नवीन लेखन...

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम

पूर्वीच्या काळी अरब लोक आकाशातील ग्रहताऱ्यांवरून दिशा ओळखायचे व त्यामुळे ते बरोबर योग्य त्या ठिकाणीच पोहोचत असत. आता तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे की, गुगल अर्थवर सगळे काही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसते आहे. पृथ्वीवरील कुठल्याही देशातल्या रस्त्यावरून चाललेल्या मोटारीची नंबर प्लेट उपग्रहाला दिसत असते.

दिशा ओळखण्यासाठी होकायंत्र वापरले जात असे पण त्यामुळे आपण कुठे आहोत हे समजत नाही. या महाकाय पृथ्वीतलावर आपली भौगोलिक स्थाननिश्चिती करण्यासाठी ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’ म्हणजे ‘जीपीएस’ तयार करण्यात आली. तुमच्याकडे जीपीएस रिसीव्हर असेल तर तुम्ही कुठल्या अक्षांश, रेखांशावरील कुठल्या ठिकाणी आहात हे सगळे क्षणार्धात समजते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमचे कार्य हे अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांवर अवलंबून असते.

जीपीएस प्रणालीचा जन्म हा खरे तर रशियाने ‘स्पुटनिक’ उपग्रह सोडल्यानंतर अमेरिकेने जी धास्ती घेतली होती त्यामुळे झाला असे म्हणतात. जगात रेडिओ संदेशांवर आधारित अशी स्थाननिश्चिती प्रणाली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अस्तित्वात होती. त्यानंतर उपग्रह संदेशांच्या मदतीने अशी स्थाननिश्चिती करता येईल अशी कल्पना अमेरिकी वैज्ञानिक डॉ. रिचर्ड केर्शनर यांनी मांडली होती. उपग्रह जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा, व दूर जातो तेव्हा त्याच्यापासून आलेल्या संदेशांची फ्रिक्वेन्सी ही डॉप्लर परिणामामुळे वेगवेगळी असते, या सूत्राच्या आधारे स्थाननिश्चिती करता येईल असे त्यांनी म्हटले होते. ‘जीपीएस’ ही अमेरिकेचीच २४ उपग्रहांवर आधारित व्यवस्था १९७३ मध्ये सुरू झाली. ही प्रणाली प्रगत होण्याच्या अगोदर अमेरिकेच्या नौदलासाठी ‘ट्रान्झिट’ ही अशीच एक व्यवस्था तयार करण्यात आली होती.

आता तर रशियाचीही ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम (ग्लॉसनास) कार्यरत आहे, चीनची ‘कंपास नॅव्हिगेशन सिस्टीम’, युरोपीय समुदायाची ‘गॅलिलियो पोझिशनिंग सिस्टीम’ तयार होण्याच्या मार्गावर आहे. जीपीएसमधील उपग्रह बारा तासात पृथ्वीप्रदक्षिणा करतात. त्यांनी पाठवलेले संदेश रिसिव्हरमार्फत पृथ्वीवर ग्रहण केले जातात. या जीपीएसमधील उपग्रहांमध्ये एक अत्यंत अचूक घड्याळ असते. प्रणालीत जेवढे उपग्रह अधिक तेवढी स्थाननिश्चिती अधिक अचूक असते. जगातील पाच ठिकाणांहून या उपग्रहांशी संपर्क ठेवला जातो.जीपीएस रिसीव्हर हा मोबाईल हातातही ठेवता येतो. मोटारी, जहाजे, विमाने, पाणबुड्या यांच्यात त्याचा वापर केलेला असतो. कुठलेही वाहन प्रवास करीत असताना जीपीएसमुळे ते वाहन नेमके कुठे आहे हे तत्काळ समजते. जीपीएस उपग्रहाकडून आलेल्या संदेशास रिसीव्हरपर्यंत पोहोचण्यास लागलेला वेळ व इतर घटकांच्या आधारे उपग्रहापासूनचे अंतर मोजले जाते. यात अलगॉरिथमचा वापर करून स्थाननिश्चिती पडद्यावर दाखवली जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..