नवीन लेखन...

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग १

१८५० ते १९३० या कालखंडात  मलेरियाच्या तापाने जगभरात थैमान घातले होते लक्षावधी लोकांचा बळी घेतला होता.  अमेरिका, युरोप पासून ते थेट भारतापर्यंत वैद्यक शास्त्रातील अनेक संशोधकांनी या रोगाचे कारण शोधण्याचा चंगच बांधला होता.

संशोधनाच्या क्षेत्रातील  चुरशीच्या चढाओढीत अथक प्रयत्नांती डॉक्टर  रोनाल्ड रॉस हे अग्रेसर ठरले.  यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की या त्यांच्या प्रयोगाची कर्मभूमी असलेला भारत देश व त्या संशोधनाच्या प्रक्रियेत भारतवासीयांचा सहभाग या दोन्ही गोष्टी जगाच्या इतिहासात अत्यंत कौतुकाच्या व मानाच्या स्थानी आहेत.

रोनाल्ड रॉस यांच्या जीवनातील चढ-उतार, आपल्या कामात त्यांनी घेतलेली अविश्रांत मेहनत व त्याचबरोबर सोबतीला असलेले त्यांचे हळुवार कवी मन हे सर्व अत्यंत लक्षणीय आहे.

अठराशे सत्तावन सालातील भारतातील प्रसिद्ध स्वातंत्र्यलढ्याच्या काळात १३ मे रोजी अल्मोडा-नैनिताल-उत्तर प्रदेश या गावी रोनाल्ड रॉस यांचा  जन्म झाला. त्यांचे आजोबा व वडील दोघेही सैनिक पैशाचे.  भारतातील ब्रिटिश सरकारमध्ये कर्तबगारी  गाजवून त्यांनी इमानेइतबारे नोकरी केली.  त्यामुळे लहानपणापासूनच घरात सैनिकी वातावरण व कडक शिस्तीचे संस्कार होते.  रॉसने त्याच्या लहान वयात वडिलांना झालेला मलेरियाचा अतोनात त्रास अगदी जवळून पाहिला होता.  वयाच्या आठव्या वर्षी शिक्षणाकरिता त्याची रवानगी इंग्लंडमध्ये झाली. शालेय   अभ्यासात चित्रकला व साहित्य यात उत्तम प्रगती असून सुद्धा वडिलांच्या निव्वळ कडक धाकामुळे  रोनॉल्डला वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातच प्रवेश घ्यावा लागला.  वास्तविक उत्तम कवी, चित्रकार व संगीताची आवड असलेल्या  रोनॉल्डला डॉक्टर बनण्याची मुळीच इच्छा नव्हती.  एकीकडे तो त्याच वेळी कथा-कादंबऱ्या देखील नाहीत असे.  परंतु डॉक्टर झाल्यानंतर याच रॉसला नियतीने त्याच्या जगन्मान्य संशोधनाच्या मार्गाकडे  खेचून नेले.

अंतिम वैद्यकीय परीक्षा कशीबशी उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहास्तव भारतीय वैद्यकीय सेवेसाठी मद्रास येथे रॉसची नियुक्ती झाली. तेथून बर्मा युद्धाच्या निमित्ताने त्याने अंदमान बेटावरही काम केले.  त्याचे सैन्यातील रोगी हे मुख्यतः मलेरिया या तपासणी असत.  त्यापैकी काहीजण क्विनिन हे औषध घेऊन बरे होते परंतु बऱ्याच जणांना औषधे वेळेवर न मिळाल्याने ते दगावत. या सर्वांचे हाल पाहून रॉस उद्विग्न होत असे.  त्याच सुमारास त्याला गणित विषयाची गोडी लागली होती.  त्याचा उपयोग पुढे त्याने मलेरियावरील संशोधनात केला.

(क्रमशः)

— डॉ.  डॉक्टर अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..