ज्ञानाहून अधिक महत्वाची प्रज्ञा.
– ज्ञान म्हणजे अनेक प्रकारची माहिती, सूत्रे आणि सिद्धांत आत्मसात करणे. ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात योग्य वेळी, योग्य तऱ्हेने योग्य कारणांसाठी वापर करणे म्हणजे प्रज्ञा.
– ज्ञान हे अभ्यास आणि स्मरणशक्ती यांतून प्राप्त होऊ शकते. प्रज्ञा मात्र प्रामुख्याने अनुभव, चिंतन आणि सारासार विचारशक्ती यांतून येते.
उदाहरणे
– अग्नी (आग) उष्ण असतो हे माहीत असणे हे ज्ञान. त्या अग्नीला स्पर्श न करणे ही प्रज्ञा
– टोमॅटो फळ असते हे ज्ञान. टोमॅटो फ्रुट सॅलड मध्ये घालत नाहीत ही प्रज्ञा.
– विमान चालवता येणे हे ज्ञान. हेच ज्ञान प्रज्ञाहीन व्यक्तीकडे गेले की तो WTC उडवून लावण्यासाठी करतो.
थोडक्यात,
ज्ञान हे व्यक्तीला समृद्ध करते.
प्रज्ञा व्यक्तीच्या कृतींना दिशा देते.
एखाद्या व्यक्तीकडे विपुल ज्ञान असू शकते, परंतु प्रज्ञा मात्र कमी असू शकते; याउलट, एखादी प्रज्ञावान व्यक्ती मर्यादित माहिती उपलब्ध असतानाही, योग्य आणि अचूक निर्णय घेण्याचे कसब जाणते.
गिरीश यशवंत टिळक
ठाणे


Leave a Reply