नवीन लेखन...

गृहनिर्माण संस्थेचे हेल्थ चेकअप कसे कराल ?

येणाऱ्या नवीन सहकार वर्षात, सदस्य आणि संस्थेचे पदाधिकारी यांत परस्पर सौदाह्याचे, आनंदाचे व सहकार्याचे वातावरण तयार करण्यास तसेच होणाऱ्या चुका कमी करण्याबाबत काय करावे? असा प्रश्न एका सदस्याने विचारला. “Precaution is always better than cure”. याचे उत्तर ज्या प्रमाणे इन्कमटॅक्स साठी CA, आजारी पडलात की डॉक्टर, त्याप्रमाणे आपण स्वत: आपला मौल्यवान वेळ कायद्याची पुस्तके वाचून चुकीचे निर्णय घेण्याआधी योग्य कायदेतज्ञ यांचा सल्ला आपल्याला नक्कीच उपयोगी येईल. बहुतेक लोकांना उपविधी म्हणजे कायदा किंवा एखादा सोशल मिडिया मेसेज हा आपल्या मनासारखा असेल तर बरोबर अशी चुकीची समजूत असते. आज या लेखात तुम्हाला सदस्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती देत आहे.

प्रश्न क्र. ७६) गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांना कोणत्या प्रकारचे अर्ज संस्थेत करावे लागतात ? पदाधिकारी यांनी काय काळजी घेणे अपेक्षित असते?

उत्तर:

१) सभासद हस्तांतरणाचा अर्ज

२) नॉमिनीची नोंद घेण्याबाबतचा अर्ज

३) सदनिका अंतर्गत दुरुस्तीचा अर्ज

४) सदनिकेच्या तारणावर बँकेकडून कर्ज मागण्यासाठी विहित नमुन्यातील संस्थेचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी केलेला अर्ज

५) इतर कोणत्याही स्वरूपाचा (बिलांबाबत, आकारणीबाबत, पार्किंगबाबत, विशेष सर्वसाधारण सभेबाबत) अर्ज. कोणतेही अर्ज सदस्यांकडून प्राप्त झाल्यावर आठवड्याभरात सदर अर्ज निकालात काढला आहे की नाही हे पाहणे.

प्रश्न क्र. ७७) संस्थेची इमारत जुनी असल्यास पदाधिकार्‍यांनी इमारतींचे बांधकाम लेखापरीक्षण (Structural Audit) कशा प्रकारे करून घेणे अपेक्षित आहे?

उत्तर:

१) १५ ते ३० वर्षे जुन्या इमारतीसाठी: ५ वर्षातून एकदा

२) ३० वर्षापेक्षा जास्त जुन्या इमारतीसाठी: ३ वर्षातून एकदा बांधकाम लेखापरीक्षण (Structural Audit) हे महानगरपालिका हद्दीमध्ये महानगरपालिकेच्या
नामिकेतील मान्यताप्राप्त अभियंत्याकडून करून घेतले जाईल आणि इतर संस्थांच्या बाबतीत शासनाने मान्यता दिलेल्या अभियंत्याकडून/वास्तुशास्त्रज्ञाकडून करून घेणे आणि त्याची नोंद ठेवणे.

प्रश्न क्र. ७८) सेवा शुल्क तसेच ट्रान्स्फर प्रिमियम व नॉन ऑक्युपन्सी चार्जेस बाबत काय दक्षता घ्यावी?

उत्तर : सेवा शुल्क, ट्रान्स्फर प्रिमियम , नॉन ऑक्युपन्सी चार्जेस इ. आकारण्या शासकीय परिपत्रके व पोटनियम या नुसार आकारण्यात येत असल्याची दक्षता घेणे.

प्रश्न क्र. ७९) पार्किंगबाबत संस्थेने काय दक्षता घ्यावी?

उत्तर: पार्किंगसाठी व्यवस्था पोटनियम करावेत. पार्किंगसाठी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करावी आणि त्यानुसारच सदस्यांना पार्किंग दिली आहे का याची पाहणी करणे.

प्रश्न क्र. ८०) कागदपत्रांबाबत तसेच संस्थेच्या व्यवस्थापन समितीत इतर सदस्यांनी सहभागी होण्यासाठी संस्थेतील पदाधिकारी यांनी काय दक्षता घ्यावी?

