नवीन लेखन...

आइस्क्रीम मशीन

आइस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. आजकाल आइस्क्रीम विकत आणण्यावरच भर असल्याने ते घरी केले जात नाही. फार तर फ्रीजच्या फ्रीजरमध्ये दूध व पावडर टाकून काही लोक आइस्क्रीम बनवतात पण त्याला हवी तशी चव नसते.

विकतच्या आइस्क्रीममधील दुधाचा दर्जा व त्यात वापरलेला सोडा यामुळे त्यांची चव जिभेला बरी वाटत असली तरी त्यात अस्सलता कमी असते.

घरगुती आइस्क्रीम मेकरमध्ये एक पोकळ लाकडी गोल असतो व त्यात एका रॉडभोवती फिरू शकेल असे धातूचे भांडे असते. अर्थात ते लाकडी गोलापेक्षा लहान आकाराचे असल्याने दोन्ही भांड्यांमध्ये गोलाकार मोकळी जागा असते त्यात खडे मीठ व बर्फाचे तुकडे टाकले जातात. मधल्या धातूच्या भांड्यात तापवून गार केलेले दूध, आंब्याचा गर, आइस्क्रीम पावडर, साखर यांचे मिश्रण टाकले जाते व हँडलने ते भांडे गोलाकार फिरवले जाते. अर्धा तासात चांगल्या दर्जाचे रवाळ आइस्क्रीम त्यात तयार होते.

यात मीठ व बर्फ यांचे जे मिश्रण असते त्याला गोठण मिश्रण असे म्हणतात. मिठामुळे बर्फ वितळते त्यासाठी लागणारी उष्णता आइस्क्रीम मिश्रणातून घेतली जाते व त्यामुळे आइस्क्रीम गोठते.

असे साधे यंत्र नॅन्सी जॉनसन यांनी पहिल्यांदा शोधून काढले. त्यानंतर तीन प्रकारचे आइस्क्रीम मेकर मशीन आले त्यात वर सांगितलेली सगळी प्रक्रिया यंत्राने केली जाते. ती सगळी विजेवर चालणारी यंत्रे होती. त्यात कुलिंगची प्रक्रिया मात्र वेगळी होती. यंत्रावर आइस्क्रीम तयार करताना एकदा सगळे मिश्रण तयार झाले की, ते भोवती पाइप असलेल्या छोट्या ट्यूबमध्ये टाकले जाते. पाइपमध्ये अमोनिया असतो त्यामुळे ट्यूबमधील मिश्रण गोठू लागते. ट्यूबमध्ये असलेल्या डॅशरमुळे बर्फाचे कण काढून टाकले जातात व विशिष्ट आकारात आपल्याला आइस्क्रीम मिळते.

आइस्क्रीममध्ये स्टॅबिलायझर म्हणून इमल्सिफायर वापरतात, त्यात झॅनटन गम, ग्वार गम यांच समावेश आहे. त्यामुळे आइस्क्रीम मऊ लागते. सॉफ्टी आइस्क्रीम हे तुलनेने जास्त तपमानाला दिले जाते त्यामुळे ते लगेच खावे लागते त्यात फॅट्स कमी असतात. डेली क्वीन कार्पोरेशननने सॉफ्टी आइस्क्रीमचे मशीन तयार केल्याचा दावा १९३८ मध्ये केला पण काही ब्रिटिश वैज्ञानिकांनी आइस्क्रीममधील हवेचे प्रमाण वाढवून ते कमी खर्चात बनावे यासाठी आपणच हे यंत्र बनवले असा दावा केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..