नवीन लेखन...

डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम आणि वाचकदिन

डॉ. अब्दुल कलाम यांची स्वाक्षरी सतिश चाफेकर यांच्या संग्रहातून 

डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस …१५ ऑक्टोबर १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला.

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

ए .पी.जे. अब्दुल कलम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वर यथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते.

डॉ. अब्दुल कलाम यांची स्वाक्षरी 
सतिश चाफेकर यांच्या संग्रहातून

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..

अब्दुल कलाम यांनी तारून पिढीला स्वप्ने बघायला शिकवले. हजारो मुले त्याचे त्याचा विचारांचे अनुकरण करू लागली. मला आठवत आहे मी त्यांना राष्टपती व्हायच्या आधी एस .आई .एस. कॉलेज मध्ये भेटलो होतॊ . एका ओळखीच्या सद्गृहस्थाबरोबर गेलो होतो म्ह्णून आत स्टाफ रूम पर्यंत जाऊ शकलो. तितक्यात इडली-सांबार स्टाफ रूम मध्ये आणला. प्रत्येकाला एक एक डिश देण्यात आली. बाजूला शंकऱ्याचार्य आले होते ते मात्र त्याच्या आसनावर बसले होते . आम्ही पाच-सात जण आणि त्यात एपीजे पण आम्ही सर्व जण उभेच होतो ते काही तरी बोलत होते आम्ही आईकत होतो. उभ्या उभ्याच सर्वांची खाणे चालले होते. इतका साधा माणूस मी कधीच पहिला नव्हता. नंतर त्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. पुढे त्याची भाषणे आय.आय.टी. आणि अनेक ठिकाणी आईकली. ते भारताचे राष्ट्र्पती होते , भारतरत्न होते , भारतातील आणि देशाबाहेर सुद्धा त्यांना खूप मानसन्मान मिळाले पण एक मात्र खरे ते भारतीय होते आणि संवेदनशील माणूस होते हे महत्वाचे.

सतत राष्ट्राचा विचार आणि मुलांचा विचार त्याच्या मनात असे.

..आणि त्याच्या आयुष्याचा शेवटही मुलांना भाषण देण्याच्या तयारीत असतानाच झाला. २७ जुलै २०१५ रोजी त्यांचे शिलॉंग यथे निधन झाले.

त्यांचा जन्मदिवस हा आपल्या या देशात ‘ वाचक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..