उत्तर: बहुतेक वेळा संस्थेत अनेक कागदपत्रे असणे आवश्यक असतात परंतु ती उपलब्ध नसतात तर यासाठी त्या त्या यंत्रणेकडून योग्य ती कागदपत्रे मिळवणे, पोटनियमानुसार जतन करावयाच्या रेकॉर्डची यादी प्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सुस्थितीत व अद्ययावत नोंदी केलेल्या ठेवणे.सहकार विभागाचे आदर्श पोटनियम संस्थेने स्वीकारले असल्याची खात्री करणे व संस्थेची आर्थिकपत्रके, हिशोबपुस्तके, व इतर कागदपत्रे सभासदांच्या मागणीप्रमाणे विनासायास पाहण्यास व प्रती मिळविण्यास उपलब्ध आहेत याची पाहणी करणे. सहकार विभागाचे आदेश, निर्देश,परिपत्रके यातील सूचनांचे व लेखापरीक्षण अहवालातील शेऱ्यानुसार दुरुस्तींचे पालन केलेले आहे का ते पाहणे. संस्थेत सण, उत्सव, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल, पर्यावरण विषयक कार्यक्रम यांचे आयोजन करावे.

१) सभासद हस्तांतरणाचा अर्ज

२) नॉमिनीची नोंद घेण्याबाबतचा अर्ज

३) सदनिका अंतर्गत दुरुस्तीचा अर्ज

४) सदनिकेच्या तारणावर बँकेकडून कर्ज मागण्यासाठी विहित नमुन्यातील संस्थेचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी केलेला अर्ज

५) इतर कोणत्याही स्वरूपाचा (बिलांबाबत, आकारणीबाबत, पार्किंगबाबत, विशेष सर्वसाधारण सभेबाबत) अर्ज. कोणतेही अर्ज सदस्यांकडून प्राप्त झाल्यावर आठवड्याभरात सदर अर्ज निकालात काढला आहे की नाही हे पाहणे.

प्रश्न क्र. ७७) संस्थेची इमारत जुनी असल्यास पदाधिकार्यांनी इमारतींचे बांधकाम लेखापरीक्षण (Structural Audit) कशा प्रकारे करून घेणे अपेक्षित आहे?

उत्तर:

१) १५ ते ३० वर्षे जुन्या इमारतीसाठी: ५ वर्षातून एकदा

२) ३० वर्षापेक्षा जास्त जुन्या इमारतीसाठी: ३ वर्षातून एकदा बांधकाम लेखापरीक्षण (Structural Audit) हे महानगरपालिका हद्दीमध्ये महानगरपालिकेच्या
नामिकेतील मान्यताप्राप्त अभियंत्याकडून करून घेतले जाईल आणि इतर संस्थांच्या बाबतीत शासनाने मान्यता दिलेल्या अभियंत्याकडून/वास्तुशास्त्रज्ञाकडून करून घेणे आणि त्याची नोंद ठेवणे.

प्रश्न क्र. ७८) सेवा शुल्क तसेच ट्रान्स्फर प्रिमियम व नॉन ऑक्युपन्सी चार्जेस बाबत काय दक्षता घ्यावी?

उत्तर : सेवा शुल्क, ट्रान्स्फर प्रिमियम , नॉन ऑक्युपन्सी चार्जेस इ. आकारण्या शासकीय परिपत्रके व पोटनियम या नुसार आकारण्यात येत असल्याची दक्षता घेणे.

प्रश्न क्र. ७९) पार्किंगबाबत संस्थेने काय दक्षता घ्यावी?

उत्तर: पार्किंगसाठी व्यवस्था पोटनियम करावेत. पार्किंगसाठी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करावी आणि त्यानुसारच सदस्यांना पार्किंग दिली आहे का याची पाहणी करणे.

प्रश्न क्र. ८०) कागदपत्रांबाबत तसेच संस्थेच्या व्यवस्थापन समितीत इतर सदस्यांनी सहभागी होण्यासाठी संस्थेतील पदाधिकारी यांनी काय दक्षता घ्यावी?

उत्तर: बहुतेक वेळा संस्थेत अनेक कागदपत्रे असणे आवश्यक असतात परंतु ती उपलब्ध नसतात तर यासाठी त्या त्या यंत्रणेकडून योग्य ती कागदपत्रे मिळवणे, पोटनियमानुसार जतन करावयाच्या रेकॉर्डची यादी प्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सुस्थितीत व अद्ययावत नोंदी केलेल्या ठेवणे.सहकार विभागाचे आदर्श पोटनियम संस्थेने स्वीकारले असल्याची खात्री करणे व संस्थेची आर्थिकपत्रके, हिशोबपुस्तके, व इतर कागदपत्रे सभासदांच्या मागणीप्रमाणे विनासायास पाहण्यास व प्रती मिळविण्यास उपलब्ध आहेत याची पाहणी करणे. सहकार विभागाचे आदेश, निर्देश,परिपत्रके यातील सूचनांचे व लेखापरीक्षण अहवालातील शेऱ्यानुसार दुरुस्तींचे पालन केलेले आहे का ते पाहणे. संस्थेत सण, उत्सव, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल, पर्यावरण विषयक कार्यक्रम यांचे आयोजन करावे.

– अ‍ॅड. विशाल लांजेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..