बहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी

डॉ. डी.वाय.पाटील ज्यांना सामाजिक कार्यासाठी १९९१ साली भारत सरकारने पद्मश्री पुरासाकाराने अन्मानीत केले आणि आत्ताचे त्रिपुरा राज्याचे राज्यपाल. डॉ.अनिरुद्धांच्या कार्याचे वर्णन करतांना म्हणतात “अस्सल आणि सत्यवचन सांगणाऱ्या ज्ञानदेवाप्रमाणे, कंटाळवाणे-किळसवाणे विधी पद्धती श्री.अनिरुद्ध बापुंनीही धुडकावून लावल्याचे माझ्या लक्षात येताच श्री.साईबाबा, श्री.गजानन महाराज, श्री.स्वामी सामर्थ या सर्वांचे एकत्रित दर्शन बापुरुपाने मज घडले” म्हणजेच अंधश्रद्धा निर्मुलन.

श्री.महेश अटाळे, राष्ट्रीय मल्लखांब समितीचे सदस्य, दादरचे समर्थ व्यायाम मंदिर, अंधेरीचे विजयनगर आणि पार्लेश्वर व्यायाम मंदिराचे प्रशिषक, आणि श्री.श्रेयश म्हसकर, मुंबई मल्लखांब असोसिएशनचे सचिव व समर्थ व्यायाम मंदिरात जिमनॅस्टिक आणि मल्लखांबचे शिक्षक. दोघांचे क्रमश: “सोलिड डॉजो” आणि “बापू साहेब” डॉ.अनिरुद्धांवरील लेख खुपकाही सांगून जातात. बापूंना व्यामाची कशी आवड होती ते कसा व्यायाम करीत असतं? आणि त्यात बरोबर त्यांच्या वयक्तिक जीवनात काय अनुभव आले तेही त्यांनी त्या लेखात व्यक्त केले आहेत.

कुठल्याही सर्वसामान्य मुलाचे बालपण ते मुल लहान असताना व्यतीत करतं तसेच डॉ.अनिरुद्ध जोशींचे बालपण आपल्याला त्यांच्या बालपणीचे मित्र/मैत्रीण श्री.सुरेश व स्वप्नजा परब यांच्या लेखातून व्यक्त होते.  मित्र/मैत्रीण गरीब-श्रीमंत असो, ढ असो हुशार असो त्यांच्यात त्यांनी कधीही भेदाभेद केला नाही अर्थात त्या वयात एवढी समज सगळ्यांना नसते पण डॉ.जोशींचे विचारच वेगळे होते. त्यांना त्याही वयात खूप चांगली समज आणि उमज होती याचे श्रेय त्यांच्या आई व आजींना जाते. त्या बालवयात त्यांनी डॉ.जोशींच्या बाल मनावर फार चांगले आचार आणि विचार रुजवले आणि ते त्यांनी समर्थपणे पेलले आणि आचरणात आणले.

शालेय तसेच डॉक्टरी शिकत असतानंचे मित्र/मैत्रिणी डॉ.शिरीष दातार, डॉ.केशव नर्सिकर, तसेच शिष्य डॉ.विजय मेहता, डॉ. अनिरुद्ध जोशींच्या नायर हॉस्पिटल मधील सिस्टर सौ.मीरा पुरोहित व दमयंती पवार म्हणतात डॉक्टर साहेब त्यावेळी सर्वांशी हसत खेळत तसेच मोठया शिस्तीचे होते पेशंट व त्यांच्या कुटुंबियांना धीर देत असत. हेही अनुभव खूप काही सांगून जातात. पेशंट त्यांचे नातलग असोत कुणीही भेटले तरी त्यांची विचारपूस करीत त्यांना काही हवं नको याची चौकशी आस्थेने करीत असतं असे प्रत्येक मित्र/मैत्रिणीच्या आठवणींच्या लेखातून प्रगट होताना दिसते. एवढा मोठा एम.डी. डॉक्टर असूनही कधी हुशारी, देखणेपण, रुबाब आणि श्रीमंतीचा गर्व व बडेजाव त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसला नाही असे त्यांचे मित्र/मैत्रिणी लिहितात. कुठलाही बेगडी आणि मुखवटे घातलेला डॉ.अनिरुद्ध जोशी त्यांच्या ना बालपणीच्या, त्यानंतरच्या व परमपूज्य सदगुरु बापू झाल्यानंतर त्यांच्या वागण्या-बोलण्यात, स्वभावात आणि प्रत्यक्ष कृतीत कधीही आढळा नाही असे मित्र/मैत्रिणीने त्यांच्या लेखात लिहितात. उलट भेटीत लहानपणाच्या आठवणींना उजाळा देऊन मैत्री अधिक दृढ व घट्ट होत गेली असाच त्यांचा अनुभव आहे.

श्री.रत्नाकर शेट्टी भारतीय क्रिकेट प्रशासनाशी जोडलेलं नाव १९९६, १९९८, २००१ आणि २००३ या वर्षात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव म्हणतात “बापूंकडे कुठल्याही प्रकारची सक्ती नसते, हे मला सर्वाधिक आवडलं. तुम्हीं बापूंकडे जाता, त्यांचं दर्शन घेता पण इथे तुमच्यावर कुठल्याही गोष्टी लादल्या जात नाहीत. ही मोकळीक आणि हे स्वातंत्र्य मला अतिशय भावत” “बापूंची अध्यात्मिक चळवळ चुकीच्या समजुती दूर करण्यापासून ते सामाजिक बांधीलकी वाढविण्यापर्यंत अनेक गोष्टी समाजाला देत आहे”. सॉलीसिटर दिव्या शहा सर्वोच्च न्यायालयातील विख्यात आणि निष्णात वकील त्यांना त्यांच्या जीवनात आलेल्या एका अनुभव नंतर सांगताना की “माझ्या मनाशी खुणगाठ पक्की झाली–बापू ही असामान्य शक्ती आहे, सर्वधारण मानवाच्या आवाक्यापलीकडची. त्यांच्या दृष्टीला जे दिसतं, ते कोणा मानवाला दिसण संभवच नाही. त्यांनी ठरवलेल्या गोष्टी घडतातच; त्यांच्या डायनॅमिक वृत्तीमुळे त्यांच्या संकल्पामध्ये कोणीही व काहीही त्यांना आडकाठी, अवरोध करूच शकत नाही” “जेव्हां जेव्हा मी त्यांना पाहतो, त्यांचं स्मरण करते तेव्हां तेव्हां मला शांततेचा, सुखद असाच अनुभव येतो आणि ते सैदव माझ्या मदतीला माझ्याबरोबर असतात अस जाणवत राहत”, गीतकार समीर म्हणतात त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वने मी भारावून गेलो, तो एक वेगळा प्रकाश आहे., संगीत क्षेत्रातील फाल्गुनी पाठक म्हणतात की संगीत शिकण्यापेक्षा विविध भाषेतील संगीतकारांची गीते व शास्त्रीय संगीत कसे ऐकावे हे मला बापूंच्यामुळे समजले, मिलिंद गुणाजी एक उत्तम व्यावसाईक नट म्हणतात “मी बापू परिवाराशी संलग्न आहे हे मी माझं भाग्य मानतो”.

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 226 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…