Web
Analytics
गतकर्माची विस्मृती – Marathisrushti Articles

गतकर्माची विस्मृती

एके दिनीं मी निघून जाईन    निरोप घेवून ह्या जगताचा

प्रवास माझा अनंतात तो    कसा असेल त्या वेळेचा

 

आकाशाच्या छाये खालती    विदेही स्थितींत  फिरत राहीन

‘तू’ आणि ‘मी’ च्या विरहीत मी   गत कर्माचे करिन मापन

 

बाल्यातील चुका उमगल्या     तरूणपणाच्या उंबरठ्यावरी

सळसळणारे यौवन रक्त    वृधावस्तेतील खंत ठरी

 

पूनर्जन्म तो घेण्याकरितां    गर्भाची मी निवड करीन

गत जन्मींच्या चुका टाळूनी    आदर्शमय ते जीवन जगेन

 

शंकेची परि पाल चुकचुके    राहील का स्मृति गत जन्माची

नसतां पूनरपि चक्र फिरेल    विस्मृति होतां गत कर्माची…५

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1228 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

कोकणचा मेवा – ओळख

उन्हाळा लागला की समुद्र किनाऱ्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकणाकडे ...

Loading…