नवीन लेखन...

गुलजार – बात “एक” पश्मीने की !

हा मनुष्य कायम हातातून निसटतो. त्याचा स्पर्श जाणवतो, त्याचे शब्द भिडतात, त्याचे संवाद तीक्ष्णपणे काळजात घुसतात. त्याच्या धवल वस्त्रांवरचे फाळणीचे डाग पुसट होता होत नाही. त्याचे चित्रपट म्हणजे त्याच्या कविता ! भाषाप्रभुत्व शब्दातीत, आपल्याला जे बोलायचे असते, नेमकं तेच त्याच्या लेखणीतून / संवादातून / कथांमधून उमटतं. व्यक्तिगत सुखदुःखांवर तो वेगवेगळ्या माध्यमातून भाष्य करतो पण त्यातही हाती लागत नाही. आसपास असतो, भावतो, दिसतो, जाणवतो पण…. !

ह्या “पण” वर उत्तर शोधायचा एक विफल प्रयत्न काल केला – “नाट्यसत्ताक रजनी” नामक रात्रीचे अग्निहोत्र काल रात्री यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होते.

१९६३ पासून सुरु झालेला हा “गुलजारनामा” अनुभवायला आम्ही उभयता गेलो होतो. किशोर कदम सारखा तीक्ष्ण जाणिवा असलेला, घणाघाती आवाजाचा कवी , त्याच्या जोडीला (कदाचित मुद्दाम) मऊपणा धारण केलेला पण तितकाच ताकदीचा अभिवाचक “सचिन खेडेकर !” ते गुलजार उलगडताहेत -“रावीपार” पासून सुरु झालेला ! चार गायक मंडळी दिमतीला – गाणी (खरंतर रचना) सादर करीत गुलज़ारची पुनर्भूती देणारी ! पडद्यावर उमटणाऱ्या चित्रपटांचे तुकडे -तुकडे डाउन मेमरी लेनवाले ! एक कलावंत रंगमंचावर समक्ष काव्य -चित्र काढणारा ! कोठेही कसूर नाही या अभिजात माणसाला पकडण्याच्या तयारीत ! पण तरीही तो (नेहेमीसारखा) सुटला. प्रेक्षागृहाचं अवकाश व्यापून, जाताना आम्हाला टाटा करीत स्वतः मात्र तेथेच राहिला – सगळ्यांचे विफल प्रयत्न एन्जॉय करीत !

१५ वर्षे हा “पश्मीने” प्रयोग त्याच्या साक्षीने चालला आहे – एका कवीवरचं हे उदंड प्रेम ! चित्रपट निर्मिती संपवून २० वर्षे झाली तरीही आदरमिश्रित कुतूहलाने आजही त्याची वाट पाहायला लावणारा ! साहिर नंतरचा निर्विवाद शब्दप्रभू !!

फाळणीचे व्रण त्याच्या आणि अमृता प्रीतमच्या साहित्यातून ठिपकतात. फरक एवढाच ! ती “बयो” अणुकुचीदार वार करते आणि हा संयत, ठामपणे, तक्रार न करता, संघर्ष सुरु ठेवतो -सत्तर वर्षांपूर्वीच्या घावांशी ! त्याची पात्रे त्याच्याच जखमा उजागर करतात- ” पिंजर” ,”माचीस” मधून !

आजच्या पिढीला त्या भळाळत्या आठवणी तो विसरू देत नाही. २६ जानेवारी या बाह्यतः शांत पण अंतर्यामी ज्वालामुखी दडविणाऱ्या विद्ध कवी सोबत साजरा करण्याचा क्षण ( भलेही पराभूत झालो असलो तरी) मीही त्या फाळणीसारखाच जवळ ठेवणार आहे.

त्याला समजून घ्यायचा “एकमेव “मार्ग काल त्यानेच अबोलपणे (?) सुचविलेला !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..