नवीन लेखन...

कुकर…

"सजीव" वस्तू

आज सकाळी चहा घेत बसले होते.. गॅस वर कुकर लावला होता.. या कुकर चं काय एवढं असं विचाराल.. तर हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका बरं का.. 20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..अहो बरोबरच आहे !.. आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच.. वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात. पण वापरायला घरात दुसरा कूकर असला तरी सासूबाईंना हा कुकर प्राणांहून प्रिय आणि म्हणूनच डॉक्टर जसा रुग्णाला वाचवायचे आटोकाट प्रयत्न करतात तसेच प्रयत्न माझ्या सासूबाई या कुकर ला वाचवण्यासाठी करत असतात..त्याचे स्क्रु पुन्हा पुन्हा बसवून आणतात.. वाफ धरत नसली की रिंग बदलतात.. नाही नाही.. बरं का !.. बसवून आणायला सांगतात ..कुणाला? अहो असं काय करताय..’क्षणाचा सवंगडी आणि अनंतकाळचा गडी’… ओळखलं असेलंच तुम्ही.. नवरा..
आणि माझे सासरे अगदी निमुटपणाने दर वेळी तितक्याच उत्साहाने कुकर दुरुस्त करून आणतात..माझ्या मनात नेहमी विचार येतो..एकदा तरी सासरे वैतागले असतील..की नाही बाबा मी नाही जाणार..नवीन कुकर आणू आपण..पण कसं काय देव जाणे, सासूबाई त्यांना convince करतातच,” हा माझा पुरण शिजवायचा कुकर आहे..यात पुरण छान शिजतं..”… आता जगातला हाच तो एकमेव कुकर कसा असेल ज्यात पुरण छान शिजतं असा निरागस प्रश्न सासरे बुवांना कधी पडू नये.?..पण गोड खाण्याचे शौकीन असणारे माझे सासरे ‘पुरण’ हा शब्द ऐकून पाघळत असावे..कारण पुरण पोळी त्यांचा weak point.. आपण कुकर दुरुस्त करून आणला नाही तर ही बाई रागवून पुरणपोळ्या करणार नाही या दहशतीमुळेच का काय तेही तितक्याच उत्साहात हा कुकर दुरुस्त करून आणतात..
   पण सर्वात जास्तं कौतुक मला त्या कुकर चं वाटतं..साहेबांना दुरुस्त करून आणलं की तो ज्या ऐटीत शिट्या मारतो म्हणून सांगू..!! या कुकर मधे आणि आमच्या आजोबांमधे (माझे आजे सासरे..वय वर्ष 93) मला नेहमी साम्य वाटतं..गेल्यावर्षी आजोबा बरेच आजारी पडले..admit करावं लागलं..वय लक्षात घेता तब्येत गंभीर होती..आम्ही जेवायला बसलो असताना फोन वाजला..आजोबा serious..hospital ला येऊन भेटून जा..आम्ही मनाची तयारी केली..hospital ला पोहोचलो..बघतो तर काय!आजोबा टुणटुणीत..पूर्ण शुद्धीवर..bp नॉर्मल..pulse नॉर्मल..आणि मस्तं बोलत बिलत होते..welcome सिनेमा मधल्या rdx सारखं ‘हम कहीं नही जा रहे…अभी हम जिंदा हैं” म्हणत 8व्या दिवशी discharge मिळून घरी परत आले..सुदैवाने आता तब्येत ऊत्तम आहे.
   आमचा कुकर सुद्धा थोडे फार उपचार घेतल्यानंतर असाच टुणटुणीत होतो..मग ऐट बघायला हवी त्याची..ISRO चे आपण PSLV  यान आहोत  आणि आता बुडाला आग लागल्यावर आपण हे गगन भेदून चंद्रावर जाणार असंच त्याला वाटतं..अशापद्धतीने तो संपूर्ण हादरतो आणि मग शिट्या मारतो..गेल्या जन्मी हा कुकर नक्कीच अवकाशातलं यान असावा आणि यानाचे थोडे गुणधर्म घेऊन हा या जन्मी कुकर झाला असावा असं मला नेहमी वाटतं..पुन्हा काही दिवस साहेब ऐटीत काम करतात…कुकर लावताना पुन्हा वाफ जाते..पण सासूबाई हार मानत नाहीत..काहीतरी करून त्या कुकर ला पुरण शिजवायला लावतातच..आता आमच्याकडे का हा एकच कुकर असणार? याच्या जोडीला याचा भाऊ आहेच की! पण या कुकरने अशी काही जादू केलीय की सासासुबाईंना तो वापरता नसला तरी स्वयंपाकघरात नजरेसमोर लागतो. इतकंच नव्हे तो दुरुस्तही असलेला लागतो.
   अहो थोडक्यात काय..यंत्र असो वा माणुस..सतत स्वत:ला थोडं थोडं दुरुस्त करत रहायचंय..कधी तरी खचायला होणारंच आहे..24×7 खूश असं कुणीच राहू शकत नाही..पण हो, खचल्या सारखं वाटेल तिथेच स्वत:ला पुन्हा सावरायचं..एखादं पुस्तक वाचायचं..एखादा सिनेमा पहायचा..मस्तं कॉफी घ्यायची किंवा सरळ झोपायचं..किती तरतरी येते याने..मनावरचं मळभ काही काळ तरी दूर करता येतं..पुन्हा low वाटलं की पुन्हा यातून बाहेर काढायचं..हा कुकर स्वत: स्वत:ला दुरुस्त नाही करू शकत..पण माणसामधे ती ताकद आहे..प्रेमाची कितीही माणसं जवळ असली मदत करायला तरीही शेवटी आपलं आपल्यालाच सावरायचंय हे पक्क लक्षात असू द्या..स्वत:ला हार मानू द्यायचं नाही म्हणजे नाही..अगदी आमच्या या जुन्या कुकर सारखं..दरवेळी दुरुस्त व्हायचं आणि दुप्पट उत्साहात शिट्या मारायच्या..
   करून बघा नक्की…..
—गौरी

