रोग्यावर उपचार म्हणजे संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य साधणे अशी डॉ. हनेमन यांची मनोधारणा होती. याच सुमारास ‘कुलन’ नावाच्या शास्त्रज्ञाने सिंकोना बार्क या वनस्पतीमध्ये काही ठराविक रोग बरे करण्याचे सामर्थ्य असल्याचे सिद्ध दलदलीच्या जागी उगवणाऱ्या केले.
सिंकोना या वनस्पतीच्या सेवनाने स्वतःमध्ये झालेले बदल व वयोमानानुसार होत असलेले बदल सारखेच असल्याचे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले. यावरून डॉ. हनेमन यांनी अनुमान काढले की, एखाद्या औषधाच्या सूक्ष्म मात्रेच्या सेवनाने निरोगी माणसाच्या शरीरात ठराविक लक्षणे दिसू लागली तर ते औषध तशीच लक्षणे असलेल्या रोगावर उपायकारक ठरते. त्यांनी स्वतःच्या अनुभवातील टिपणींवरून हे संशोधन केले. त्यांच्या लक्षात आले की, जेव्हा एखाद्या रोग्याला खात्रीचा उपाय म्हणून दिलेले एखादे औषध निरोगी माणसाने सेवन केले तर त्याचा रोग्याला झालेल्या लक्षणांसारखा विपरीत परिणाम होतो. हे निदर्शनास आल्यावर त्या अनुषंगाने त्यांनी ६ वर्षे संशोधन चालू ठेवले. वेगवेगळे प्रयोग केले. शेवटी १७९६ साली ५० औषधांची नामावली त्यांनी प्रसिद्ध केली. अशा तऱ्हेने सूक्ष्म मात्रा देऊन उपाययोजना केल्यास विशिष्ट रोग बरे करण्यासाठी विशिष्ट औषधांचा पुरेपूर उपयोग होते हे सिद्ध केले.
यात त्यांना अनेक अडचणी आल्या. अनेकांनी टीकास्त्र झोडले. या औषधांच्या सकारात्मक परिणामाविषयी पुरेशा तपशीलाचा अभाव होता. त्यामुळे त्यांना कडव्या विरोधाला तोंड द्यावे लागले. शेवटी त्यांनी स्वतःवरच प्रयोग केले व इतर काही निरोगी लोकांवर प्रयोग केले. आणि त्यातूनच अशी औषधोपचाराची एक नाविन्यपूर्ण प्रणाली जगापुढे आली. प्रदीर्घ काल वैद्यक सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या या महान संशोधकाची २ जुलै १८४३ रोजी प्राणज्योत मालवली. सूक्ष्माचा परिणाम अभ्यासणारा हा संशोधक ब्रह्मांडात विलीन झाला.
-डॉ. अपर्णा रणदिवे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply