नवीन लेखन...

हो भुकेची आग

सिंधू ताई बद्दल माहिती मिळाली होती. की अतिशय वाईट वाटले होते आणि मलाही एक आठवण झाली आहे ती म्हणजे. ही भूकेची आग. त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं होतं की त्या स्मशानात रहायच्या निषिद्ध अन्न खाऊन जगल्या. त्यामुळे मी आतापर्यंत कुणालाच न सांगितलेले तुम्हाला सांगते. गावापासून दूर. अत्यंत गैरसोयीचे पण हक्काच्या घरात रहायला गेलो होतो. आणि मला दुसर्या मुलींच्या वेळी दिवस गेले होते तेव्हा काहीच खाण्याची इच्छा नव्हती. कसाबसा यांच्या पुरता स्वयंपाक करायची मोठी मुलगी दिवस भर एकटी रहायला तयार नाही आणि तिचे वय मैत्रीणी बरोबर खेळायचे होते म्हणून मी तिला माझ्या बहिणीकडे ठेवायची व रात्री घेऊन यायची. पण माझ्या जेवणाचे काय करायचे हा प्रश्न होता. माहेरची खूपच आठवण यायची. माहेरी सासरी अशा वेळी दुसर्यांच्या हातचे आणि आवडनिवड जाणून घेऊन दिले जाते. आणि गल्लीतील बायका पण आवर्जून नवीन नवीन पदार्थ आणून देतात. एकत्र कुटुंबात हाल होत नाहीत अशा वेळी. आणि त्या वेळी असे बरेचसे काहीही मिळण्याची सोय नव्हती. व जे दोन तीन पदार्थ मिळायचे ते आणून द्या असे म्हणणे संकोच. शिवाय त्यावेळी असे वाटायचे कोणी केले असेल कसे केले असेल म्हणजे मनात किंतू होता. पण देवाला काळजी होती. आमच्या कडे रविवारी बाजार असायचा आठवडी बाजार. काही पक्षकार बाजारात जाण्यापूर्वी आमच्या घरी यायचे. थोडा वेळ बसून खटल्याची चर्चा करून मग जायचे. पैकी एक आल्यावर घरुन आणलेले जेवण करत त्यावेळी मी कधी कधी भाजी. वरण. असे काहीतरी द्यायची. नेहमी प्रमाणे ते जेवायला बसले होते म्हणून मी घाईघाईत आत जाऊन एका वाटीत भाजी आणून दिली. आणि ते हात धुवायला म्हणून ते फडक्यातील जेवण तसेच उघडे ठेवून गेले होते तेव्हा मला जो मोह झाला होता म्हणुन सारासार विचार केला नाही. मी पटकन ते फडके बाजूला ठेवून त्यावर एक टोपली झाकली. आणि म्हणाले की तुम्ही हे जेवा मी तुमच्या साठी हे ताट वाढून आणले आहे बघा. आणि ते काहीही बोलले नाहीत. आणि विचारले पण नाही. मात्र त्यांचा चेहरा वेगळाच झाला होता. यांचे जेवण झाल्यावर ते म्हणाले चला आपण बाजारात जाता जाता बोलू या. मला तर हे लोक कधी जातील असे झाले होते. ते चार पाऊलावर होते तोच मी तिथेच बसून घाईघाईत भाकरी चटणी खायला सुरुवात केली होती. किती दिवसांनी जेवले अगदी तृप्त झाले होते मी.
आणि मग विचार केला की आता हे जेवताना माझ्या शंकाकुशंका कुठे गेल्या. ही भूक माणसाला काय काय करायला लावते पहा. आणि आता विचार केला की सिंधू ताई स्मशानातील अन्न का खाल्ले असेल. तर भूकेची आग लागली ना की जात. धर्म. पंथ. शुभ अशुभ निषिद्ध या कशाचाही विचार करत नाही. बाळाला जन्म द्यायचा आहे तर स्वतःला उपाशी राहून चालणार नाही. आज पर्यंत मी हे कुणालाही सांगितले नव्हते पण मी केले ते बरोबर आहे का यासाठी सांगितले आहे.
— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..