नवीन लेखन...

स्टेथोस्कोप

पूर्वीच्या काळात नाडीपरीक्षेवरून रागनिदान केले जात असे. हृदयाचे ठोके ऐकून वैद्यकीय तपासणी करण्याची पद्धत नंतर रूढ झाली. इ.स. १८०० सुरुवातीच्या काळात फ्रान्समध्ये रेने लॅनेक नावाचा एक डॉक्टर होता. तो हृदयाचे स्पंदन ऐकून रोगनिदान करीत असे. त्यासाठी तो रुग्णाच्या छातीला कान लावून हृदयाचा लब-डब हा आवाज ऐकत असे. एकदा त्याच्याकडे एक तरुण स्त्री आली. आता त्याची चांगलीच पंचाईत झाली. […]

डीएनए कॉम्प्युटर

डीएनए आणि कॉम्प्युटर (संगणक) यांचा काय संबंध असे कुणालाही वाटेल यात शंका नाही पण सजीवांच्या शरीरात माहिती साठवणाऱ्या डीएनएचा वापर संगणकासारखा करता येतो हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. आपल्या नेहमीच्या संगणकात मायक्रोप्रोसेसर ही चिप असते, तर डीएनए कॉम्प्युटर या नॅनोकॉम्प्युटरमध्ये ही जागा डीएनए सांभाळत आहे. […]

एटीएम मशीन

अलीकडच्या काळात आपल्याला फार वेळा बँकेत जायची वेळ येत नाही कारण पैसे काढण्याचे मुख्य काम हे तर एटीएम मशीनच्या मदतीने होत आहे. आपल्याकडे बऱ्याच उशिरा हे तंत्रज्ञान आले असले तरी प्रगत देशात त्याचा वापर अगोदरच सुरू झाला होता. एटीएम याचा अर्थ ॲटोमेटेड टेलर मशीन असा आहे. […]

प्रदूषणमापक यंत्र

हवा प्रदूषण हे अनेक रोगांना कारण ठरणारे आहे. जागतिक ‘आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात. प्रदूषकांची हवेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास योग्य की अयोग्य ते ठरवले जाते. यात एअर-गोचे एक एअरमीटर येते त्यात हवेतील हानिकारक घटक मोजले जाते. त्यानंतर एलईडी प्रकाशतात. जेवढे एलईडी प्रकाशित होतील त्या प्रमाणात हवा प्रदूषित समजली जाते. […]

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम

पूर्वीच्या काळी अरब लोक आकाशातील ग्रहताऱ्यांवरून दिशा ओळखायचे व त्यामुळे ते बरोबर योग्य त्या ठिकाणीच पोहोचत असत. आता तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे की, गुगल अर्थवर सगळे काही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसते आहे. पृथ्वीवरील कुठल्याही देशातल्या रस्त्यावरून चाललेल्या मोटारीची नंबर प्लेट उपग्रहाला दिसत असते. […]

मेटल डिटेक्टर

मेटल डिटेक्टर ज्याला धातुशोधक यंत्र असे म्हटले जाते. त्याचा उपयोग पूर्वीच्या काळापासून होत आहे. अजूनही हे साधन कालबाह्य ठरलेले नाही उलट त्याचे महत्त्व आजच्या दहशतवादी कारवायांच्या जगात वाढतच चालले आहे. मेटल डिटेक्टरचा उपयोग अर्थातच धातूचा शोध घेण्यासाठी केला जातो. […]

इलेक्ट्रिक जनरेटर

भारनियमनाच्या काळात कुठलेही कार्यालय किंवा खादे गृहसंकुलही वीज खंडित झाल्यानंतरही प्रकाशित राहू शकते, ते इलेक्ट्रिक जनरेटरमुळे इलेक्ट्रिक जनरेटरचा आता तर आवाजही येत नाही त्यामुळे त्याला सायलंट पॉवर असेही म्हटले जाते. लेक्ट्रिक जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेत केले जाते. […]

स्मोक डिटेक्टर

अनेकदा विद्युत उपकरणे किंवा सिगरेट यामुळे घरात आग लागून प्राणहानी व वित्तहानी होण्याचा धोका असतो. जिथे धूर आहे तिथे आग आहे असे म्हटले जाते, त्यामुळे धूर शोधणे ही आग रोखण्यातील एक महत्त्वाची पायरी मानली जाते. अमेरिकेतील मूळ रहिवासी हे धुराच्या मदतीने संदेश पाठवित असत, पण आता आपल्याला धुरातून धोक्याचा संदेश मिळू शकतो. धूम्रशोधकाचा शोध १८९० मध्ये […]

फॅक्स मशीन

आजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा पितामहच ठरला. नंतरच्या काळात याच तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार आपण पाहिले. […]

डिजिटल घड्याळ

मनगटी घड्याळाचा शोध पॅटेक फिलीप यांनी लावला व गंमत म्हणजे त्याकाळात हे घड्याळ म्हणजे महिलांचे आवडते साधन होते. त्यानंतरच्या काळात क्वार्ट्स घड्याळे आली व कालांतराने त्यांची जागा डिजिटल घड्याळांनी घेतली. १९५६ मध्ये त्यांचा शोध लागला. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..