नवीन लेखन...

भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल

भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांचा जन्म १७ मार्च १९९० रोजी हिस्सार, हरयाणा येथे झाला.

आपल्या दहा वर्षाच्या कारकीर्दीत ऐतिहासिक ऑलिंपिक पदक आणि जवळपास डझनभर सुपर सीरिज आणि ओपनची जेतेपदे तसेच जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी झेप घेतलेली सायना म्हणजे भारताच्या बॅडमिंटनच नव्हे तर क्रीडा संस्कृतीसाठी मिळालेली एक दैवी देणगी आहे. भारताची फुलराणी, बॅडमिंटन क्वीन म्हणजेच सायना नेहवाल.

ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना नेहवाल ही पहिली भारतीय महिला. जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराची‍ मानकरी ठरलेली सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे.

बीजिंग ऑलिंपिकमध्ये सायनाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाळा आहे. मार्च २०१२ मध्ये सायनाने स्वीस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर जून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्ण सन्मान पटकावला. २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिने कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

सायना नेहवालला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..