मलेरियाचा इतिहास – भाग ५

मलेरियाला बळी पडलेल्या काही प्रमुख व्यक्तींची नावे याप्रमाणे आहेत.

१) राजा ऑगस्टस इटली इ.स. पूर्व ८१
२) अलेक्झांडर द ग्रेट इ.स. पूर्व ३२३ –  भारतामधून विजय संपादून मेसोपोटेमिया मधून परत जाताना याला तापाची लागण झाली.
३) पहिला आर्च बिशप ऑफ कॅंटे बरी
४) जर्मन राजा हेन्रिक इ.स. ११९७
५) मंगोल राजा चेंगिजखान –  अर्धे जग अतिशय क्रूरपणे पादाक्रांत करणाऱ्या राजा चेंगिजखान याला १२२७ मध्ये तापाने अनेक महिने पछाडले व वयाच्या ६० व्या वर्षी खंगलेल्या अवस्थेत त्याला मृत्यू आला.
६) प्रसिद्ध इटालियन तत्त्ववेत्ता व कवी – दांते इ.स.१३२१
७) सुलतान महमद तुघलक इ.स. १३५१
८)  रोममधील व्हॅटीकन सिटी येथील अनेक पोप या आजाराला बळी पडले होते म्हणून या तापाला रोमन ताप म्हणत.

जगातील इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना वारंवार येणाऱ्या तापाने ग्रासले होते. परंतु त्या सर्वांचे नशीब बलवत्तर ठरले व त्यांचा मृत्यू या तापाने झाला नाही. या व्यक्ती खालील प्रमाणे आहेत.

१) जॉर्ज वॉशिंग्टन यांना ५ वेळा
२) अब्राहम लिंकन –  यांना लहानपणी अनेक वेळा तापाने बेजार केले होते.
३) जॉन एफ. केनेडी-१९४३ मधील दुसऱ्या महायुद्धात युद्धभूमीवर असताना ते तापाने हैराण झाले होते.
४) ख्रिस्तोफर कोलंबस –  हा चौथ्यावेळी जगाच्या सफरीवर आशिया खंडाचा मार्ग काढण्यास निघाला होता, त्यावेळी तीव्र तापामुळे त्याला दौऱ्याच्या मध्यावरच परत फिरावे लागले.
५) व्हिएतनाम चे होचिमिन
६) महात्मा गांधी
७) अर्नेस्ट हेमिग्वे
८) मदर तेरेसा
९) जगप्रसिद्ध भारतातील शिकारी जिम कॉर्बेट

– डॉ. अविनाश वैद्य

About डॉ. अविनाश केशव वैद्य 41 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…