नवीन लेखन...

डीएनए कॉम्प्युटर

डीएनए आणि कॉम्प्युटर (संगणक) यांचा काय संबंध असे कुणालाही वाटेल यात शंका नाही पण सजीवांच्या शरीरात माहिती साठवणाऱ्या डीएनएचा वापर संगणकासारखा करता येतो हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. आपल्या नेहमीच्या संगणकात मायक्रोप्रोसेसर ही चिप असते, तर डीएनए कॉम्प्युटर या नॅनोकॉम्प्युटरमध्ये ही जागा डीएनए सांभाळत आहे. आपल्या शरीरात लाखो नैसर्गिक महासंगणक पेशीतील डीएनएच्या रूपाने काम करीत असतात, फक्त आपल्याला ते माहीत नसते. आपली जनुके ज्या डीएनएची बनलेली असतात ते डीएनए जगातील वेगवान संगणकापेक्षा अधिक वेगाने कुठलेही गणन किंवा प्रश्नाची उकल करू शकतात. या डीएनएपासून बनवलेली बायोचिप आपल्या संगणकात आणता आली तर ती आणखी पुढची पायरी ठरणार आहे. आपल्या पर्सनल कॉम्प्युटरपेक्षा कितीतरी अधिक माहिती डीएनए कॉम्प्युटरमध्ये साठवता येते.

एका घनसेंटिमीटरमध्ये १० ट्रिलीयन डीएनए रेणू राहू शकतात म्हणजे डीएनए कॉम्प्युटर या हिशेबाने एकावेळी १० टेराबाईट्स इतकी माहिती साठवू शकतो व एकावेळी १० ट्रिलीयन इतक्या क्रिया  करू शकतो. कुठल्याही डीएनएमध्ये ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन असे चार पायाभूत घटक असतात, त्यांना ए,जी, सी, टी असे म्हणतात. जिनोममधील डीएनएच्या धाग्याला जुळणारे धागे म्हणजे मॅचिंग स्ट्रेंडही असतात. या ए,जी,सी, टी च्या जोड्यांची विशिष्ट रचना त्यात असते. पारंपरिक संगणकात आपण ०, १ च्या भाषेत माहिती साठवतो पण येथे डीएनएच्या चार पायाभूत जोड्यांचा वापर केलेला असतो त्यामुळे डीएनए संगणकात बायनरी ऐवजी क्वाटरनरी म्हणजे ज्याचा पाया चार आहे असे कोड वापरलेले असते. डीएनए संगणक हा रैणवीय संगणक असतो व तो जैवरासायनिक क्रियांवर चालतो. त्यात विकरे किंवा वितंचके डीएनएच्या धाग्याशी अभिक्रिया करतात व त्यातून साखळी अभिक्रिया बनते, त्याच्या मदतीने एकाचवेळी गणन केले जाते त्याला समांतर संस्करण (पॅरलल प्रोसेसिंग) म्हणतात. या पद्धतीमुळे एका कूटप्रश्नाची अनेक उत्तरे एकाचवेळी मिळतात. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील लिओनार्ड एम. ॲडेलमन यांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा डीएनए संगणक तयार केला. आता यापुढे कॉम्प्युटेशनल जीन (जनुक) अस्तित्वात आल्यास त्यात सॉफ्टवेअर व हार्डवेअर दोन्हींची सोय होणार आहे. डीएनए कॉम्प्युटिंगमधील प्रगतीमुळे आपल्याला विज्ञान, उद्योग व वैद्यकशास्त्रातील अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील यात शंका नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..