नवीन लेखन...

करोना से डरोना

करोना व्हायरस यांव केल्याने मरेल आणि त्यांव केल्याने जगेल असे सर्वजण बोलत असतात. मात्र करोना व्हायरस किंवा कोणताही व्हायरस कशानेही मरू शकत नाही. कारण व्हायरस हा सजीव नसतोच. व्हायरस हा एक बायो पार्टीकल म्हणजे जैविक कण आहे. जसे शिंपल्यात एक वाळूचा कण गेल्यावर शिंपल्यातलेच मटेरीयल वापरून त्याचा मोती बनतो, तसेच कोणत्याही पेशीत हा व्हायरस नावाचा कण गेला की त्याच्या अनेक कॉपी तयार होतात. व्हॉट्सअप, फेसबुकवरच्या पोस्ट जशा खूप कॉपी पेस्ट होतात ना तसेच. व्हायरस स्वतः प्रजनन करत नाही तर ज्या पेशीत तो गेला आहे ती पेशीच त्याच्या खूप साऱ्या कॉपी तयार करते.

व्हायरस हा एक छोटासा डीएनए किंवा आरएनए असलेला एक कण असतो आणि त्यावर एक प्रोटीनचे संरक्षक आवरण असते. ते प्रोटीनचे आवरण किती मजबूत आहे किंवा व्हायरस ज्या पेशीत जाणार आहे त्या पेशीशी ते किती समर्पक किंवा मिळतेजुळते आहे त्यावरून तो व्हायरस त्या पेशीत संक्रमित होणार की नाही ते ठरते. आपल्या पेशी नेहमी आपल्या डीएनएच्या कॉपी बनवत असतात. तेच मेकॅनिजम वापरून पेशीत गेल्यावर व्हायरस मधला डीएनए किंवा आरएनए पेशीतील मटेरियल वापरून स्वतःच्या खूप कॉपी बनवतो. ही प्रत्येक कॉपी हा एक नवा व्हायरस कणच असतो. आणि मग पेशीतील मटेरियल संपले की पेशींची वॉल फोडून हे सर्व व्हायरस कण बाहेर येतात आणि शरीरातील इतर पेशींत घुसून त्यांनाही मारतात.

अशा प्रकारे मग अनेक पेशी बाधित झाल्या की मग होस्ट म्हणजे ज्याच्या शरीराच्या पेशींत व्हायरस संक्रमित झाला आहे तो प्राणी मग आजारी होतो. काही व्हायरसचा डीएनए हा होस्टच्या डीएनए सिक्वेन्स मध्ये घुसून त्या प्राण्यातच जेनेटिक चेंज आणू शकतो. हा जेनेटिक चेंज पुढच्या कित्येक पिढ्यांत ट्रान्स्फर होतो. किंबहुना एखादा व्हायरस नेमका कधी अस्तित्वात आला हे प्राण्यांच्या डीएनएतील या बदलावरूनच कळते.

व्हायरस हा सजीवच नसल्याने मग त्याला कोणत्याही औषधाने वा गोमूत्र वा कापूर वा धुराने किंवा पेस्टीसाईडने मारता येऊ शकत नाही. जो जिंदा ही नही है उसे कैसे मारोगे? मात्र कशानेही त्याचे बाह्य प्रोटीन आवरण नष्ट झाले की व्हायरसही नष्ट होतो. हे हवेमुळे, पाण्यामुळे, साबणामुळे, तापमानामुळे, उन्हामुळे असे कशामुळेही होऊ शकते. होस्टच मिळाला नाही की एखादा व्हायरस जगातूनच नष्ट होऊ शकतो. व्हायरस सजीव नसल्याने तो मरूच शकत नाही. काहीही सांगतो काय रे? जर व्हायरस मरुच शकत नाही तर मग डॉक्टर लोक जी औषधे देतात, करोनाची लस शोधण्यासाठी जी पराकाष्ठा चालू आहे ती कशाला?

व्हायरस वर जी लस असते ती कशी काम करते त्या आधी व्हायरस कसा काम करतो ते पाहू. व्हायरस आधी शरीराच्या पेशींच्या वॉल वर रिसेप्टर्स असतात तिथे बॉण्ड बनवतो आणि तिथे चिकटून राहतो. त्या रिसेप्टर्स मधून मग तो हळूच पेशींच्या आत जातो. आत तो आपल्या डीएनएच्या स्ट्रेण्डचा प्रति डीएनए स्ट्रेण्ड (पट्टी) बनवतो. हे स्ट्रेण्ड मग सेपरेट होऊन अजून स्ट्रेण्ड बनवतात. हा प्रत्येक स्ट्रेण्ड मग एक नवा व्हायरस बनतो. मग या नव्या बनलेल्या व्हायरस कणांची भरपूर संख्या झाली की हे व्हायरस त्या पेशींची वॉल तोडून बाहेर येतात आणि बाजूच्या पेशींच्या रिसेप्टर्स वर जाऊन चिकटतात व त्यांना संक्रमित करतात. लस या सगळ्या स्टेप्स पैकी कोणत्याही एका स्टेपवर व्हायरसला ब्लॉक करते. हे ब्लॉकिंग रिसेप्टर्स वर असू शकते, ज्यात लसीत असे केमिकल्स असतात जे व्हायरसचे रिसेप्टर्सशी बॉंडींग होऊ देत नाहीत, किंवा काही लसी व्हायरसच्या डीएनएला केमिकल्सनी रोखून प्रति डीएनए स्ट्रेण्ड बनवू देत नाहीत, काही लसी व्हायरसला वॉल तोडून बाहेर येऊ देत नाहीत. काही लसी व्हायरसचा डीएनएच डॅमेज करून टाकतात आणि मग तो कॉपी होत नाही वगैरे.

