नवीन लेखन...

अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस

आसाममधून वेगळे होवून अरुणाचल प्रदेश हे राज्य २० फेब्रुवारी १९८७ साली स्थापन झाले. हे राज्य डोंगरदऱ्या, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आगळ्यावेगळ्या लोकसंस्कृतीने संपन्न आहे.

हिमालयाची डोंगररांग, हिमशिखरांतून वाहत येणाऱ्या नद्या व त्यांची खोरी, अप्रतिम जंगल अशा अनेक नैसर्गिक ठेव्यांचे वरदान लाभलेला असा हा अरुणाचल. एका चौरस किलोमीटरला १७ माणसे अशी भूभागाची वाटणी असलेला प्रदेश. स्थल पर्यटन, निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग, माउंटन बायकिंग, राफ्टिंग अशा अनेक उपक्रमांसाठी पूरक अशी ही भूमी. भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. अरुणाचलमध्ये भटकण्यासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर असे दोन कालावधी उत्तम मानले जातात. मान्सूनपूर्व काळात एप्रिल-मे महिन्यात तवांग बोमदिलासाठी हल्ली भरपूर पर्यटक जात असतात. पण मान्सूनोत्तर नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ तसा कमी गर्दीचा असतो. या काळात सृष्टीचं अनोखं रूप न्याहाळता येतं. थोडा त्रास घ्यावा लागतो. दिलेल्या दोन्ही मार्गावर राहण्याची सोय चांगली आहे. छोटय़ा ग्रुपने स्वत:च नियोजन करून ही भटकंती करता येते. सेला पास नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये बर्फामुळे पूर्ण बंद असतो. तर झिरोला पाच हजार फुटांवरदेखील सकाळी बर्फाचं आच्छादन पाहायला मिळतं. इतक्या कमी उंचीला बर्फ हिमालयात सहसा पाहायला मिळत नाही.

अरुणाचल प्रदेशतील काही बघण्यासारखी ठिकाणे.

गुवाहाटी हे ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेले आसामच्या राजधानीचे शहर व संपूर्ण पूर्वोत्तर राज्याचे केंद्रस्थान. सर्व सुविधा असलेले मोठे शहर. तेजपूर हे ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेले शहर. ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला सुमारे २ कि.मी. लांबीचा एकमेव पूल तेजपूरला जोडणारा आहे. अरुणाचल प्रदेशची भूभागाद्वारे होणारी सर्व वाहतूक या पुलावरून होते.

इटानगर हे अरुणाचलच्या राजधानीचे शहर. चौदाव्या शतकातील जुन्या राजधानीच्या किल्ल्याच्या परिसरात वसलेले आधुनिक शहर. इटानगरमध्ये जवाहरलाल नेहरू संग्रहालय आहे. वेगवेगळ्या जमातींनी बांबू व वेताच्या वापरातून तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू व कलाकृती येथे बघायला मिळतात.

झिरो हे अपातानी जमातीचे ५ हजार फूट उंचीवरील गाव. इतर जमातीप्रमाणेच अपातानी हे चंद्र व सूर्य यांना देव मानतात. त्यांची घरे बांबू व वेत यापासून बनवलेली असतात. त्यांचे संग्रहालय तेथे आहे. झिरोचे मार्केट बघण्यासारखे आहे. गावाजवळील टेकडीवर काही वर्षांपूर्वी खोदकाम करताना निदर्शनास आलेले २५ फूट उंचीचे भव्य शिविलग आहे. झिरो भटकायला एक पूर्ण दिवस हवा.

मजोली हे जगातील सर्वात मोठे नदीतील बेट आहे. तेथे वैष्णव पंथीयांचे पीठ आहे. पंधराव्या शतकातील संत व आसामचे सुधारक शंकरदेव येथे आले व त्यांनी येथे सत्रांची स्थापना केली. या सत्रांद्वारे कला, संस्कृती व धर्म यांचा प्रसार व प्रचार करण्यात येतो. मजोलीहून बोटीने जोरहाटला यावे लागते. जोरहाटला ब्रह्मपुत्रेच्या काठावरील कोकीलामुख गावात प्रसिद्ध वनमानव जादव पायेंग राहतो. त्याची भेट घेऊन जोरहाटवरून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानला जाता येते.
काझीरंगा ते गोहाटी (५ तास) : रस्ता दुपदरी व मध्ये विभाजक असलेला व खूप चांगला आहे. त्यामुळे हा प्रवास सुखावह होतो.

तसं पाहायला गेलं तर अरूणाचलची राजधानी ईटानगरमध्येच फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत.

ईटा फोर्ट ईटानगरच्या मध्यावर वसलेला आहे. या किल्ल्याच्या नावावरूनच या शहराचे नाव ईटानगर ठेवण्यात आले आहे. या किल्यामध्ये या शहराचा इतिहासही दडलेला आहे. साधारणतः 14व्या किंवा 15व्या शतकामध्ये हा किल्ला तयार करण्यात आला असून त्यासाठी सामान्य विटांपेक्षआ मोठ्या विटांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे या किल्लाचे नाव ईटा फोर्ट असं ठेवण्यात आलं आणि या किल्लामुळे शहराचं नाव ठेवण्यात आलं. असं म्हटलं जातं की, किल्ला तयार करण्यासाठी 80 लाखांपेक्षा अधिक विटांचा वापर करण्यात आला होता.

अरुणाचल प्रदेशमध्ये असलेल्या प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये गंगा झीलचाही समावेश होतो. या शहरातील स्थानिक भाषेमध्ये या तलावाला गेकर सिन्यी असं म्हटलं जातं. हा तलाव शहरापासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावर आहे. खास गोष्ट म्हणजे, ऋतू कोणताही असो येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कधीच कमी होत नाही. या तलावाच्या चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. त्यामुळे या तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडते. या तलाबाबत अनेक पौराणिक कथाही सांगितल्या जातात.
रूपा अरूणाचल प्रदेशमधील छोटंसं पण आकर्षक हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन तेंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या हिम श्रृंखलेवर स्थित आहे. येथील विंहगमय दृश्य आणि या हिल स्टेशनचं सौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकांचं मन अगदी तृप्त करतात.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..