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

5 Comments on कुकर…

  1. गौरी,

    तू वयाने माझ्याहून खूप लहान आहेस म्हणून तुला मी “तू” असे संबोधत आहे.

    सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देवाने तुला असाधारण लावण्य दिले आहे हे तुझा फोटो दाखवते; आणि त्याच्या जोडीला तुझी फोटोमधली pose — म्हणजे मातृभाषेत “तुझा फोटोमधला पवित्रा” — अगदी रम्य आहे. तू प्रेक्षकांना जेव्हा भरतनाट्य सादर करत असशील तेव्हा रंभा, उर्वशी, मेनका ह्यांपैकी कोणती तरी अप्सरा स्वर्गलोकातून त्यांच्यापुढे रंगमंचावर अवतरली असावी असे त्यांना निश्चित वाटत असावे.

    आता कल्पनेने रंगमंचावरचे तुझे भरतनाट्य संपल्यानंतर — तुझ्या आमंत्रणानुसार ! — प्रेक्षकांमधली (माझ्यासकट) चारपाच निवडक मंडळी तुझ्या पाकगृहात प्रवेश करून त्यावेळी तुझ्या सासूबाई त्यांच्या लाडक्या कुकरमधे पुरण नाही तर भातभाजी शिजवत असताना त्या कुकरमधल्या वाफेचे योग्य नियंत्रण राखणार्‍या knobच्या — मुठीच्या — तांडवनृत्याचे आपण अल्पकाळ प्रेक्षण करू या.

    गंमत म्हणजे मुठीचे ते तांडवनृत्य सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने कुकरमधून बाहेर पडणार्‍या वाफेने तांडवनृत्य करणार्‍या मुठीवर फिदा होऊन एकदम बेहोशीने शिट्ट्या मारायला सुरवात केल्याचे दृश्य दिसते !

    ————–

    “अलबेला’ नावाच्या १९५१ सालातल्या — म्हणजे ७१ वर्षांपूर्वीच्या ! — एका (रंगविहीन) सिनेमात “शाम ढले, खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो” असे एक चरण असलेले एक सिनेसंगीत होते ते असे –

    https://www.youtube.com/watch?v=DO4M25EjDCM

    ——————-

    तुझ्या सासूबाईंच्या पुरणपोळीचे उपपुराण असलेले तुझे कुकरपुराण एखाद्या देवळात पुराणिकाने कथन केले तर त्यायोगे त्या पुराणिकाला आणि कुकरपुराणाची लेखिका म्हणून तुला, दोघांनाही अमाप लोकप्रियता लाभेल; आणि त्या पुराणिकाला तुझे कुकरपुराण महाराष्ट्रभर गावोगाव देवळांमधे कथन करण्याकरता आमंत्रणे येत राहून त्यायोगे दक्षिणारूपे विपुल धनसंपत्तीही लाभेल.

    पुंडलिक वरदे हरी विठ्ठल !

    • दीर्घ अभिप्राय व तोही कलात्मक पद्धतीने पोहोचवल्या बद्दल सविनय धन्यवाद…लेखन करता येवो हाच प्रयत्न सध्या..?बाकी परमेश्वराची इच्छा

      • गौरी,

        लेखनकला उत्कृष्टपणे आत्मसात करण्याकरता तुला मदत होईल ह्या विचाराने तुला मी एक लिंक आणि मराठी भाषेशी निगडित असलेल्या एका संस्थेकरता मी काही वर्षांपूर्वी लिहिलेला एक “लघुलेख” खाली देत आहे.

        https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE

        ————————–

        कोणतेही लेखन जास्तीत जास्त सुंदर करण्याकरता घ्यायच्या दक्षता

        १. शब्दांमधल्या प्रत्येक अक्षराच्या अचूक ह्रस्व-दीर्घ रूपासकट शुद्ध रूपात प्रत्येक शब्द लिहिलेला असावा.

