठ व्यक्तींमधे इतर लठ्ठ व्यक्तींप्रमाणे मेटाबॉलिक सिंड्रोमचा प्रॉबलेम आढळला ज्यात ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल एच बी एवन सी वाढलेले आढळले. तसेच aortic pulses – wave velocity, aortic calcification score सुद्धा जास्त वाढलेले आढळले. हे अध्यापन European Society of Hypertension 2015 मिटींगमध्ये सादर केले.

तिशी चाळीशी मध्ये जर आपण चांगल्या सवयी पाळू लागलो तर ह्रदय रोगाचा धोका कमी करू शकतो

p-18292-heart-2शास्त्रज्ञांना असे आढळले आहे कि तिशी चाळीशी मधील व्यक्ती जेव्हा आपल्या अन-हेल्दी (वाईट) सवयी ज्या ह्रदयाला घातक ठरू शकतील आशा सवयी बदलून चांगल्या सवयींचा अंगीकार करते तेव्हा coronary artery disease चा धोका असल्यास तो आटोक्यात येतो आणि नैसर्गिकरित्या coronary artery disease होण्याचा संभाव्य धोकाही उलटवू शकते. ज्या व्यक्ती त्यांचे जसजसे वय वाढत जाते तसेतसे चांगल्या सवयी सोडून वाईट सवयी आत्मसात करतात त्या व्यक्तींमध्ये त्यांच्या coronary artery वर मोजता न येण्या इतका हानिकारक परिणाम दिसू लागतो असे ही आढळले आहे.

शास्त्रज्ञांनी 5000 व्यक्तींना Coronary Artery Risk Development in Young Adults (CARDIA) हया अध्ययनात सहभागी केले आणि ह्या व्यक्तींच्या रोजच्या सवयी हेल्दी आहेत कि नाहीत, त्यांच्यात coronary artery calcification झाले आहे कि नाही तसेच त्यांची जाडी ह्या विषयीची माहिती गोळा केली. सहभागी व्यक्ती जेव्हा 18 ते 30 वर्षाचे होते तेव्हा आणि ह्या सर्व गोष्टींचा आढावा परत 20 वर्षांनंतर ही घेतला.

हेल्दी जीवनशैली ठरवताना: ती व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ नाही, धुम्रपान करत नाही, शारीरिक व्यायाम योग्य प्रमाणात करते, आहार हेल्दी आहे, आणि दारूचे सेवन एकदम कमी करत असेल ह्या सर्व गोष्टींचा विचार केला गेला. अध्यापनाच्या सुरुवातीच्या काळात 10% पेक्षा ही कमी सहभागी व्यक्ती ह्या 5 ही गोष्टींची पूर्तता करत होत्या. अध्यापन पुर्तीच्या काळात म्हणजे 20 वर्षांनंतर 25% सहभागी व्यक्तींनी कमीतकमी एक तरी हेल्दी जीवनशैलीचा अंर्तभाव केला होता तर 40% सहभागी व्यक्तींनी वय वाढत जात होते तसतसे चांगल्या सवयी सोडून वाईट सवयींचा अंतर्भाव केला.

हेल्दी जीवनशैलीचा अंतर्भाव केलेल्या सहभागी व्यक्तींमध्ये जाडी व coronary artery calcification कमी झालेले आढळले तर वाईट जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्तींमध्ये मात्र मोठा जाणवण्याची इतपत परिणाम झालेला आढळला. हे अध्यापन जून 2014 Circulation ह्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे.

ह्या वरून स्पष्ट होते की तुम्ही कोणत्या ही वयात तुमच्या वाईट सवयी बदलायच्या ठरवून चांगल्या सवयी अंगीकारल्या तर तुम्ही तुमचा ह्रदय रोगाचा धोका टाळू शकाल.

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..