नवीन लेखन...

फिर आँख नम हो गयी I फिर “दोनों” याद आ गए

काही चित्रपट यशासाठी, प्रसिद्धीसाठी, गल्ल्यासाठी नसतात पण तरीही ते रेंगाळत राहतात. “किनारा” (१९७७) दस्तुरखुद्द जितेंद्र/हेमा/धमेंद्र यांच्या आज खिजगणतीत असेल का, प्रश्न आहे. बाकीचे सहकलाकार- लागू, केश्तो, दीना पाठक, ओम शिवपुरी काळाच्या पडद्याआड गेलेत. यंदा लता (६ फेब्रुवारी) आणि पाठोपाठ भूपेंद्र (१८ जुलै – गंमत म्हणजे या सव्यसाची गायकाचा जन्म ६ फेब्रुवारीचा) काळाच्या प्रवाहात विलीन झाले. आम्ही मात्र “किनाऱ्यावर” थबकलोय- “मिलेगा किनारा यहीं ” असं स्वतःला बजावत !

१९९१ साली इंदोरला आय एस टी इ च्या वार्षिक अधिवेशनासाठी पत्नी आणि चिरंजीवांना घेऊन मी गेलो होतो. पेपरचे सादरीकरण झाल्यावर दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आलेल्या प्रतिनिधींसाठी संयोजकांनी एक दिवस सहल आयोजित केलेली होती. “मांडू” ऐवजी आम्ही “उज्जैन ” निवडले – “क्षिप्रेच्या ” मोहाखातर !
त्यामुळे मांडू दिसले “आँधी ” आणि “किनारा ” मध्ये- गुलज़ार बाबांच्या कृपेने !

” किनारा ” मध्ये मांडू हे एक महत्वाचे पात्र आहे.

आज “किनारा” कितव्यांदा तरी पाहिला. मात्र त्यांवर लिहितोय-दुसऱ्यांदा !(पहिले लेखन माझ्या “गुलज़ार समजून घेताना” या पुस्तकात समाविष्ट आहे).

आजचे लिहिण्याचे कारण या लेखाच्या शीर्षकात आहे.

पुन्हा एकदा आँख -नम हो गई ! “नाम गुम जाएगा ” ही तर लताची सिग्नेचर ओळख झालीय. पण बाकीची सारी शास्त्रीय गाणी भूपेंद्रने ताकतीने निभावली आहेत-आर्डी ची जादू शिंपडत ! आणि “दोनों” याद आ गए I डोळ्यांसमोरील ” रोशनी कम हो गयी”!

नृत्यांगना हेमाला झाकोळून टाकत गुलज़ार /आर्डी जोडी छा गई. धर्मेंद्र तसा तोंडी लावण्यापुरता आणि जितेंद्रकडून “परिचय “सोडला तर फार काही अपेक्षा बाळगायच्या नाहीत हे मनावर बिंबविलेले.

मनात विचार आला – लता/भूपेंद्र या दोघांच्याही देहावसनानंतर गुलज़ारने श्रद्धांजलीपर काही लिखाण केल्याचे वाचनात नाही. दोघेही त्याचे बहिश्चर प्राण. लताच्या एका कार्यक्रमात तर त्याने तिचा खूप सुंदर परिचय ही करून दिलेला. मग आता तो स्तब्ध का?

किशोर कदम आणि अमृता सुभाष लाही मेसेज पाठवून विचारणा केली. अद्याप त्यांचे उत्तर नाही.

बहुधा यंदाच्या एखाद्या दिवाळी अंकात त्याचा लेख असेल अशी आशा आहे.

दुसरा विचार आला- ६ फेब्रुवारी २०२३ ला (पुढील वर्षी) लताच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त मांडू ला जायचे आणि तिथल्या वाड्या-वस्त्यांवर “नाम गुम जाएगा ” शोधत बसायचे.
सापडतील ती “दोघे” तिथे !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..