        २. प्रत्येक वाक्यात योग्य विरामचिह्नांचा वापर असावा. उद्गारवाचक चिह्नाचा वापर कमीत कमी असावा. अवकाशदर्शक तीन टिंबांचा (…) वापर माफक असावा. विरामचिह्नापूर्वीचे अक्षर आणि ते विरामचिह्न ह्यांमधे अंतर (space) नसावे.

        ३. शब्दांना पर्याय असतील तेव्हा त्यांपैकी उचित शब्दांची निवड असावी.

        ४. जेव्हा इंग्रजी शब्दांना मराठीत रुळलेले प्रतिशब्द असतील तेव्हा ते मराठीतले प्रतिशब्द वापरावेत.

        ५. बोजड शब्दांऐवजी नेहमीच्या वापरातले शब्द वापरलेले असावेत.

        ६. लेखनाची वाचनीयता वाढवण्याकरता वापरायची काही शब्दांची रूपे अशी —

        ………………………………………

        मध्ये > मधे; कोठे > कुठे;
        तथापि > परंतु, पण; अद्यापि > अजून;
        -साठी > -करता; व > आणि;
        या > ह्या; अशा > अश्या; तशा > तश्या;
        जेणेकरून > ज्या योगे; तेणेकरून > त्या योगे;
        येथे > इथे; तेथे > तिथे; येथून > इथून; तेथून > तिथून;
        येथील > इथला/इथली/इथले/इथल्या;
        तेथील > तिथला/तिथली/तिथले/तिथल्या;
        वरील > वरचा/वरची/वरचे/वरच्या;
        खालील > खालचा/खालची/खालचे/खालच्या;
        मधील > मधला/मधली/मधले/मधल्या;
        ह्यातील > ह्यातला/ह्यातली/ह्यातले/ह्यातल्या;
        त्यातील > त्यातला/त्यातली/त्यातले/त्यातल्या;
        शाळेतील > शाळेतला/शाळेतली/शाळेतले/शाळेतल्या;
        सर्व > सगळा/सगळी/सगळे/सगळ्या;
        (काम) करीत > (काम) करत;
        करेन > करीन, पाठवेन > पाठवीन (इत्यादी);
        करील > करेल; पाठवील > पाठवेल (इत्यादी); पण पाहील > पाहील
        करावयाचा/करावयाची/करावयाचे/करावयाच्या > करायचा/करायची/करायचे/करायच्या, पाठवावयाचा/पाठवावयाची/पाठवावयाचे/पाठवावयाच्या > पाठवायचा/पाठवायची/पाठवायचे/पाठवायच्या (इत्यादी); ह्याचेकडून/हिचेकडून/ह्यांचेकडून/त्याचेकडून/तिचेकडून/त्यांचेकडून > ह्याच्याकडून/हिच्याकडून/ह्यांच्याकडून/त्याच्याकडून/तिच्याकडून/त्यांच्याकडून;
        ह्याचेपासून /त्याचेपासून > ह्याच्यापासून /त्याच्यापासून (इत्यादी);

        ………………………………………

        ७. ह्यानं/त्यानं/केलं/पाहिलं अश्या प्रकारचे बोली भाषेतले शब्द कथांमधे जेव्हा संवाद लिहिलेले असतील फक्त तेव्हाच त्या संवादांमधे वापरावेत (आणि नक्की वापरावेत). इतर कुठल्याहो लेखनात ह्याने/त्याने/केले/पाहिले अश्या प्रकारचे शब्द वापरावेत. (आपल्या लघुनिबंधांना “गुजगोष्टी” असे नाव देऊन ना. सी. फडकेंनी त्यांपैकी काहींमधे बोली भाषा वापरली होती. त्या बाबतीत फडकेंचे अनुकरण करून लेखकांनी आपले लघुनिबंध लिहिणे वैकल्पिकपणे ठीक आहे.)

        ८. कथांमधल्या संवादांमधे वापरलेले सगळे शब्द आणि वापरलेल्या वाक्यरचना ह्या दोन्ही गोष्टी मराठी बोली ढंगाला अनुसरून असाव्यात.

        ९. संवादांखेरीजच्या लेखनातल्या सगळ्या वाक्यांमधे प्रत्येक शब्दाची योजना व्याकरणानुसार जागच्या जागी असावी.

        १०. लेखनातल्या सगळ्या वाक्यांची आणि परिच्छेदांची योजना तार्किक सुसंगतीच्या दृष्टीने जागच्या जागी असावी.

        ११.परिच्छेद शक्य तितके लहान असावेत आणि जवळच्या दोन परिच्छेदांमधे एक रिकामी ओळ असावी.

        १२. लेखनात प्रकट करायचे सगळे विचार अर्थातच पूर्णपणे आणि निःसंदिग्धपणे प्रकट केलेले असले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..