नवीन लेखन...

क्रिकेटपटू एकनाथ सोलकर

एकनाथ धोंडू सोलकर म्हणजेच एकनाथ सोलकर यांचा जन्म १८ मार्च १९४८ साली मुंबईत झाला. एकनाथ सोलकर याना सर्व ‘ एक्की ‘ या टोपणनावाने हाक मारत. त्यांचे वडील हिंदू जिमखान्यावर माळी म्हणजे ग्राऊंड्समन होते. एकनाथ सोलकर लहान असताना त्या मैदानावर सामना असेल तर स्कॉरबोर्ड कधीकधी सांभाळायचे. त्यांचे बंधू अनंत सोलकर हे फर्स्ट क्लास क्रिकेट आणि रणजी सामने खेळलेले होते.

एकनाथ सोलकर शाळेतून क्रिकेट खेळत असताना १९६४ साली ते श्री लंका येथे गेले, तर भारतीय शालेय संघाबरोबर कप्तान म्ह्णून १९६५-६६ मध्ये इंग्लंडच्या शाळेच्या संघाशी खेळण्यास गेले. एकनाथ सोलकर ह्यांनी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणही केले. त्यावेळी शॉर्ट लेगला कोणीही उभे राहण्याचे धाडस करत नव्हते कारण तेव्हा हेल्मेटचा जमाना नव्हता. अत्यंत धोक्याची जागा होती ती. पुढे राहून सोलकरांनी अक्षरशः कॅचेस खणून काढले असे म्हणावे लागेल. बेदी, प्रसन्न, चंद्रशेखर आणि समोर शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर म्हटले की बॅट्समनची भंभेरी उडायची. ते जगातले उत्तम क्लोज फिल्डर होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते पहिला कसोटी क्रिकेट सामना १५ ऑक्टोबर १९६९ साली न्यूझीलंड विरुद्ध खेळले. त्यांनी २७ कसोटी सामन्यात ५३ झेल घेतले.

माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ सोलकर असे खेळाडू होते की ते पहिल्या स्थानापासून अकराव्या स्थानापर्यंत खेळायला यायचे, म्हणजे जशी गरज असेल त्या स्थानावर खेळायचे. त्यांनी २७ सामन्यात १०६८ धावाही केल्या त्याच्या नावावर एक शतक आहे तर सहा अर्धशतके. त्यांची सर्वोच धावसंख्या आहे १०२. ते उत्तम डावखुरे फलंदाज होते. मात्र त्यानी १८९ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात ६८९५ धावा केल्या त्यात आठ शतके आणि छत्तीस अर्धशतके केली, त्यात त्यांची सर्वोच धावसंख्या होती नाबाद १४५. ते उत्तम गोलंदाजही होते, त्यांनी कसोटी सामन्यात १८ खेळाडू बाद केले तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २७६ खेळाडू बाद केले. त्यांनी सात एकदिवसीय सामनेही खेळले होते.

एकनाथ सोलकर आणि शोर्ट लेगला असणारी त्यांची फिल्डींग हा सम्पुर्ण क्रिकेट जगतात चर्चेचा विषय होता. एकदा मला ते सी.सी.आय. ला भेटले असताना मी त्यांना म्हणालो,” सर तुम्हाला जोराचा चेंडूचा फटका लागण्याची भीती वाटत नव्हती का ?” तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते आईकून मी आणि माझ्या बरोबरचे मित्र हबकले. ते म्हणाले.” त्यात काय मैदानावर शहीद झालो असतो.” असा हा भारतीय संघाचा खेळाडू अत्यंत खडतर परिश्रमातून ह्या पदापर्यंत आला होता.

ह्या झुंझार अशा एकनाथ सोलकर यांचे २६ जून २००५ साली मुंबईत निधन झाले तेव्हा ते सत्तावन वर्षाचे होते.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..