नवीन लेखन...

ईश अस्तित्वाची ओढ

उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला  ।

चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला  ।।

किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा  ।

गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा  ।।

सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी  ।

पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी  ।।

पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची  ।

शक्तीमान ते रूप समजूनी विस्मृती होई स्वत:ची  ।।

निसर्ग, देह वा वस्तू असो, अस्तित्व ईश्वरी जेथे  ।

उचंबळती प्रेम भावना एकरूप होण्या त्याते  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..