नवीन लेखन...

दुधीची खीर

Dudheechi Kheer

आपण दुधीचा हलवा बर्‍याचवेळा खाल्ला असेल. फारच मस्त असतो. पण कधी दुधीची खीर खाऊन बघितलेय? ही पण एक सुंदर आणि चविष्ट पाककृती आहे. चला बघूया कशी करायची ते..

p-22103-dudhichi-kheerसाहित्य – 

दुधी अर्धा किलो.
दूध पाव लिटर
साखर एक वाटी
तुप
वेलची
किसमीस
केशर

कृती –

प्रथम दुधी किसुन घेणे. नंतर गॅसवर भांडे तापत ठेवुन त्यामध्ये फोडणीसाठी थोडे साजुक तुप घालणे.

तुप तापल्यावर त्या मध्ये वेलची घालणे. वेलची तडतडल्यावर त्या मध्ये किसलेला दुधी घालणे व परतणे. दुधी थोडा लालसर झाल्यावर त्यामध्ये दुध घालुन उकळी आणणे.

नंतर त्यामध्ये केशर, किसमीस घालुन सजवणे. सजविण्यासाठी ड्रायफ्रूटचा वापर केला तीही उत्तम….

तयार झाली चविष्ट दुधीची खीर !!

— सौ अलका मुजुमदार 

Avatar
About सौ. अलका मुजुमदार 2 Articles
सौ. अलका मुजुमदार या खादयसंस्कृती आणि ग्रामीण संस्कृती या विषयांवर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..