आताचा करोना कोविड-19 हा नवा व्हायरस आहे, त्याचे नेमके प्रोटीन्स आणि रिसेप्टर्सचे बॉण्ड कसे असतात, तो नेमका कोणकोणत्या मेकॅनीजमने शरीरात जातो, किंवा नेमका तो कोणत्या केमिकल्सनी डीएनए रेप्लिकेट बनवतोय तेच अजून कळत नाहीय. ते कळल्यावर मग कोणते केमिकल्स त्याच्या कोणत्या स्टेपला रोखू शकतील हे शोधायलाही वेळ लागेल. म्हणून त्याची लस लवकर बनत नाहीय.

व्हायरस हे सहसा प्राण्यांतून माणसांत येतात. व्हायरस हे मुख्यत्वे होस्ट स्पेसिफिक असतात. त्यामुळे एका प्रजातीच्या प्राण्याला लागण झालेल्या व्हायरसची दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याला किंवा माणसाला लागण होईलच असे नाही. मात्र एका प्रजातीत असताना व्हायरसच्या डीएनएमध्ये काही बदल झाला आणि हा बदल एखाद्या दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याच्या शरीराशी संलग्न होण्यास योग्य असेल तर मात्र हा व्हायरस दुसऱ्या प्राण्यात संक्रमित होऊ शकतो. आताच्या कोविड-19 चे साधर्म्य वटवाघळे आणि खवल्या मांजरात असणाऱ्या करोना व्हायरसशी आढळले आहे. व्हायरस तयार करण्याइतकी टेक्नॉलॉजी अद्याप विकसित झालेली नाही त्यामुळे चीनने हा व्हायरस तयार केला असेल हे खरे नाही. बाकी तो लॅब मधून चुकून बाहेर गेला असू शकतो परंतु तीही शक्यता कमी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा व्हायरस जेनेटिक बदल होऊन वटवाघूळांतून खवल्या मांजरांत गेला आणि खवल्या मांजरांतील व्हायरसमध्ये जेनेटिक बदल होऊन तो माणसांत आला अशी जास्त शक्यता आहे.

मांस शिजवून खाल्ल्याने व्हायरस सहसा नष्ट होतात हे खरे, कच्च्या मांसालाही गरम पाण्यात टाकून मग धुवावे आणि मग शिजवून खावे. संक्रमित पृष्ठभागास स्पर्श केल्याने काही व्हायरसची लागण होऊ शकते. मात्र नव्या करोनाचे संक्रमण अशा प्रकारे होते का हे अद्याप आपल्याला नेमके माहीत नाही. उन्हाळ्यातील तापमानाने व्हायरसचे प्रोटीन नष्ट होऊन व्हायरस नष्ट होऊ शकतो, मात्र कोविड-19 करोना हा आताच आला असल्याने उन्हाळ्यात तो वाढतो की नष्ट होतो हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही.

हात चांगल्या सॅनिटायजरने धुतल्याने व्हायरसचे प्रोटीन कवच नष्ट होऊन तो नष्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त कुठेही अनावश्यक स्पर्श न करणे, जो कुणी शिंकत वा खोकत असेल त्याच्यापासून 3 फुट दुर राहणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. करोना हवेतून पसरत नाही, शिंक किंवा खोकल्याच्या तुषारांतून पसरतो म्हणून 3 फूट दूर राहीले पाहीजे. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो. आपण स्वतः आजारी असू किंवा आजारी माणसाची सेवा करत असू, वा आजारी माणसाजवळ जात असू तरच मास्क वापरावा असे WHO ने सांगितले आहे. अन्यथा उगीच मास्क वापरू नये. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो. करोनाचा mortality रेट हा 3.4% आहे. म्हणजे हा आजार 1000 माणसांना झाला तर त्यातील 34 माणसांचा मृत्यू होऊ शकतो. यातही म्हाताऱ्या माणसांना जास्त रिस्क आहे. 80 पेक्षा जास्त वय असणारांत हा रेट 15% आहे. मात्र हा दर अजून कमी होईल असे WHO म्हणते.
SARS या आजाराचा मृत्युदर हा 10% तर MERS चा 34% इतका म्हणजे करोनाच्या दहापट जास्त होता. व्हायरसने होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा एक ढोबळ नियम असा आहे की जो आजार जास्त पसरतो त्याचा मृत्युदर कमी असतो, आणि जो कमी पसरतो त्याचा मृत्युदर जास्त असतो.

स्वच्छता राखणे, लक्षणे दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणे, खोकताना व शिंकताना नाक तोंड रुमालाने अथवा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की आपण करोनापासून वाचू शकतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..